पीएम किसान योजना 14 वा हप्ता तारीख 2023
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या वेबसाईट वरती मित्रांनो पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा काही दिवसांपूर्वीच तेरावा हप्ता हा नागरिकांना मिळालेला आहे. आणि नागरिक चौदाव्या हपत्याची वाट पाहत आहेत .
मित्रांनो चौदावा हप्ता मिळण्यासाठी आपल्याला काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. जसे की आपली इ केवायसी पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे जर ती नसेल तर आपल्याला 14 वा हप्ता मिळणार नाही.
मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आपल्याला वर्षासाठी 6 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. आणि यातील टप्पा हा दोन हजाराचा असतो आणि हा चार महिन्यांमध्ये एकदा वितरित होतो. मित्रांनो तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला हा चौदावा हप्ता मिळणार आहे अशी घोषणा झालेली आहे. आणि हा अनेक ठिकाणी वितरित होत असल्याने आपल्याला वेळ सुद्धा लागू शकतो.
विविध शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आणखीनही तेरावा हप्ता हा जमा झालेला नाही तर मित्रांनो यासाठी आपल्याला ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण इ केवायसी केली नाही तर आपल्याला तेरावा आणि चौदावा हप्ताही मिळणार नाही. तर अशाप्रकारे आपला चौदावा हप्ता हा आपल्याला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळू शकतो धन्यवाद !