Hindu Religion and It’s Culture | देवदर्शनासाठी मंदिरात जाता मग प्रथम पायरीला नमस्कार का करतात?

Hindu Religion and It’s Culture तुम्हीसुद्धा देवदर्शनासाठी मंदिरात जाता मग प्रथम पायरीला नमस्कार का करतात ? काय कारण आहे? हे जाणून घ्या.

हिंदू धर्मामध्ये सर्वच लोक मंदिरामध्ये देव दर्शनासाठी जातात. हे आपणा सर्वांनाच माहीत आहे परंतु देव दर्शनासाठी मंदिरात जाण्याअगोदर मंदिरात चढणार्‍या ज्या पायऱ्या असतात तेव्हा पहिल्या पायरीच्या का पाया पडतात हा प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात पडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहो ही माहिती.
तर चला मग मंदिरात जाण्याआधी मंदिराच्या पायरीला लोक नमस्कार का करतात? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती पूर्ण वाचा.

साधुसंतांचे म्हणणे आहे की, “मंदिराच्या पायरीकडून गाभाऱ्याच्या मूर्तीकडे नेणारा प्रवास निर्गुणाकडून सगुणाकडे आणि परत सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा आहे.”

आपण मंदिरात प्रवेश करण्या अगोदर चप्पल बाहेर काढतो. पाय धुतो आणि स्वच्छ देहाने आणि स्वच्छ मनाने मंदिरात पाऊल ठेवतो. तसे करताना आपला हात आपोआप मंदिराच्या पायरीला स्पर्श करतो. त्यामागे कारण काय असू शकेल याचा कधी आपण विचार ही केला नसेल.

तर मंदिरात जाताना देव आणि दर्शनासाठी जाणारा यांच्यामधील दुवा ही पायरी असते. ती ओलांडून गेल्याशिवाय गाभाऱ्यातली देवमूर्ती आपल्याला दिसणार नाही. तिथेच कोणी रोखून धरले, तर देवदर्शन घडणार कसे? म्हणून त्या पायरीचे महत्त्व अधिक आहे. परंतु गंमत अशी, की ज्या पायरीला नमस्कार करून आपण मंदिरात जातो, त्या पायरीचा आपल्याला मंदिरातून निघताना विसर पडतो. देवाचे दर्शन झाले की त्या पायरीला ओलांडून पायात चपला अडकवून आपण परत जायला निघतो. म्हणजेच काम झाले की आपण तिला विसरतो आणि तसे घडणे स्वाभाविक आहे. नव्हे तर तो मनुष्यस्वभाव आहे. तसे होऊनही पायरी राग व्यक्त करत नाही तर आपण भक्त आणि भगवंताला जोडणारा दुवा बनू शकलो, याबद्दल समाधान मानते.

संत सांगतात, आपला देह हा देखील मंदिराचे प्रतिक आहे. देह हे देखील देवाकडे नेणारे द्वार आहे. आचार्य अत्रे तर लिहितात, देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर! म्हणजेच जशी मंदिराची पायरी ओलांडून गेल्याशिवाय गाभाऱ्यातला देव दिसत नाही, तशी देहाची पायरी ओलांडल्याशिवाय हृदयस्थ परमेश्वर दिसत नाही. एकदा का त्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि अंतर्यामी सूर गवसला, की परत देहाच्या दिशेने उलट प्रवास होणार नाही.  नेहमी मनुष्याने आपले आचार-विचार उच्च ठेवावेत. आपण दुसऱ्याच्या कमी पडलो तर आपल्या ही कामे कोणीतरी पडेल असा त्यामागचा हेतू आहे.

See also  12 Jyotirling बारा ज्योतिर्लिंग

ज्याप्रमाणे देवदर्शन झाल्यावर पायरीला नमस्कार करण्याचे भान उरत नाही, तसे देहाचा सदुपयोग करून आत्मारामाची भेट घेतली, की देहासक्ती राहत नाही. यासाठीच देहाला मंदिराच्या पायरीइतके महत्त्व द्या. मंदिरात जाताना जसे आपण पायरीशी रेंगाळत नाही, तर नमस्कार करून आत जातो, तसे देहात न रमता आत्मरामाकडे वाटचाल करा. स्वत:ची स्वत:शी ओळख करून घ्या. अंतरीचा आवाज ऐका. देहाला मंदिरासारखे पवित्र, कपटरहित स्वच्छ, निर्मळ ठेवा. म्हणजे गाभाऱ्यातला देव दिसल्यावाचून राहणार नाही.

Hindu Religion and It’s Culture अशी ही त्यामागची गंमत आहे, तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment