Mai Jhukega Nahi… Allu Arjun Signature Style | मै झुकेगा नही.. अल्लू अर्जुन सिग्नेचर स्टाइल एका बाळाने केले

Mai Jhukega Nahi… Allu Arjun Signature Style अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपट रिलीज झाल्यापासून त्याच्या गाण्यांवर आणि संवादांवर हजारो रील बनले आहेत. त्याच्या गाण्यांच्या हुक स्टेप्सवरही लोक ठेका धरताना दिसतात. अनेकजण गाणी आणि डायलॉग्सवर रिल्स बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहे. यातच आता एका नवजात मुलाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. तर या लेखामध्ये त्याबद्दलची माहीती बघूया

नवजात बाळाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये एक नवजात बालक ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘मैं झुकेगा नहीं’ या प्रसिद्ध डायलॉगवर अभिनय करताना दिसत आहे. अल्लू अर्जुनने या मुलाचा व्हिडिओ पाहिला, तर तोही थक्क होईल. व्हिडिओमध्ये जन्मलेले बाळ अल्लू अर्जुनच्या सिग्नेचर स्टाइलशी मिळते-जुळते हातवारे करताना दिसतो.

नवजात मुलाचा हा स्वॅग पाहून सोशल मीडिया यूजर्स त्याचे फॅन झाले आहेत. काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये नवजात बाळाला कपड्यात गुंडाळलेले दिसत आहे. यादरम्यान तो ‘पुष्पा’ चित्रपटाची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये तुम्हाला पुष्पा चित्रपटातील ‘मैं झुकेगा नहीं’चे डायलॉग देखील ऐकायला मिळत आहेत.

हा क्यूट व्हिडिओ इंस्टाग्रामवर giedde नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली की, ‘आईने पुष्पा चित्रपट खूप पाहिला असेल.’ दुसर्‍याने कमेंट केली, ‘मैं झुकेगा नहीं.. चे सर्वात सुंदर व्हर्जन.’

See also  Grampanchayat Karmchari Vetan 2022 | ग्रामपंचायत कर्मचारी वेतनवाढ

Leave a Comment