सेतू अभ्यासक्रम एन सी ई आर टी Setu Syllabus NCERT

Setu Syllabus NCERT सेतू अभ्यासक्रम – मागच्या वर्षी शैक्षणिक सत्र 2020 – 21 या कालावधीमध्ये कोठे ऑनलाईन शिक्षण झाले तर कोठे नाही परंतु आता शैक्षणिक वर्ष 2021 – 22 सुरू झालेले असून मागील सत्रात ‘शाळा बंद आणि शिक्षण सुरू’ उपक्रमात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्व स्तरांमधून प्रयत्न झालेले दिसतात. असे असून सुद्धा शिक्षक हे विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचू न शकल्यामुळे विद्यार्थ्यांना विषयानुरूप क्षमता संपादित होण्यामध्ये फार अडचणी विमान होण्याची शक्यता आहे त्यामुळेच मागील वर्गांच्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी यासाठी ‘सेतू अभ्यासक्रम तयार केला गेलेला आहे.

sant namdev information in marathi language

सेतू अभ्यासक्रम एन सी ई आर टी Setu Syllabus NCERT

अशा स्वरूपाची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एनसीईआरटीने तयार केलेल्या शेती अभ्यासक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमांमध्ये दिली आहे.

सर्वच व्यवस्थापना मधील वर्ग दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 1 जुलै ते 14 ऑगस्ट या 45 दिवसांच्या कालावधीमध्ये हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून मराठी आणि उर्दू माध्यमाच्या मराठी गणित इंग्रजी विज्ञान हिंदी व सामाजिक शास्त्र विषयांसाठी हा उजळणी अभ्यासक्रम असणार आहे एनसीईआरटीने तयार केलेल्या शेती अभ्यासक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, तसेच राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी हे सुद्धा उपस्थित होते.

तयार करण्यात आलेल्या शेतु अभ्यासक्रम ॲप मध्ये दिवस निहाय कृतीपत्रिका देण्यात आलेल्या असून त्या विद्यार्थी केंद्रित आहेत कृती केंद्रित आहेत तसेच अध्ययन निष्पत्ती वर आधारित सुद्धा आहेत विद्यार्थी याद्वारे स्वयंअध्ययन करू शकतील तसेच शेती अभ्यासक्रमांमध्ये ठराविक कालावधीनंतर तीन चाचण्या देण्यात आल्या असून शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीने सोडून घेऊन त्या तपासाव्यात या चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.

See also  RTE 25% Admission Form Maharashtra 2022 | आरटी प्रवेश पोर्टल महाराष्ट्र 2022

या अभ्यासक्रमाद्वारे (सेतू अभ्यासक्रम) प्रत्येक वंचित घटकापर्यंत शिक्षण घेऊन जाण्याचा प्रयत्न हा करण्यात येणार आहे म्हणजे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थी शिकत राहतील असे बच्चू कडू यांनी सांगितले. या अभ्यासक्रमाची कार्यवाही आपल्या स्तरावरून काटेकोरपणे करण्यात यावी अशी सूचना सुद्धा  शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात आलेली आहे.

आमच्या मराठी स्कूल Marathi School या ब्लॉगला अवश्य भेट द्या

5 thoughts on “सेतू अभ्यासक्रम एन सी ई आर टी Setu Syllabus NCERT

Leave a Reply

Your email address will not be published.

x
error: Content is protected !!