Sankranti of ST Employees Will be Sweet Now | ST कर्मचाऱ्यांची संक्रांत होणार आता गोड | नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर एसटी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे राज्य सरकारकडून 300 कोटी वितरित करण्यात आले आहेत. जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेले नव्हते. त्यामुळे सर्वत्र एसटी कर्मचारी आक्रमक झाले होते. यादरम्यान आज शुक्रवारी राज्य सरकारकडून कर्मचाऱ्या संदर्भात मोठी घोषणा करीत संक्रांत गोड करण्याचा निर्णय घेतला तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून आता 300 कोटी वितरित करण्यात आले आहेत. महाआघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यासाठी आंदोलन देखील केले होते. व प्रामुख्याने पगार वाढीची यात मागणी होती. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून सुद्धा त्यांच्या पदरी निराशाच दिसून येत आहे. राज्यात सत्तातरनंतरही कुठल्याच प्रकारचा बदल झालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारला असे म्हणणे आहे की “तुम्ही पगारवाढ तर सोडा, वेळेवर पगार सुद्धा होत नाही” याबाबत एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी दाखवली आहे. कर्मचाऱ्यांना 12 तारीख ओलांडून गेल्यानंतरही वेतन मिळाले नाही. असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार एसटी कर्मचाऱ्यांना असे सांगण्यात आले होते. की राज्य सरकारकडून न्यायालयात 7 तारखे दरम्यान पगार होईल. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी संतप्त झालेले आहे. आता राज्य सरकारकडून न्यायालयाचा अवमान सुरू असून शिंदे फडणवीस सरकारची कामगार विरोधी भूमिका उघड झाली. असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बिरगे यांनी केला होता.