Mahatma jyotirao Phule Jan Arogya Yojana information in Marathi language | महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

Mahatma jyotirao Phule Jan Arogya Yojana information in Marathi language केंद्र सरकारनं सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून महाराष्ट्र सरकारनं महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना असं ठेवलं. या योजनेद्वारे राज्यातील पात्र नागरिकांना सूचीबद्ध रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. मात्र, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ऐनवेळी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागते. ही धावपळ होऊ नये आणि योजनेचा लाभ व्हावा म्हणून आवश्यक कागदपत्रं तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. तर चला मग या योजनेविषयी माहिती पाहूया.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा उद्देश

राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये मर्यादा आहे.

शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले,शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालया कडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.

Mahatma jyotirao Phule Jan Arogya Yojana documents | महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कागदपत्रे

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेले आळखपत्र, असंघटीत कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उतारा आवश्यक असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं निर्धारित केलेली ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरली जातात.

See also  Sankranti of ST Employees Will be Sweet Now | ST कर्मचाऱ्यांची संक्रांत होणार आता गोड |

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी

34 निवडक विशेष सेवा अंतर्गत 996 प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आणि 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत कोरोना वरील उपचारांचा देखील समावेश करण्यात आला. 2020-21 या आर्थिक वर्षात डिसेंबर 2020 पर्यंत 93884 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी?

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात असणाऱ्या आरोग्य मित्रांची मदत घेता येते. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध आहेत. आरोग्यमित्र रुग्णाची योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करतात तसेच रुग्णालयात उपचार घेतांना योग्य ते सहाय्य व मदत करतात. रुग्णांची नोंदणी आरोग्य मित्रामार्फत केली जाते. रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी त्याचे ओळखपत्र पाहून केली जाते. ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या कागद पत्रांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर पाहायला मिळते.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना विमा संरक्षण

या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये 1.50 लाखापर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण ही मर्यादा प्रतिवर्ष 2.50 लाखापर्यंत आहे. लाभार्थी कुटुंबासाठी कोणत्याही एका व्यक्तीला व अनेक व्यक्तींना वरील योजनेचा लाभ घेता येतो.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा covid-19 उपचारासाठी लाभ | Mahatma Phule Jan Arogya Yojana for covid-19

2019 covid-19 उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा विचार करुन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याकरता लाभार्थी नसलेल्या व इतर रुग्णांना देखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये covid-19 साठी उपचार अनुज्ञेय राहील याबाबत राज्य आरोग्य हमी सोसायटीने विहित कार्य पद्धतीनुसार कार्यवाही करावी असे निर्देश शासनाने दिले आहेत.

लाभार्थ्यांची लिस्ट

जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूंची लागण देशभरात झाली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे राज्यातील कोरोना संशय रुग्णांमध्ये वाढ लक्षात घेता अधिकाधिक रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. म्हणून केंद्र सरकारने मार्गदर्शनानुसार राज्यांमध्ये काही ठिकाणी शासकीय रुग्णालय covid-19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आली आहे. covid-19 रुग्णालयाची यादी पाहण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या साइटवर जाऊन आपण पाहू शकता किंवा पीडीएफ डाऊनलोड करू शकता.

See also  Mai Jhukega Nahi... Allu Arjun Signature Style | मै झुकेगा नही.. अल्लू अर्जुन सिग्नेचर स्टाइल एका बाळाने केले

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील अंगीकृत रुग्णालये

योजनेमध्ये रुग्णालय अंगीकरणासाठी पूर्वी निश्तित केलेली कार्यपद्धती व मानके कायम राहतील तसेच योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या रुग्णालयांची संख्या मर्यादित राहणार नाही. डोंगराळ/आदिवासी/ वर नमूद केलेल्या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील सर्व रुग्णालयांना योजनेंतर्गत अंगीकृत होण्यासाठी निकष शिथिल करून कमीत कमी 20 खाटांची मर्यादा राहील. राज्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी अंगीकृत रुग्णालये संख्येची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. त्याचबरोबर ट्रॉमाकेअर,ऑन्कॉलॉजी इत्यादी विशेषज्ञ सेवांसाठी प्राधान्याने रुग्णालये अंगीकृत करण्यात येतील.  आवश्यकता भासल्यास  अपवादात्मक परिस्थितीत सीमावर्ती राज्यातील शासकीय रुग्णालयांना एका वर्षासाठी अंगीकृत करण्यात येईल.

मेडिकल प्रोसिजर्स

योजनेमध्ये पूर्वीच्या 971 प्रोसिजर्सपैकी अत्यंत कमी वापर असलेल्या प्रोसिजर्स वगळण्यात वगळण्यात आल्या असून काही नवीन प्रोसिजर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कर्करोग, बालकांवरील उपचार, वृद्धांवरील उपचार Hip & Knee Replacement,  तसेच सिकलसेल, अॅनिमिया, डेंग्यू,  स्वाइन फ्ल्यू इ. साठी नवीन उपचारांचा समावेश करून रक्तविकार शास्त्र (Hematology) या  विशेषज्ञ सेवेसह 31  विशेषज्ञ सेवांतर्गत एकूण 1100 प्रोसिजर्सचा (परिशिष्ट अ ) समावेश या योजनेमध्ये करण्यात  येत असून त्यामध्ये 127 पाठपुरावा सेवांचा समावेश केला.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट लाभार्थी

दारिद्र्य रेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका धारक व दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक (रु.1 लाखापयंत वार्षिक उत्पन्न असलेली ) कुटुंबे (शासकीय, निमशासकीय कर्मचारी व आयकरदाते वगळून)

औरंगाबाद, अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपुर विभागातील वर्धा असे एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रक शेतकरी कुटुंबे

शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी,  महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक तसेच अधिस्विकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब व अन्य लाभार्थी

संबधित प्रशासकीय विभागाकडून या लाभार्थी घटकांची अचूक आकडेवारी उपलब्ध करून घेऊन लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात येइल व या लाभार्थी घटकांना योजने अंतर्गत विमा संरक्षण उपलब्ध करुन दिले जाईल.

See also  LPG Gas Connection Riffle Booking Miss Call नविन गॅस कनेक्शन

लाभार्थी ओळख

लाभार्थ्यांची ओळख राज्य शासनाने निश्चित केल्यानुसार योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास देण्यात येणारे आरोग्य ओळखपत्र किंवा असंघटीत कामगार ओळखपत्र / स्मार्ट कार्ड किंवा राज्य शासन निर्धारित करील अशा इतर कोणत्याही पुराव्याच्या आधारे पटवली जाईल.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana information in Marathi language.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment