Jejuri Khandoba Temple Live Darshan जेजुरी खंडोबा

‘येळ कोट येळ कोट जय मल्हारजेजुरीच्या खंडेराया विषयी Jejuri Khandoba Temple वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा देव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक जागृत प्रतीक आहे. खंडेरायाचे संस्कृत नाव ‘मल्लारी मार्तंड भैरव’ हे आहे. खंडेरायाची लोकप्रियता खूप मोठी आहे.

Jejuri Khandoba Temple जेजुरी

धनगरा पासून तर देशस्थ ब्राह्मण पर्यंत समाजाच्या सर्व थरात त्यांची उपासना प्रचलित आहे. या मंदिराची दोन भागात विभागणी केली आहे. पहिला भाग हा मंडपाचा आहे. दुसरा भाग हा गर्भगृह असून तेथे खंडोबाचे स्थान आहे. हे मंदिर हेमाडपंथीय आहे. या मंदिरात 28 फूट आकाराचे पितळाचे कासव आहे.

जेजुरी (Jejuri ) गडाचे ऐतिहासिक महत्व

जेजुरी हा गड सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये घनदाट जंगलात आहे. तसेच ही भूमी लग्न मुलीची तपोभूमी म्हणून दक्षिण मध्ये मणिमल्ल राक्षसाचे छळाला कंटाळून विस्थापित झालेल्या ऋषीनी येथील लव आश्रमात आश्रय घेतला व मल्ल राक्षसांचे छळापासून मुक्त करण्याची शंकरांना विनवणी केली.

जेजुरी खंडोबा लाईव्ह दर्शनासाठी येथे क्लिक करा

शिव शंकरांनी या भूमीवर मार्तंड भैरव अवतार धारण केला. ही भुमी पवित्र झाली. मणि मल्ल वधा नंतर मार्तंडानी येथेच आपली राजधानी वसवली आणि ही भुमी जयाद्री म्हणून प्रसिद्ध पावली. मार्तंड भेंरवाचे अवतार कार्य संपले आणि अनंतकाळ लोटला कडेपठारी प्रस्थानपिठी मार्तंड भेंरव मंदिरात नांदतच होते.

येथे ही राजधानी ठिकाणी मार्तंड भेंरवाचे मंदिर उभे राहिले. मंदिरांचे व्यवस्थेसाठी दाने इनामे दिली गेली आणि जयाद्रीची जेजुरी नगरी वसली. लोकश्रद्धा भक्तीतून तिचे वैभव वाढत राहिले.

येथे अनाम भक्तांनी मंदिराची अनेक कामे केली व भव्य मंदिर उभे राहिले. गडावरील मंदिराचे गर्भगृहाचे बाहेरील बाजूस असेलेल्या यक्षमूर्ती खाली मात्र एक भक्त आपली नाममुद्रा सोडून गेला. इ.स. 1246 चा हा येथील ज्ञात असलेला पहिला शिलालेख आहे.

इ.स. 1511 मधेच चेंतन्य महाप्रभू नामक बंगाली संताने जेजुरीस भेट दिल्याचे वर्णन आहे. या वर्णनात येथे मुरुळीची संख्या मोठी होती व महाप्रभूनी त्यांचे प्रबोधन केल्याचा उल्लेख आहे. एक बंगाली महापुरुष जेजुरीस भेट देतो. यावरून याकाळी जेजुरी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होती.

See also  Indian Post Requirement 2023 |  इंडियन पोस्ट रिक्वायरमेंट 2023 |

प्रसिद्ध पावत असलेल्या या जेजुरीच महात्म्य शब्दबद्ध करण्याच काम याच काळात म्हणजे 1540 च्या दरम्यान ज्ञानदेव या लेखकाने ‘जयाद्री महात्म्य’ या ग्रंथाचे माधमातून केले. इ.स. 1608 मध्ये येथील लवथळेश्वर मंदिराचे दुरुस्तीचे काम झालेचें तेथील शिलालेखा वरून समजते.

मंदिरातील वादाचा निवडा

इ.स. 1651-1652 च्या दरम्यान जेजुरी मंदिराच्या पुजाऱ्यामध्ये वादविवाद सुरु झाले व ते जिजाऊ साहेबाकडे निवाड्या साठी गेले. जिजाऊनी निवाडा देऊन वाद मिटवले, पुढे इ.स. 1653 मध्ये हाच निवाडा शिवाजी महाराजांनी कायम केला.

मल्हारीचा जयघोष

सदानंदाचा येळकोट, येळकोट, येळकोट जयमल्हार, खंडोबाच्या नावानं चांगभलं, अशी आरोळी अन् सोबत उधळलं जाणारं भंडार-खोबरं हे चित्र दिसलं, की लोक देव खंडोबा, मल्हारी, म्हाळसाकांताची आराधना सुरू आहे, हे लक्षात येते.
या मल्हारी-म्हाळसाकांताची अनेक स्थानं असली, तरी पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा जोतिबा अन् जेजुरीचा खंडोबा, हीच ओळख जन-मानसांत रुजली आहे.

खंडेरायाची मुळ ठिकाण

जेजुरगडाच्या मागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार हे खंडोबाचं मूळ स्थान आहे. याची माहिती फारशी नसते. जेजुरीचं दर्शन घेऊन आल्याचं सांगणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर कडेपठारचं मूळ स्थान पाहिलं का? असं विचारल्यावर मात्र ‘हे काय नवीन,’ अशी भावना दिसते. म्हणून जेजुरीला जाणाऱ्या भक्तांनी खंडोबाचे हे मूळ ठिकाण पाहावे. जेजुरीपेक्षा इथं पोहोचणे थोडं कठीण असलं, वाट थोडी अवघड असली, तरी देवाच्या आद्यस्थानाचं दर्शन त्यांना सुखावणारं असेल, यात शंका नाही.

भंडाऱ्याच्या पिवळ्याधम्मक रंगाने उजळून निघालेल्या जेजुरगडाचा परिसर म्हणूनच ‘सोन्याची जेजुरी’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कुणी दिवटी-बुधली घेऊन देवाला ओवाळण्यासाठी आलेले असतात, तर कोणी वाघ्या-
मुरळींकडून ‘जागरण-गोंधळ’ घालण्यासाठी येतात. जेजुरी आणि कडेपठारावर दिसणारी दृश्यं नेहमीची. त्यातही, सणासुदीला, चंपाषष्ठी अथवा सोमवती अमावस्येला जेजुरीला होणाऱ्या लाखोंच्या गर्दीपेक्षा कडे पठारावरील देवाच्या आद्यस्थानी तुलनेनं निवांत दर्शन होत असल्याने तेथे जाणाऱ्या भाविकांची संख्याही भरपूर आहे.

जेजुरी विषयी पौराणिक कथा

मणि आणि मल्ल या दैत्यांनी पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. सर्व सामान्यांसह ऋषी-मुनींना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. नंतर सर्वांनी मिळून शंकराची आराधना केली. सर्व योगी-मुनींना वाचविण्यासाठी शंकराने खंडोबाचा अवतार धारण केला आणि दैत्यांचा संहार केला. अशी कथा प्रचलित आहे. मार्तंडभैरवाचे रूप घेतलेल्या शंकराने दैत्यांचा संहार करण्यासाठी हातात खड्ग घेतले आणि कडेपठारावर त्यांचा वध केला म्हणून खंडोबा हे नाव पडलं. तर, म्हाळसेचा कांत म्हणून म्हाळसाकांत आणि मल्लांचे हरण केले म्हणून मल्हारी, अशी नावे प्रचलित आहेत. अशी माहिती देवस्थान समितीचे सदानंद आगलावे आणि रामचंद्र दीडभाई यांनी दिली.

See also  MPSC Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 |

जेजुरी Jejuri गडावर कसे चढायचे?

जेजुरी गडावर चढण्यासाठी कडेपठाराच्या डोंगराच्या पायथ्याला वाहनतळ आहे. तेथून, पायऱ्यांची चढुण पार करून आपण कडे पठारावरील मंदिराच्या मूळ प्रांगणात पोहोचतो. जेजुरीच्या तुलनेत मंदिर लहान असले, तरी आकर्षक आहे. या पूर्वाभिमुखी मंदिराच्या बाहेर मेघडंबरीत नंदी, तर पुढे कासव आहे. जेजुरीप्रमाणे या मंदिराचेही सोपा, सभामंडप आणि गाभारा, असे तीन भाग आहेत.

गाभाऱ्यात पश्चिम भिंतीतल्या देवळीत खंडोबाची आसनस्थ मूर्ती आहे. बैठकीच्या डाव्या-उजव्या बाजूला मणि आणि मल्ल यांची मुंडकी आहे. मूर्तीच्या हातात खड्ग, त्रिशूळ, डमरू आणि परळ अशी अस्त्रे तर, देवळीसमोरील जमिनीवर दोन स्वयंभू, खडबडीत व अनियमित आकाराची खंडोबा व म्हाळसा यांची लिंगं आहेत. त्याशिवाय, खंडोबा व म्हाळसा आणि बाणाईच्या उभ्या मूर्तीही आहेत.

जेजुरीचा (Jejuri ) महिमा

मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी उत्सव सोमवती अमावस्या, चैत्र, माघ आणि पौष पौर्णिमा, नवरात्री आणि दसरा, हे सण जेजुरीसह कडेपठार येथे साजरे केले जातात. सोमवती अमावस्येला जेजुरी गडावरील पालखी कऱ्हा नदीच्या तीरावर स्नानासाठी जाते. तर दसऱ्याच्या रात्री जेजुरी आणि कडेपठारावरील देवांच्या पालखींची मधल्या दरीमध्ये देवभेट होते.

जेजुरीची पालखी खालच्या बाजूला, तर कडेपठाराची पालखी ऐन मध्यरात्री कड्यावर विसावा घेते. तेथे, आरशातून देवभेट होते आणि पुन्हा पहाटेपर्यंत दोन्ही पालख्या मूळ स्थानी पोहोचतात. वर्षभर या दोन्ही गडांवर तिन्ही त्रिकाळ पूजा-विधी होतात. पहाटे 5 वाजता पूजा, दुपारी 12.30 वाजता धूप आरती आणि रात्री 9 वाजता शेजारती केल्या जातात. श्रावणात अभिषेक सांगण्यासाठी मोठी गर्दी होते.

खंडरायाचा चमत्कार (Khandoba)

धनगरांची पोरे विश्रांतीसाठी बसली असता खंडोबा तेथे आला. पण आपला भक्त येत आहे, पाहून तो अदृश्य झाला. इतर मुलांनी खंडोबाच्या या येण्या जाण्याबद्दल भायास सांगितले. खंडोबाचे दर्शन चुकल्याने भाया अस्वस्थ झाला. खंडोबा जेथे बसला होता. त्या घोंगड्याखाली हळदीचे लिंग सापडले. तेव्हा भायाने त्या लिंगाची प्रार्थना सुरू केली.

See also  Post Office Recruitment 2023 Maharashtra | पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र |

वडिलधाऱ्यानी जेव्हा पोरांच्या कथेवर विश्वास न ठेवता लिंग फेकून दिले, तेव्हा लिंगाचे रूपांतर एका मौल्यवान मण्यात झाले आणि वडील माणसे विचारात पडले. इकडे कोणाच्या भक्तीमुळे खंडोबा प्रकट झाला हा वाद सुरू झाला. तेव्हा ज्या कोणाची कुऱ्हाड लिंगात रुतेल त्याला खंडोबा आणण्याचे श्रेय मिळेल असे ठरले.

तेव्हा भायाची कुऱ्हाड रुतली आणि त्यातून रक्तदुधाचा प्रवाह सुरू झाला. यानंतर देव स्वतः प्रकट झाला व मरळ घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिंपडल्यास हा प्रवाह थांबेल असे सांगितले आणि त्याप्रमाणे हा रक्तप्रवाह थांबला. तेथे मंदिर उभारण्यात आले. पुढे मंदिराच्या वहिवाटीचा वाद उत्पन्न झाला होता.

नंतर ही कथा पेशवे दरबारात पुरावा म्हणून मांडण्यात आली होती. उमाजीराजे नाईक हे खंडोबाचे परम भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना खंडोबा प्रसन्न असल्याचेही सांगितले जाते. त्यांच्याकडे खंडोबाचे कडे असल्याने उमाजीना इंग्रज फाशी देत असताना फाशी बसली जात नव्हती. कडे काढल्यानंतर नाईकांना फाशी बसली असेही बोलले जाते. तुम्ही या जेजुरी गडाला अवश्य भेट द्या.

“तुम्हाला आमचा लेख जेजुरी Jejuri Khandoba Temple विषयी कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment