Temple Vastu Tips पूजेचे स्थळ एक असे ठिकाण आहे की, जेथे आपण जाऊन नतमस्तक झाल्याने कोणतीही चिंता असो किंवा समस्या असो त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते. म्हणजेच आपल्याला मनाची शांती आणि ऊर्जा प्रदान करणाऱ्या या पवित्र स्थानाबद्दल आत्मीयता असते आणि हे ठिकाण जर चांगल्या ठिकाणी नसले तर, तेथे आपल्याला मन स्थिर ठेऊन प्रार्थना करता येणार नाही. म्हणून या लेखामध्ये आपण घरामध्ये असलेले पूजा स्थळ कोठे असावे? आणि या पूजा स्थळा संबंधी कोणते नियम आपण पाळले पाहिजेत हे जाणून घेऊया.
देवावरची श्रद्धा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे, परंतु एक खर आहे मित्रांनो की कोणाचा देवावर विश्वास असो किंवा नसो, देव जिथे वास करतो, तिथे म्हणजेच मंदिरे किंवा पूजा स्थळी गेल्यानंतर आपल्याला मनाची शांती नक्कीच मिळते. आपल्या वाईट विचारांवर नियंत्रण सुद्धा आपल्याला तेथेच मिळवता येते. कारण तेथे आवाज नसतो तिथे असते फक्त शांतता आणि त्यामुळे ह्या स्थळाला योग्य ठिकाणी जर स्थापले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये कितीही समस्या असो किंवा चिंता असो ते नष्ट होतील कारण आपण अशा स्थळी जाऊन प्रार्थना करणार किंवा चिंतन-मनन करणार की, जिथे आपल्या डोक्यावर कुठलच ओझं वाटणार नाही, कुठली चिंता वाटणार नाही, वाईट विचारही येणार नाही. त्यामुळे तुम्ही आनंदी राहू शकाल. म्हणून आपल्या घरामध्ये पूजा स्थळ हे योग्य ठिकाणी असावे.
1) आपल्या घरामध्ये पूजा स्थळ हे नेहमीच ईशान्य दिशेने असले पाहिजे. कारण ईशान्य कोण किंवा कोपरा हा शुभ प्रभावी आणि परिपूर्ण असतो.
2) घराच्या ईशान्य भागामध्ये सत्व ऊर्जेचा प्रभाव हा शंभर टक्के असतो.
3) घराच्या आत असलेल्या मंदिराच्या किंवा पूजा स्थळाची उंचीही रुंदीच्या दुप्पट असावी.
4) घरामध्ये मंदिर किंवा पूजा स्थळ तयार करताना त्याच्या शेजारी, त्याच्याखाली किंवा त्याच्यावर शौचालय असू नये हे नेहमी आपण लक्षात ठेवले पाहिजे.
5) घरातील पूजा घर हे घराच्या पायऱ्यांच्या खाली कधीही असू नये.
6) पूजा घरात मृत व्यक्तीचा फोटो कधीही ठेवू नये.
7) फाटलेले देवाचे चित्र, तुटलेली मूर्ती पूजा घरामध्ये ठेवू नका अशी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर एखादा चांगला पवित्र स्थळ बघून तिथे त्या फोटोला किंवा मूर्तीला आपण पुरले पाहिजे.
8) आपल्याजवळील स्थानक किंवा संपत्ती मंदिरांमध्ये ठेवणे अशुभ असते.
9) घराच्या बेडरूममध्ये पूजाघर असू नाही, जर ते बनवले तर खोलीच्या ईशान्य कोपऱ्यात ते असले पाहिजे.
10) आपण देवाची पूजा नेहमीच पवित्र स्थाने आणि नेहमीच शांत मनाने करणे आवश्यक आहे.
11) देवाच्या मूर्ती च्या समोर उभे राहून कधीही देव पूजा करू नये किंवा आरती करू नये.
वरील लेखांमध्ये जी माहिती, सूचना आणि मान्यता आहे ती सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांची संपर्क साधून त्याप्रकारे उपाय करणे आवश्यक आहे.