महाराष्ट्र विविध साधनसंपत्तीने नटलेला असून त्यामध्ये वेगवेगळे पर्यटन स्थळ देखील आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळ म्हणजेच किल्ले, गड आहे. अनेक राजे महाराजे यांच्या काळातील हे बहुमोल स्थळ आहेत. जे आज आपल्यासाठी पर्यटन स्थळ म्हणून उपलब्ध आहेत. या स्थळांना तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या. तर चला महाराष्ट्रातील किल्ल्याविषयी माहीती पाहूया.
अर्नाळा Fort in Maharashtra
सन 1530 मध्ये पोर्तुगीजांनी हे बेट जिंकून घेतले. 1737 मध्ये, सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला 1737 मध्ये मराठयांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. 1817 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 4 हेक्टर असून, तटबंदीमध्ये असलेले एकूण नऊ बुरूज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला तीन दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे.
या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दोन बुलंद बुरूज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील शिलालेखआढळतो. बाजीराव अमात्य सुमती आज्ञापिले शंकर. पाश्चात्त्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा. या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो.
शिवनेरी किल्ला Fort in Maharashtra
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्लामहाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे, इ.स. 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.
शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. 1673 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
नरनाळा किल्ला Fort in Maharashtra
हा किल्ला अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण 24 किमी वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे. अकोल्यापासून याचे अंतर 66 किमी आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट वयाघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासुन गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात.
पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही. गड जमीनीपासून 3161 फुट उंच आहे. गडाचा विस्तार हा 382 एकर असून गडाच्या कोटाची लांबी 24 मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुदा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरीदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखल्या जात असून जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.
गडाच्या प्रवेशाला 5 दरवाजे लागतात. त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानुर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो.
गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गुळफुटाने वाहावे व तडक गड उतरावा. तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.
भुईकोट किल्ला Fort in Maharashtra
भुईकोट किल्ल्याची बांधणी व किल्ल्यासाठी पसंत केलेली जागा त्यावेळच्या युद्ध शास्त्राच्यादृष्टीने अभेद्य मानली जाते. ब्रिटीश काळात 12 राष्ट्रीय नेते या किल्ल्यात स्थानबद्ध होते. त्यामुळे या किल्ल्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होणे गरजेचे आहे. 22 बुरुज व 1 मैल 80 यार्ड परिघ असलेला नगरचा भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित होण्याची प्रतीक्षा नगरकरांना व इतिहासप्रेमींना आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, आचार्य कृपलानी, गोविंद वल्लभ पंत अशा तब्बल 12 राष्ट्रीय नेत्यांचा पदस्पर्श अनुभवलेल्या भुईकोट किल्ल्यात हे नेते स्थानबद्ध असलेल्या भागात नेता कक्ष केला गेला आहे. तेथे नगरकर, इतिहास प्रेमी व पर्यटक नेहमी जातात.
पण किल्ला राष्ट्रीय स्मारक झाले तर या नेता कक्षासह या किल्ल्याच्या आतील विविध महाल विकसित होतील व पर्यटकांसमोर अधिक आकर्षक आणि दिमाखदारपणे आपला इतिहास कथन करतील, असा विश्वास आहे. भुईकोट किल्ल्याला 530 वर्षांचा इतिहास आहे. 28 मे 1490 मध्ये हा किल्ला बांधला गेला. त्यानंतर या किल्ल्याच्या परिसरात नागरी वस्ती वसण्यास सुरुवात झाली. त्यामुळे 28 मे 1490 हा अहमदनगर शहराचा स्थापना दिनही मानला जातो.
शहरातील स्वयंसेवी संस्था तसेच इतिहास प्रेमींकडून या दिवशी शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळांना अभिवादनही केले जाते. या शहराचा संस्थापक अहमद निजामशाह याने 1490 मध्ये बहामनी साम्राज्याच्या सैन्याचा नगरमध्ये पराभव केला होता. त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी स्वतःसाठी ‘कोटबाग निजाम’ नावाचा महाल बांधण्याचे काम सुरू केले.
28 मे 1490 या दिवशी या महालाच्या म्हणजेच भुईकोट किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाल्याचे मानले जाते. पुढे हुसेन निजामशहा या अहमदशाहच्या नातवाने किल्ल्याचे मजबुतीकरण केले. किल्ल्याची तटबंदी उभारताना 22 बुरुज केले व त्या बुरुजांना निजामशाहीतील प्रसिद्ध वजीर, सेनानी व मुत्सद्यांची नावे दिली.
हरिश्चंद्रगड Fort in Maharashtra
या गडाचा इतिहास आश्चर्यकारक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत. हरिश्चंद्रगडाला तर दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे.
साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नी -पुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. 1747-1748 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.
हरिश्चंद्र, तारामती आणि रोहीदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. महाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यां -पासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे 12 व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रितील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.
पन्हाळा किल्ला Fort in Maharashtra
कोल्हापूरच्या सभोवताली पन्हाळा, विशाळगड, महिपळगड आणि कलंदिगड ह्या गडांच्या जोड्या आहेत. येथे तुम्ही तीन मोठ्या ईमारती पाहू शकता. त्याला ‘अंबरखाना’ म्हणतात, हे एक धान्याचे कोठार आहे. त्याची धान्य साठवुण ठेवण्याची क्षमता 50,000 पाऊंड आहे, आत्ता हे एक पर्यटन स्थळ आहे.
पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूर पासुन 20 किमी अंतरावर आहे. समुद्रसपाटी पासुन 977.2 मी ऊंचीवर असलेले, पन्हाळा हे मोहक प्रेक्षनिय स्थळ आहे. जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो. पन्हाळा किल्ल्यामुळे व इतर डोंगरामुळे करड्या किंवा पांढर्या रंगाचा वारसा येथे जपला आहे.
हा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे. हा किल्ला रक्षण करणार्या 7 किमी ऊंचीच्या भक्कम भिंतींच्या आतील भागामध्ये आहे. शिवाजी महाराजांची आठवण करूण देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासीक किल्ला आहे.
सिध्दी जोहारने शिवाजी महाराजांच्या पन्हाळ गडाला चार महिने वेढा दिला होता, एका पावसाळ्या रात्री ह्या वेढ्यातुन सुटुन शिवाजी महाराज विशाळगडला गेले, सिध्दी जोहारने त्यांचा पाठलाग केला, तेंव्हा बाजीप्रभु देशपांडे ह्यांनी पावनखिंड येथे त्याला आढवले, त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहचु शकले, परंतु बाजीप्रभु देशपांडे येथे धारातिर्थ पडले व मरण पावले.
“तुम्हाला आमची Fort in Maharashtra माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.”