Swami Samarth स्वामी समर्थ

अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ Swami Samarth यांची समाधी आहे. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यात आहे. श्रीच्या दर्शनासाठी एक केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येत असतात तसेच देशभरात भक्तांची काही कमी नाही. स्वामींच्या समाधी स्थळी दर्शन घेण्यासाठी नेहमी गर्दी करीत असणारे भक्त आपले दुःख विसरता कसा त्यांचा भाव आहेत असेच कशाचीही भीती वाटत नाही असे मानतात.

Swami Samarth स्वामी समर्थ

अक्कलकोट Akkalkot हे शक्तिस्थळ मानले जाते. जेथे श्री स्वामी समर्थ Swami Samarth यांचे विचार यांची भक्ती व सेवा केल्या जाते. अक्कलकोट येथे हे स्वामी समर्थ भक्त हे वर्षातून एकदा तरी जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. यामुळे भक्तांना आत्मिक समाधान लागते, नवीन कार्य करण्याची ऊर्जा मिळते, अशी अनेक भक्तांची भावना आहेत.

याशिवाय स्वामींच्या समाधी स्थळ वरून दर्शन घेऊन आलेल्या भक्तांना असाही अनुभव आला आहे की, स्वामींचे दर्शन घेतल्यामुळे त्यांचे अडकलेले कामे पूर्ण झाले, अनेकांचे आजार दूर झाले, अनेकांचे संसार सुरळीत सुरु झाले, विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण झाली, बेरोजगारांना नोकरी लागली, तसेच अनेक शेतीसंबंधी व इतर लांबणीवर गेलेले कार्य पूर्ण झाले.

असा अनुभव खूप भक्तांना आल्यामुळे श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तिमार्गाकडे भक्तांचा ओढा हा खूप जास्त आहे. स्वामी समर्थांचा भक्तिमार्ग हा अगदी साधा, सरळ आणि सोपा आहे. यात कुठलीही ही अंधश्रद्धा नाही, फक्त स्वामी भक्ती हि श्रद्धेचा भाग आहे.  स्वामींवर ती प्रचंड श्रद्धा असल्या कारणाने मानसिक ताकत बळ मिळते. स्वामी समर्थांचे नाव संकट समयी जरी घेतले तर सर्व संकटे दूर होतात, असा अनुभव भक्तांना आलेले आहे.

याशिवाय तारक मंत्रांनी सुद्धा भक्तांची मानसिक शक्ती प्राप्त झालेली आहे. म्हणून स्वामी समर्थ यांचे फक्त नाव जरी मुखात घेतले किंवा स्मरण तरी स्वामी समर्थ भक्तांच्या पाठीशी उभा राहून सतत काम करण्याची प्रेरणा देतात. स्वामींचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.” तर चला आपण स्वामी समर्थांविषयी माहिती पाहूया.

श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते.

श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्रातून आपल्याला अनेक बोध घेता येतो. त्यात संत हे गाई सारखे असावे, गाय गवत खाते आणि दूध दही देते. गायीच्या दुधापासून दही, ताक, लोणी, तूप, श्रीखंड असे अनेक पदार्थ तयार होतात. गाय ही गवत खात असल्याने ती सात्विक असते आणि तिच्या दुधापासून पासून मिळणारे पदार्थ हे मनुष्याच्या शरीरासाठी अतिशय पोषक असतात. परंतु हत्ती हा ऊस खातो, गूळ खातो.

तरीही हत्तीपासून समाजाला काहीही उपयोग होत नाही, म्हणून संतांनी सात्विक भोजन करायला हवे जे समाजाकडून कण भर घेतात आणि समाजाला मन भर देतात. असे संत असायला हवे. अशाप्रकारे आपण त्यांच्या चरित्रातून शिकू शकतो.

श्री स्वामी समर्थ यांचे स्वरूप

श्री स्वामी महाराजांची रूप एवढे सुंदर आहे की, आजही त्यांच्या मूर्तीसमोर बसलो की आपल्याला स्वामी आपल्याशी हितगुज करतात असे वाटते. चेहऱ्यावरती शांतता, उच्च कपाळ व त्यावर अष्टगंध टिळक, तेजस्वी कोणा सारखे नयन, सरळ नाक, चेहऱ्यावरती स्मित हास्य, मुख कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आणि आतील दंत हे कुंदाच्या फुलाच्या पाकळ्या प्रमाणे शुभ्र वर्ण, गळ्यात कौस्तुभ, रत्नमाळा, उदरी छाती त्रिवेणी संगमासारखी जसे ज्या ठिकाणी तीन नद्यांचा संगम होतो.

मनगटे गोलाकार, आपल्या या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कर फुललेले व हाती गदा, पद्म, शंख, चक्र, कमरेला पितांबर नेसलेला आणि उघड्या मांड्या, त्याप्रमाणे ते पितांबर कमरेला गुंडाळलेले असे हे स्वामी समर्थांचे रूप पाहून त्यांचे वर्णन करता, सगळे वेद, नारद, ऋषिवर्य त्यांनाही फक्त अशा 64 कला व 14 विद्या  त्यांच्या अंगी होत्या. श्री स्वामी समर्थ यांचे वर्णन कितीही केले तरी कमीच आहे. अशा महा विष्णूचा अवतार मानल्या जाणार्‍या व दत्तात्रय प्रभू अविष्कार समजला जाणाऱ्या श्री स्वामी समर्थांना कोटी कोटी नमन..

See also  Hindu Philosophy Benefits of Tilak Kumkum | कपाळावर टिळा लावण्याचे फायदे कोणते?

श्री स्वामी समर्थ ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति | श्री स्वामी समर्थ द्वंद्वातीतनं गगनसदृशं. तम नमामि श्री स्वामी समर्थ || या प्रमाणे विश्वातील सर्व प्रकारचे दुःख यातना, त्रास, भय, निराशा, अशा देऊन जीवनात सुखाचा दिपस्तंभ उभा करण्यासाठी योग्य मार्ग दाखविणारा फक्त ब्रह्मा असतो आणि तो ब्रह्मा म्हणजे श्री स्वामी समर्थच आहे.

तेच विश्वव्यापक परब्रह्म ज्ञानमूर्ती, परम सत्याचा मार्ग दाखवणारे त्रिगुण रहित सद्गुरु हे स्वामी समर्थ आहे. अशा या ब्रम्हानंद, पुनर दत्त अवतार, श्री दिगंबर, अनंत ब्रम्हांड नायक, स्वामी समर्थांना भक्त त्रिवार वंदन करतात. आपल्या संस्कृतीमध्ये देवादिकांना पशू, पक्षी, झाडे, वेली, फुले, फळे अशा भूतलावरील चराचरा बद्दल प्रेम भावना व्यक्त केल्या जातात.  या प्रत्येकाच्या कल्याणासाठी परमेश्वराला विविध रूप धारण करावे लागले.

जसे भगवान विष्णू या सृष्टीला वाचवण्यासाठी सृष्टीच्या, कल्याणासाठी व अशीच सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध रूप धारण करून सृष्टीवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला दूर केले आहे. असेच एक विष्णूचे रूप म्हणजे परमावतार श्री दत्तात्रेय प्रभु आहे. भगवान विष्णूने दत्तात्रय प्रभू अवतार घेतला तो फक्त विश्वाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अशा या दत्तात्रेय प्रभूंच्या अवताराची महती गुरुचरित्र या ग्रंथात लिहिलेली आहे.

स्वामी समर्थांचा Swami Samarth पहिला अवतार

सन 1149 मध्ये म्हणजे आताच्या पंजाब राज्यातील खेडे छेली या गावात भगवान दत्तात्रेय प्रभु प्रगट झाले. आपल्या बुद्धीला अगम्य असे स्वरूप देऊन स्वामी समर्थांचा अवतार धारण केला. सुमारे 229 वर्षे भगवान दत्तात्रय प्रभूंनी श्री स्वामी समर्थ रूपात पूर्ण विश्वामध्ये यात चीन, मलेशिया, सिंगापूर आणि संपूर्ण भारतभर भ्रमण केले आहे. याची स्वामी चरित्रात उल्लेख करण्यात आला आहे.

स्वामी समर्थांचा Swami Samarth दुसरा अवतार

सन 1378  मध्ये पिठापूर येथे श्रीपाद श्री वल्लभ यांचे रूप धारण करून श्री स्वामी समर्थ प्रगट झाले. तेथील अंधश्रद्धेत खितपत पडलेल्या स्थनिकांना अंधश्रद्धेपासून दूर केले. त्यांना खऱ्या देवाची ओळख पटवून दिली यांच्या मनात देवाबद्दल श्रद्धा, प्रेम भावना निर्माण केली.  या रूपात श्रीपाद श्री वल्लभ स्वामी समर्थ 150 वर्ष कार्यरत राहिले अशी माहिती स्वामी चरित्रात आहे.

स्वामी समर्थांचे Swami Samarth तिसरे अवतार :

सन 1528 मध्ये स्वामींनी महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातील कारंजा येथे श्री स्वामी समर्थांनी नरसिंह सरस्वती अवतार धारण केला. शंभर वर्ष ते ह्या अवतारात कार्यरत राहिले.  या काळात त्यांनी औदुंबर वाडी गाणगापूर सारखी मोठी तीर्थस्थळ निर्माण केली आणि तदनंतर स्वामी समर्थ महाराज गाणगापुरात नरसिंह सरस्वती अवतारात आले.  हे गाणगापुरातील नरसिंह सरस्वती महाराजनांचे रूप तिसरे रूप आहे.

“मी नरसिंह भान असून मी शेलम जवळील कर्दळीवनातून आलोय” हे त्यांच्या तोंडचे उद्गार आहे. मी नरसिंह सरस्वती असल्याचे त्यांनी आपल्या भक्तांना वेगवेगळ्ळे अनुभव देऊन सुचवित होते. या अवतारात त्यांनी लोकांच्या मनात धर्मजागृती दृढ केली. हिंदू साम्राज्याची स्थापना केली. लोकांना अध्यात्मिक मार्गावर आणून सोडले व विविध ठिकाणी विविध रुपात विविध नावाने स्वामी समर्थ हे लोकांच्या हितासाठी मार्गदर्शन करीत राहिले आहे.

स्वामी समर्थांचे Swami Samarth पुन्हा मूळ रूप :

1678 मध्ये महाराज आपल्या पुन्हा मूळ रुपात प्रकट झाले व ते आंध्र प्रदेशातील कर्दळीवनात ते पुन्हा प्रगट झाले.  तेथे त्यांनी आपले मूळ रूप म्हणजे स्वामी समर्थ अवतार धारण केल्या नंतर तेथून हिमाचल प्रदेशापासून तर कन्या कुमारी पर्यंत संपूर्ण भारतभर भ्रमण केले म्हणून आजही महाराजांचे सेवेकरी भक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते भारतभर आणि विश्वभर आहेत.

See also  आई Aai

शेगावचे गजानन महाराज आज व शिर्डीचे साईबाबा यांना देखील महाराजांनी दीक्षा दिली असे महाराजांचे सेवेकरी सांगतात. त्यानंतर महाराज पंढरपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे आले.  सोलापुरातील मंगळवेढे या गावी त्यांनी काही वर्ष वास्तव्य केल्याची स्वामी चरित्रात नोंद आहे.  मंगळवेढ्यातील भक्तांना स्वामींनी मार्गदर्शन केले, लोकांच्या मनातील अहंकाराची भावना दूर केली व त्यांचे जीवन सुखकर व शांतीमय बनवले तसेच भेटेल त्या व्यक्तीचे दुःख,भय हे आपल्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने दूर केले.

महाराजांचे प्रवचन Swami Samarth Prawachan

1856 मध्ये ते अक्कलकोट, महाराष्ट्र या ठिकाणी मूळरूपात प्रगट झाले. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ 22 वर्ष राहिले.  येथे आल्यानंतर महाराजांनी येथील जनतेला आपल्या या प्रवचनातुन संस्कृती व सदाचार याविषयी आपले मार्गदर्शन केले. लोकांचे दुःख मिटविले त्यांना एक स्वयंभू बनवून अनन्य भावाने, प्रेमाने, चिंतनाने परमेश्वर भक्ती हि नेहमी सफल संपूर्ण असते याची खात्री करून दिली.

महाराजांनी कोणत्याही पूर्वसंचिताचा किंवा स्वार्थाचा कधीही विचार केला नाही. आपल्या भक्ताला कुठल्याही खेड्या किंवा वाऱ्या घालण्याची कधीही अट घातली नाही अशा प्रकारे स्वामी आपल्या प्रत्येक रुपात लोकांसाठी व भक्तासाठी सतत कार्यरत राहिले त्यांना योग्य मार्गदर्शन करून भारतीय संस्कृतीची जोपासना करण्यास सांगितली.

स्वामी समर्थांची समाधी Swami Samarth Samadhi

स्वामी समर्थ यांनी 1876 रविवार, चैत्र वद्य त्रयोदशी, शके 1800 बहु धान्यनाम अक्कलकोट येथे मध्यान काळी वटवृक्षखाली समाधी घेतली. स्वामी समर्थांनी आपल्या लाडक्या सेवेकरीच्या म्हणजेच  चोळप्पा यांच्या घराजवळ समाधिस्थ झाले.

स्वामींची कुंडली

स्वामी समर्थांची जन्म कुंडली हे श्री नानाजी रेखी यांनी तयार केलेली आहे.
बहुधान्यनाम संवत्सरे शके 1071, चैत्र शुद्ध द्वितीया, अश्विनी नक्षत्र, द्वितीय चरण, प्रतियोग टोपण नाव नुर्सिंहभान, आद्य नाडी देवगण, मेष राशी, राशी स्वामी मंगळ, जन्मकाळ सूर्योदयापूर्वी दोन घटिका, जन्म नाव चैतन्यस्वामी, यजुर्वेदी ब्राह्मण, काश्यप गोत्र, निर्णयकाळ चैत्र वद्य 13 शके 1800 दुपारी चार वाजता.

गुरवार आणि स्वामी Thursday and Swami

श्री स्वामी समर्थ हे प्रभू दत्तात्रय भगवान यांचे तिसरे अवतार मानले गेलेले आहे. म्हणून भगवान दत्तात्रय हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचे मूळ आहे. प्रभू दत्तात्रय यांचा वार गुरुवार असल्याने श्री स्वामी समर्थांची विशेष सेवा हि गुरुवारीच केली जाते. यादिवशी उपवास केला जातो.

चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन असतो. तसेच श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी ही चैत्र वद्य त्रयोदशी या दिवशी असते. स्वामी समर्थ सेवेचा महत्त्वाचा दिवस हा गुरुपौर्णिमा असतो. यादिवशी श्री स्वामी समर्थांची भक्तिभावे पूजा व सेवा करून आशीर्वाद घेण्यात येतो.

गुरुपौर्णिमा ही आषाढ शुद्ध पौर्णिमा या दिवशी साजरी करण्यात येते. दुसरा महत्वाचा दिवस हा  श्री दत्त जयंतीचा असतो. दत्त जयंती ही मार्गशीष शुद्ध पौर्णिमा या दिवशी साजरी करण्यात येते. या दिवशी सुद्धा श्री स्वामी समर्थांचे मंदिरात मोठा उत्साह साजरा करण्यात येतो.

स्वामी समर्थांच्या संदर्भात महत्त्वाचं तीर्थक्षेत्र गाणगापूर मानण्यात आलेले आहे. येथे दरवर्षी मोठी यात्रा भरत असते.  स्वामी समर्थांच्या दिनचर्यामध्ये सकाळी काकड आरती, अभिषेक पूजा, लघुरुद्र महानैवेद्य व आरती तसेच दर गुरुवारी आरती व पालखी सोहळा व दररोज सायंकाळी आरती असा दिनक्रम असतो.

स्वामीच्या तारक मंत्रचा अर्थ Swami Samarth Tarak Mantra

निशंक हो निर्भय हो म्हणजे मनाला निशंक आणि निर्भय होऊन काम करण्यास सांगितलेली आहे.  ज्यावेळी आपले मन निर्भय असते निशंक असते. त्यावेळी कुठलेही काम अतिशय चांगल्या या पद्धतीने पार पाडले जाते. कुठलेही काम कारतांना स्वामींचे प्रचंड स्वामीबळ पाठीशी असल्यास अशक्य गोष्टी शक्य होतात. स्वामींचे नाम सतत स्मरण करीत राहिल्यास व ज्या ठिकाणी स्वामींचे पद असतात इथे कुठल्याही गोष्टीची कमतरता राहात नाही.

स्वामीच भक्तांचे भय व  प्रारब्ध घडवितात अगदी आपल्या आईसारखे. स्वामींच्या आज्ञा विना काळाला सुद्धा मनुष्याला परलोकी नेता येत नाही.  म्हणून उगाच भीती व भय पाळून माणूस मनुष्य घाबरत असतो परंतु स्वामीचे शक्ती जवळ असल्याने सर्व भय व भीती पळून जाते.  घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे.

See also  Shirdi Sai Baba Live Darshan शिर्डी साई बाबा लाईव्ह दर्शन

हे स्वामींचे शब्द हे काम करण्यास प्रेरणा आणि उत्साह देतात. स्वामींची भक्ती केल्यानंतर स्वामी संकटात हात देतात आणि कठोरतल्या कठोर संकटात डगमगू न देता साथ देतात.  स्वामींचे नाम सतत ध्यानी घेऊन स्वामींचे स्वामींचे तीर्थ पंचामृत मानून स्वामींच्या शक्ती विषयी प्रचिती घेता येते.

स्वामींच्या चरणाशी गेल्यानंतर स्वामींचा हात डोक्यावरती आशीर्वाद स्वरूपाने आल्यानंतर कुठलीही गोष्ट कमी पडत नाही. स्वामी आपल्याला आपल्या भक्तांचे सतत पाठीशी उभे राहतात म्हणून स्वामीचे स्मरण करीत राहावे असा या तारक मंत्रातील अर्थ आपल्याला काढता येतो.

‘श्री स्वामी समर्थ’ याचा अर्थ

‘श्री स्वामी समर्थ’ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रम्हाण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ओम नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुदेव दत्त हे ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, त्याचप्रमाणे समानार्थी ‘श्री स्वामी समर्थ’ हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे. श्री स्वयं श्रीपाद विराजीत सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे.

मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, षडरिपु व ईर्ष्या अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा. समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. त्यायोगे ‘श्री स्वामी समर्थ’ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय, माझे मीपण भस्म करून स्वयंभू शिव तत्त्व सद्गुरुकृपे अंकित करा.

स्वामीजींचे बोल

समर्थ स्वामींचे नेहमी आपल्या भक्तांना योग्य सल्ला व जगण्याचे एकमेकांसोबत कसे वागायचे याविषयीचे भाषण सांगत असत. ते म्हणायचे भगवंताचे ऐश्वर्य, धर्म, यश, वैभव, ज्ञान आणि वैराग्य हे सहा सद्गुण आहे. यांनाच ‘भग’ म्हणतात.

हे भग ईश्वराकडे असतात म्हणून तो भगवंत. सुख, समाधान, शांती आणि आनंद हे ऐश्वर्य, नीती, न्याय आणि कृपा हा धर्म सर्वत्र, सर्वकाळ कार्याची सिद्धी हे यश निरांतराची ऐहिक व पारलौकिक अनुकूलता हे वैभव निजारूपाची स्पष्ट व नित्य जाणीव हे ज्ञान हे सर्व असूनही निरपेक्ष, निस्वार्थ आणि निरलस राहणे हे वैराग्य, या सहा गुणविशेषांचा पाया असणे, याला अधिष्ठान म्हणतात. त्यावरच सत्कार्याची उभारणी होते.

हे अधिष्ठान देणारा भगवंत असतो. पूर्व जन्मातील कर्मे हे ‘संचीत’ असते. वर्तमान जन्मात भोगल्यास येणारा त्यातील अंशभाग म्हणजे ‘प्रारब्ध’. प्रारब्धातील पुण्यरूप सत्कृत्याने सुख, समाधान, तर पापरूप दुशकृत्याने दुःख अनुभवास येते. देव व गुरु सहसा प्रारब्धात ढवळाढवळ करीत नाहीत. प्रारब्ध टाळता येत नाही. ते कालांतराने पुढे उभे ठाकतेच. म्हणून प्रारब्ध भोगून संपवावे. प्रारब्धात नसलेल्या गोष्टींची प्राप्ती देव गुरु करून देतात, तेव्हा ती पुढील जन्मातून घेतलेली उधारी असते.

​स्वामी समर्थ यांची प्रसिद्ध वचने

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.

जो माझी अनन्यभावाने भक्ती करतो,
त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो.

आळशी माणसाचे तोंड पाहू नये.

शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात
संतुष्ट रहा.

जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे
सावधगिरीने वाग.

भिऊन नकोस पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी,
तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू.

आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा.

राहिलेला काळ आमचे नामस्मरणात
घालावा, मोक्ष मिळेल.

मी सर्वत्र आहे. परंतू, तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा.

हम गया नही जिंदा है.

अशा प्रकारे स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येत असतात.
तुम्ही या स्थळाला नक्की भेट द्या व श्रींचा आशीर्वाद घ्या.

“तुम्हाला आमचा लेख स्वामी समर्थ Swami Samarth विषयी कसा वाटला, तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment