प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या वेबसाईट वरती , शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मित्रांनो शासनाकडून नेहमी नवनवीन योजना सर्वच नागरिकांसाठी राबविल्या जातात. यातील काही योजना शेतकरी मित्रांसाठी मोठ्या प्रमाणावर राभविल्या जातात .
मित्रांनो अशाच एका योजनेबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून तब्बल पाच लाख सोलर पंप शेतकरी मित्रांना दिले जाणार आहेत. मित्रांनो या योजनेचे नाव प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना असे आहे. या योजनेच्या माध्यमातून आता शेतकरी मित्रांना सोलार पंप मिळणार आहेत. ही योजना विशेषतः शासनाकडून शेतकरी मित्रांसाठी राबविले जाते.
शेतकरी मित्रांसाठी ही योजना मोठ्या प्रमाणावर महत्त्वाची आहे कारण शेतीला पाण्याची गरज असतेच जर पाणी नसले तर पीक हे उत्तम होत नाही त्यामुळे शेतकरी मित्राला रात्री शेतीला पाणी देण्यासाठी जावे लागते अशामध्ये शेतकरी मित्राला त्रास होतो तर आता या सोलार पंप च्या माध्यमातून हे काम सोपे होणार आहे. यासाठी लागणारी कागदपत्रे आपण पुढे पाहूया.
योजनेचेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे.
रहिवासी दाखला ,
आधार कार्ड ,
बँक पासबुक ,
मोबाईल नंबर ,
पासपोर्ट आकाराचे फोटो ,
SC / ST प्रवर्गातील असाल तर जातीचे प्रमाणपत्र.
अशाप्रकारे या योजनेसाठी कागदपत्रेही लागणार आहेत मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध एचपीचे पंप दिले जाणार आहेत ते त्यांच्या शेतीला अनुसरून असणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.