1 रुपये पीक विमा योजना 2023
पहा कधी पासून चालू झाले अर्ज आणि काय आहे शेवटची तारीख अर्ज करण्याची .
शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे, मित्रांनो आता तुम्हाला केवळ एका रुपयामध्ये पिक विमा तुमच्या शेतीसाठी मिळणार आहे. हे एक योजना असून शासन याला शेतकरी मित्रांसाठी राबवत आहे .
योजना राज्य शासनाकडून शेतकरी मित्राच्या मदतीला आलेली आहे. आणि मित्रांनो काही दिवसांपूर्वीच यासाठी जीआर देखील प्रदर्शित झाला आहे , जीआर आल्यापासून नागरिकांना दिलासा मिळालेला आहे.
आता शेतकरी मित्रांनो स्वतःच्या पिकासाठी फक्त एका रुपयामध्ये पिक विमा काढता येणार आहे.
मित्रांनो यासाठी अर्ज देखील चालू झालेले आहेत चला तर पुढे पाहूया आपण कोणत्या तारखेपर्यंत यासाठी अर्ज करू शकतो.
एका रुपयात आता शेतकरी मित्रांना पिक विमा मिळणार असल्याने शेतकरी मित्र आनंदीत आहेत आणि यासाठी एक जुलैपासून पोर्टल चालू झालेले आहे. मित्रांनो आता तुम्हाला खरीप हंगामासाठी 31 जुलै पर्यंत पिक विमा भरता येणार आहे. या तारीख पर्यंत तुम्ही तुमचा विमा काढून घ्या.
मित्रांनो यामध्ये शेती विषयी चक्रीवादळ , पूर , हवामान बदल , कीड व रोग , मित्रांनो आता या सर्वांसाठी यातून कव्हर केले जाणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एक रुपया यासाठी अर्ज करून लाभ घेऊ शकता.