Top 10 Richest Countries In The World | जगातील टॉप 10 सर्वात श्रीमंत देश | नमस्कार मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन नवीन बातम्या घेऊन येत असतो. तर आता आम्ही तुमच्यासाठी आणखी एक बातमी घेऊन येत आहोत ते म्हणजे जगातील दहा श्रीमंत देशाची यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये आपल्या भारताचा नंबर कितवा असेल हे आज आपण या बातमीमध्ये पाहूया. श्रीमंत देश कोणत्या आहेत या प्रश्नाचे एकदम अचूक उत्तर देणे इतकं सोपं नाही. अशा देशांचे बऱ्याचदा अंदाज लावले जातात. मात्र हे अंदाज अचूक येतीलच असंही नाही तर मग प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे नेमका कोणता देश श्रीमंत सांगायचा. एखादा देशाच्या श्रीमंतीचा मूल्यमापन त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीच्या (GDP) अंदाजावर केलं जात असत विशिष्ट कालावधीत देशाच्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन मोजून जीडीपी चा अंदाज लावला जातो. विशिष्ट कालावधीत देशाच्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन मोजून जी. डी. पी. काढला जातो. देशाच्या संपत्तीचा मोजमाप म्हणून याकडे पाहिलं जात. आपल्या जगाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणार हे एकक आहे याकडे इतर गोष्टी बरोबरच सरकारला किती प्रमाणात टॅक्स मिळत आहे आणि सरकार शिक्षण आरोग्य यासारख्या क्षेत्रावर किती पैसे खर्च करत आहे याची सर्व माहिती आपल्याला येथे मिळते. आता जरी या एककावर प्रश्न उपस्थित होत असतील मात्र या एकाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे जगातील दहा श्रीमंत देशाची माहिती आपल्याला इथे मिळू शकते. International Monetary Fund and Visual Capitalist ऑक्टोबर 2022 च्या आकडेवारीनुसार जगातील दहा श्रीमंत देशाची यादी ही आपल्याला माहिती मध्ये पाहायला मिळणार आहे.
जगातील दहा श्रीमंत देश ( 10 Richest Country In World ) :
1. अमेरिका- 25.035 ट्रिलियन अमेरिकन डॉलर
2. चीन- 18.321 ट्रिलियन अमेरिकन डॉलर
3. जपान-4.301 ट्रिलियन अमेरिकन डॉलर
4. जर्मनी-4.031 ट्रिलियन अमेरिकन डॉलर
5. भारत-3.469 ट्रिलियन अमेरिकन डॉलर
6. ब्रिटन-3.199 ट्रिलियन अमेरिकन डॉलर
7. फ्रान्स- 2.778 ट्रिलियन अमेरिकन डॉलर
8. कॅनडा- 2.2 ट्रिलियन अमेरिकन डॉलर
9. रशिया-2.113 ट्रिलियन अमेरिकन डॉलर
10. इटली-1.99 ट्रिलियन अमेरिकन डॉलर
या आकडेवारीवरून आपल्याला काय समजतं: या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल काही प्रमाणावर माहिती मिळते परंतु यावरून सगळ्याचाच अंदाज येत नाही.
Critics of GDP
GDP चे टीकाकार सांगतात, त्याचप्रमाणे जीडीपी मधील तिसरा व सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे उत्पादन जीडीपी सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) हे एका विशिष्ट कालावधीत देशामध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाद्वारे तयार केलेल्या मूल्याचे प्रमाणिक माप आहे. हे एकक पुढे आणणारे अमेरिकेचे शास्त्रज्ञ सायमन कुच नेट सुद्धा याला फारसं महत्त्व देताना दिसत नाहीत 1930 या शतकात अमेरिकेत मोठी आर्थिक ढासळ निर्माण झाली होती या आर्थिक टंचाईमुळे देशाला बाहेर काढण्यासाठी तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोजमाप करण्यासाठी एखादा साधन हवं होतं आणि यामधूनच जीडीपी ही संकल्पना पुढे आली.प्रत्येक्षात उत्पादक मालमत्ता मानले जाणारी वस्तू मोजण्यासाठी या एककाचा उपयोग केला जात होता. याशिवाय चांगली जीवनशैली मोजण्यासाठी हे एकक होतं. परंतु लवकरच दुसरा महायुद्ध सुरू झाले आणि प्राधान्यक्रम बदलले. चांगल्या जीवन शैलीऐवजी जीव वाचवणे हे महत्त्वाचा ठरू लागलं. महायुद्ध सुरू असताना त्यावेळी असलेले प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ John Maynard Keynes यांच्यासाठी अर्थव्यवस्थेसंबंधी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे जसे की अर्थव्यवस्था काय असते व उत्पादन कशा प्रकारे करू शकते या युद्धात दरम्यान लोकांसाठी किमान किती रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे कारण उरलेल्या उत्पादनातून युद्धासाठी वित्त पुरवठा करणं हे एक प्रकारचं आव्हानच होतं परंतु मोजबागचा एकक ही बदललेलं आहे आणि त्यामागे असलेल्या उद्देशी बदलला होता व पुढे हेच कायम राहिलं.
दरडोई उत्पादनाच्या आधारावर सर्वात श्रीमंत देश कोणता आहे : कुझनेट्स यांना आर्थिक कल्याण मोजण्याचं जे एकेक बनवायचं होतं ते आता अर्थव्यवस्थेतील उत्पादन मोजण्याचा होता. या एककात महत्त्वाचा फरक असा होता की, या गोष्टी समाजासाठी चांगला नव्हत्या. मात्र त्या अर्थव्यवस्थेसाठी चांगला होत्या. याबाबतीत उदाहरण बघायचं असेल तर, एखाद्या अर्थव्यवस्थेत लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या वस्तूचे उत्पादन जितकं महत्त्वाचं असतं तितकाच महत्त्वाचे हत्यारे देखील असतात. शिवाय यात गुणवत्ता मोजता येत नव्हती फक्त उत्पादनाचे प्रमाण मोजलं जात होतं.