Bhimashankar भीमाशंकर ज्योतिर्लिंग

भीमाशंकर Bhimashankar हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर, कुंभकर्णाच्या मुलामुळे झाली, असे पुराणात आढळते. श्रावण महिन्यात शिव उपासना आणि मंदिरामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे.

Bhimashankar भीमाशंकर ज्योतिर्लिंग

शिव भक्त या महिन्यात आपल्या सामर्थ्य आणि वेळेनुसार ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. भीमाशंकर हे ठिकाण पुण्याजवळून 127 किमी अंतरावर आहे. तर त्याला मग पाहूया भीमाशंकर विषयी काही खास गोष्टी व माहिती.

भीमाशंकर मंदिर Bhimashankar Temple

भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगा पैकी एक आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे. भीमाशंकर हे मंदिर खूप प्राचीन आहे जवळजवळ बाराशे वर्षांपूर्वी या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे.

मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं दिसून येते. मंदिर परिसरात शनि मंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख आढळतो.

असे स्थापित झाले हे Bhimashankar ज्योतिर्लिंग

प्राचीन कथेनुसार, कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते. कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती. तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला, परंतु त्याची पत्नी कर्कटी तेथेच राहिली, काही काळानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला.

रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजे. त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला. भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले.

त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता. एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमने राजाला महादेवाची नाही, तर माझी पूजा कर असे सांगितले. राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही. यामुळे क्रोधीत झालेल्या भीमने राजाला बंदी बनवले. राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली.

भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला असे केल्याने शिवलिंगातुन स्वतः महादेव प्रकट झाले. भगवान शिव आणि भीममध्ये घोर युद्ध झाले. युद्धमध्ये भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर देवतांना महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले. या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे भीमाशंकर असे नाव पडले.

See also  Ashtavinayak Ganpati अष्टविनायक गणपती नावे

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात  रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर,
बिबटया असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते.

बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथे पाहण्यासारखी बरीच ठिकाण आहेत तर त्या विषयी आपण माहिती पाहूया.

गुप्त भीमाशंकर Bhimashankar

भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.

कोकण कडा :

भीमाशंकर मंदिरा जवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे 1100 मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकड -चा अरबीसमुद्रही दिसू शकतो.

सीतारामबाबा आश्रम Sitarambaba Ashram

कोकण कड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते.

नागफणी Nagfani

आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटी पासून 1230 मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते.  कोकणातून हे शिखर नागाच्या  फण्याप्रमाणे दिसते, म्हणून नागफणी असे नाव पडले आहे. भिमाशंकर हे खुप सुंदर ठिकाण आहे. भीमाशंकर येथील भीमा नदीचा उगम पाहणे खरोखरच एक अविस्मरणीय आनंद आहे.

भीमाशंकर हे भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे.

See also  Baba Amte बाबा आमटे

हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर 1729 असे इंग्रजीत नोंद आहे.

हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत.

नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभाऱ्यातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले.

भीमाशंकर अभयारण्य Bhimashankar Sanctury

भीमाशंकर हे ठिकाण अतिशय घनदाट अरण्याने वेढलेला असून ते सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत आहे. सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले असल्याने हे ठिकाण समुद्रसपाटी पासून सुमारे 3250 फूट उंचीवर आहे. 1984 साली या घनदाट जंगलाची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात.

ती अभयारण्यात शेकरु या प्राण्यासाठी राखीव असून तिचे नाव उडणारी खार सुद्धा आहे. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.

भीमाशंकरची सैर कशी कराल?

भीमाशंकर हे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले असून, येथे सदाहरित जंगलामुळे या परिसरात पायी फिरणे हा वेगळाच सुखद अनुभव आहे. पावसाळ्यात तर त्याचे सौंदर्य अधिकच खुलते. हिरव्याकंच पर्णभाराने लगडलेल्या वृक्षांवर गोड कूजन करणारे बुलबुल, फुलाफुलांवर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, आकर्षक रंगांनी मन आकर्षित करून घेणारे तऱ्हेतऱ्हेचे कीटक, या सर्वांचे निरीक्षण करणे हा एक विलक्षण अनुभव असतो.

See also  Hindu Religion and It's Culture | देवदर्शनासाठी मंदिरात जाता मग प्रथम पायरीला नमस्कार का करतात?

रोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच वाटावा, यात काहीच आश्‍चर्य नाही. हिवाळ्यात धुक्‍याच्या तरल पडद्याआडून हळूच डोकावणारी वृक्षवल्लरी क्षणार्धात शहरी शीण आणि ताणतणाव घालवून टाकते. या संपूर्ण परिसराला लाभलेल्या हिरव्या कोंदणामुळे या पवित्र भूमीला भाविकांबरोबरच निसर्ग प्रेमींचाही स्वर्ग म्हणायला हरकत नाही.

भीमाशंकर नावाचा इतिहास History of Bhimashankar

भीमाशंकर या ठिकाणी पौराणिक गोष्टी व त्यावरून पडलेले या ठिकाणाचे नाव या मागची एक कथा ऐकायला मिळते. ती म्हणजे पुराणात त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकर विश्रांतीसाठी येथे आले असता, तेथे अयोध्येचा ‘भीमक’ नावाचा राजा तप करीत होता. भगवान शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले.

त्यावेळी त्याने शंकराला आलेल्या घामाच्या धारांची नदी होऊ दे, असा वर मागितला व त्याप्रमाणे भीमेचा उगम झाला व भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा हे नाव पडले, अशी आख्यायिका आहे.

आणखी अशीच एक दुसरी कथा : भीमाशंकर या ठिकाणी बाबतीत आढळून येते ती म्हणजे त्रिपुरासूर नावाच्या दैत्याने या भागात फारच धुमाकूळ घातला होता. त्याचा नाश करण्यासाठी भगवान शंकरांनी प्रचंड असे भीमरूप धारण केले. अनेक रात्र चाललेल्या या युद्धात त्रिपुरासूराचा वध झाला. त्यावेळी भगवान शंकर घामाघूम होऊन येथील शिखरावर बसले. त्यांच्या अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारेतून भीमा नदी उत्पन्न झाली.

भीमाशंकर येथे कसे जावे How to go to Bhimashankar

भीमाशंकरला रस्त्याने जायला पुणे-नगर रस्त्यावरच्या मंचरला फाटा आहे. मुंबईहून हे अंतर अडीचशे-पावणेतीनशे किमी इतके आहे. पुण्याहून भीमाशंकर 168 किमी आहे.

“तुम्हाला आमचा लेख भीमाशंकर Bhimashankar विषयी कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे सुद्धा जरूर वाचा 

Leave a Comment