Ashtavinayak Ganpati शुभकार्याची सुरुवात करताना गणपतीची प्रथम पूजा केली जाते. तसेच गणपती ही महाराष्ट्राचे प्रिय आराध्य दैवत आहे. आपले इच्छित कार्य शुभ व्हावित यासाठी प्रथम गणपतीचे पूजन करून त्याचा शुभ आशीर्वाद घेतला जातो.
Ashtavinayak Ganpati अष्टविनायक गणपती नावे
अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीचे 8 देवळे आहेत. हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणे आहेत व आजच्या धावपळीच्या आयुष्यात या आठ गणपतीच्या मंदिरांना भेट देण्याने मनाला शांतता वाटते. अष्टविनायक हा शब्द कष्ट आणि विनायक अशा दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती आहे.
कोणत्याही शुभकार्याची सुरूवात करण्याआधी सर्व प्रथम गणपतीचे पूजन केले जाते. कारण विद्येचे दैवत असलेला हा गणपती सर्व विघ्न दूर करून समृद्धी प्रदान करतो व मंदिर निसर्गरम्य अशा ठिकाणी बसले आहेत. ही आठ मंदिरांची माहिती आपण पाहणार आहोत.
Ashtavinayak Ganpati मंदिर मोरगाव, रांजणगाव, थेऊर लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महाड, पुणे, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यात आहेत. 8 मंदिरांपैकी 6 पुणे जिल्ह्यात आणि दोन रायगड जिल्ह्यात असून सुद्धा पुण्याजवळच आहेत. महाराष्ट्रातील आठ गणपती क्षेत्रातील गणपतीना अष्टविनायक असे म्हटले जाते. त्यांची नावे स्थाने व जिल्हे या विषयी आपण पाहणार आहोत त्यांची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत.
दगडूशेठ गणपती पुणे लाईव्ह दर्शनासाठी येथे क्लिक करा
1) मोरेश्वर , मोरगाव पुणे.
2) सिद्धिविनायक सिद्धटेक नगर 3)बल्लाळेश्वर पाली कुलाबा वरद, 4)विनायक महड, कुलाबा
5) चिंतामणी थेऊर, पुणे
6) गिरिजात्मज लेण्याद्री, पुणे
7) विघ्नेश्वर ओझर, पुणे
8) श्री गणपती रांजणगाव, पुणे
अशी त्यांची ठिकाण आहे. त्यांच्या विषयी आता सविस्तर माहिती आपण पाहूया.
1) मोरेश्वर Moreshwar
मोरेश्वर हा गणपती अष्टविनायकां -पैकी पहिला गणपती आहे व तसेच हा गणपती मोरगावचा मोरेश्वर गणपती संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हटले जाते. तोवर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू मंदिर आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात निर्माण केले, असे म्हटले जाते.
मंदिरा जवळच कऱ्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आपल्याला दिसते. श्री मोरेश्वरच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूज सदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून केलेले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरेगाव हे ठिकाण आहे. मोरगाव हेरावर आहे. तर बारामती पासून 35 किमी अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगाव पासून आगरी 17 किमी अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोडे यांनी बांधलेले आहे. त्यांचे वंशज पिरंगुट या गावी आजही राहात आहेत.
2) श्री चिंतामणी अष्टविनायक Shri Chintamani
थेऊरचा Ashtavinayak Ganpati हा आठ अष्टविनायकांपैकी श्री चिंतामणी दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी असे म्हटले जाते. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत.
पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. त्यांच्या बरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे
पुणे-सोलापुर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यांवर पुण्यापासून तीस किमी अंतरावर आहे पुण्यापासून बसेसची सोय सुद्धा तिथे उपलब्ध आहे. तसेच तिथून जवळच उरुळी कांचन महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.
3) श्री अष्टविनायक Ashtavinayak
सिद्धटेकचा श्री अष्टविनायक हा गणपती श्री सिद्धिविनायक या नावाने तिसरा गणपती म्हणून ओळखला जातो. हा गणपती उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक आहे. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे मंदिर स्वयंभू आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. या मंदिरात पितळी मखर असून त्या भोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंड पासून 19 किमी अंतरावर आहेत. तर राशीन पासून ते 20 किमी अंतरावर आहे. दौंड वरून गेल्यास भीमा नदी लागते. ती ओलांडायला होड्या असतात. मात्र सध्या पूर्ण झालेला आहे.
4) रांजणगावचा गणपती Ranjangaon Ganpati
अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. गणपती स्थान आपल्याला दिसून येते. ती म्हणजे अशी की त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या.
या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला व शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून याला गणेश त्रिपुरारिवदे महागणपती असे म्हटले जाते.
Ashtavinayak Ganpati पैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधला गेलेला आहे. हे श्री महागणपतीचे स्थान दहाव्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी गणपतीची मूर्ती आहे.
5) ओझरचा विघ्नेश्वर गणपती Ojhar Vighneshwar
अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायका -पैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्री च्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो.
म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे, असे म्हटले जाते. या मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे.
थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात दिसून येतो. या मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था केलेली आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान यांचे पासून 14 कि.मी. वर तर पुण्यापासून 85 कि.मी. अंतरावर आहे.
येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हा देखील येथून जवळच आहे.
6) श्री गिरिजात्मज Girijatmaj
लेण्याद्री Ashtavinayak Ganpati पैकि 6 गणपती आहे. त्याचे नाव श्री गिरीजात्मज आहे. शिवनेरीच्या सानिध्यात जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे असे म्हटले जाते. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे.
मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नर पासून 7 किमी अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे 97 किमी अंतरावर हे ठिकाण आहे.
7) वरदविनायक Varadvinayak
महडचा वरदविनायक हा Ashtavinayak Ganpati पैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे.
एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ.स. 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली, खालापूरच्या दरम्यान आहे.
8) बल्लाळेश्वर अष्टविनायक Ballaleshwar
पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात खूप मोठी घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.
हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. पाली खोपोलीपासून 38 किमी अंतरावर आहे. तर पुण्यापासून 111 किमी अंतरावर आहे.
खोपोली पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल , गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकण पासून पालीस रस्ता जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठ ही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
Ashtavinayak Ganpati च्या आठही ठिकाणी जेवनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रे बरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायका ची कीर्ती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.
याव्यतिरिक्त, विदर्भातील आठ गणपती अष्टविनायक या विषयी आपण माहिती पाहणार आहोत. या अष्टविनायकां प्रमाणेच विदर्भात देखील गणपतीची आठ महत्त्वाची ठिकाण आहेत. या मंदिरांच्या संचाला विदर्भातील अष्टविनायक असे म्हटले जाते.
====================
1) टेकडी गणपती, नागपूर,
2) शमी विघ्नेश, आदासा
3) अष्टदशभुज, रामटेक
4) भृशुंड, मेंढा
5) सर्वतोभद्र, पवनी
6) सिद्धिविनायक,
7) चिंतामणी, कळंब
8) वरदविनायक, भद्रावती
==========================
टेकडी गणपती Tekdi Ganpati
हा विदर्भातील अष्टविनायकातील पहिला समजला जाणारा गणपती आहे. नागपूरमध्ये असलेले हे प्रसिद्ध देवस्थान. पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूररचित प्रतिमा आहे. स्वयंभू गणेशाची ही मूर्ती एका प्राचीन मंदिराच्या भग्न झालेल्या अवशेषांमध्ये मिळाली असे सांगितले जाते. सुरुवातीला इथे अगदी साधेसुधे मंदिर होते.
परंतु, आता हे एक भव्य देवस्थान झालेले आहे. मंदिराचा गाभारा म्हणजे एक मोठा हॉल असून त्यात मध्यावर झाड आणि त्याखाली गणपतीची मूर्ती आहे. मंदिराची लोकप्रियता खूपच मोठी आहे. पहाटे साडेचार वाजता पासून येथे पूजा सुरू होते. मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
प्राचीन स्थंडिलग्राम नावाने प्रसिद्ध असलेल्या मेंढा या गावी वैनगंगा नदीच्या तीरावर विदर्भातील अष्टविनायकांपैकी हा गणपती वसलेला आहे. या गणपतीच्या पायाशी नागाचे वेटोळे, त्यावर गणेशाचे वाहन उंदीर आणि त्यावर हा गणपती विराजमान झालेला आहे. मूर्ती चतुर्भुज असून, एक हात वरद मुद्रेत तर इतर हातात अंकुश, पाश आणि मोदकांनी भरलेले पात्र दिसते. मूर्तीच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग शिल्पित केलेला दिसतो.
अठरा भुज गणपती, रामटेक 18 bhuj Ganpati
वनवासात असताना रामांचा मुक्काम रामटेक या ठिकाणी होता असे समजले जाते. सापुतारा पर्वतरांगेवर वसलेले हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य आहे. विदर्भातील अष्टविनायकातील एक स्थान यातलेच एक आहे आणि ते म्हणजे अष्टदशभुजा गणपतीचे मंदिर. नावाप्रमाणेच इथली मूर्ती अत्यंत वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे.
अठरा हातांची गणपतीची मूर्ती काहीशी दुर्मीळच म्हणायला पाहिजे. अठरा विज्ञानाचे ज्ञान असलेला हा गणपती असल्यामुळे याला अठरा हात दाखवले आहेत, असे स्थानिक सांगतात. तर अठरा सिद्धींमुळे या गणपतीचे पूजन विघ्नेश्वर म्हणून करतात, असे पुराणात सांगितले आहे. उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे याला सिद्धिविनायक असेही म्हटले जाते.
शमी गणेश Shami Ganpati
शमी गणपतीचे एका उंच टेकडीवर हे पुरातन गणेश मंदिर आहे. ही मूर्ती नृत्यगणेशाची आहे, असे अभ्यासक सांगतात. ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. महापाप, संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राही त्राही करून सोडले होते. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर-पार्वतीरूपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली.
तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या तीनही दानवांचा संहार केला. ज्या ठिकाणी ही कथा घडली त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थान केली. गणेशाच्या 21 स्थानांपकी हे एक जागृत गणेश स्थान आहे. येथे माघ शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव असतो.
भद्रा गणपती Bhadra Ganpati
हा गणपती भंडारा जिल्ह्यात वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या पवनी गावात आहे. विदर्भातील अष्टविनायकां पैकी एक आगळावेगळा गणपती म्हणायला हवा. इथे गणपतीची मूर्ती नसून, त्याऐवजी मंदिरात एक उभा पाषाण आहे आणि त्याला पाच बाजूंनी पाच तोंडे आहेत.
त्यामुळे याला सर्वतोभद्र गणपती, भद्रा गणपती, पंचानन, विघ्नराज अशा विविध नावांनी संबोधले जाते. पवनी गावाभोवती तटबंदी बांधलेली दिसते. गावाच्या मध्यवर्ती भागात एक छोटेखानी मंदिर असून, त्यात ही गणपतीची मूर्ती प्रस्थापित केलेली दिसते.
वरद विनायक, भद्रावती Varad Vinayak Bhadravati
चंद्रपूर येथील भद्रावती म्हणजे भांदक या ठिकाणी विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेला वरदविनायक एका टेकडीवर वसलेला आहे. टेकडीवर चढत असताना वाटेत काही भग्न मूर्ती पाहायला मिळतात. गणपती मंदिराला 16 खांब असलेला भव्य सभामंडप आहे.
गणपती मंदिराचा मुख्य गाभारा खाली असल्यामुळे काही पायऱ्या उतरून येथे प्रवेश करावा लागतो. उजवा पाय मुडपून जमिनीवर आहे, तर डावा पाय दुमडून शेजारी उभ्या स्थितीत दिसतो. गणपतीच्या मस्तकाभोवती प्रभामंडळ कोरले असून त्यावर मुकुट कोरलेला दिसतो. प्रसन्न अशी गणपतीची मूर्ती आणि हा सगळाच परिसर आवर्जून पाहावा असा आहे.
चिंतामणी, कळंब Chintamani Kalamb
हा गणपती भक्तांच्या सर्व चिंतांचे हरण करणारा चिंतामणी वसला आहे कळंब या गावी. प्रसिद्ध 21 गणपती क्षेत्रांपकी एक पीठ असलेले प्राचीन कदंबपूर म्हणजेच आजचे कळंब होय. हे मंदिर इतरांपेक्षा वेगळे आहे. जवळजवळ 15 फूट जमिनीखाली ही मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. त्यासाठी तीन जिने उतरून आपल्याला तिथे जावे लागते.
येथे जमिनीखाली पाण्याचे प्रवाह आहेत. त्या पाण्याची पातळी वाढायला लागून या गाभाऱ्यात पाणी साठू लागते आणि गणेशमूर्तीच्या पायाला पाणी लागले की पुन्हा ते ओसरते. असा प्रसंग बारा वर्षांतून एकदा घडतो. या मंदिरात काही प्रतिमा कोरलेल्या दिसतात.
वरद विनायक, केळझर Varad Vinayak Keljhar
रामायण आणि महाभारत हे प्रत्येक भारतीयाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. एकचक्रा हे नावसुद्धा पांडवांशी संबंधित आहे. बकासुर नावाच्या राक्षसाचा भीमाने वध केला आणि याच एकचक्रा गावातील लोकांची त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका केल्याची कथा सर्वपरिचित आहे. नागपूर-वर्धा रस्त्यावर सुमारे 25 किमी अंतरावर केळझर किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे.
स्थानिक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासुर वधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रानगरी म्हणून ओळखले जायचे. या गणेशालासुद्धा एकचक्रागणेश असे म्हणतात.
गणपती उत्सवात या सर्व ठिकाणी खूप मोठा जल्लोष असतो. सर्व नगरी दुमदुमून जाते. तुम्ही या स्थळांना भेट द्या व गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्या.
“तुम्हाला आमचा लेख ‘अष्टविनायक’Ashtavinayak Ganpati विषयी कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”