PAN link to Aadhaar Card पॅन कार्डशी आधार कार्ड कसे लिंक करावे?

PAN link to Aadhaar Card मित्रांनो पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे किती जरूरी आहे, हे आपल्याला माहिती आहे. कारण पॅन कार्ड PAN Card हे आपल्याला आर्थिक व्यवहारांसंबंधी खूप महत्त्वाचे असते. जेव्हा जेव्हा आपण आर्थिक व्यवहार करतो, तेव्हा तेव्हा पॅन कार्ड वापरून आपले व्यवहार आपण पूर्ण करतो. परंतु पॅन कार्डशी आपले जर आधार कार्ड लिंक नसेल तर आपल्याला आर्थिक व्यवहार करताना बऱ्याच अडचणी येतात.

PAN link to Aadhaar Card पॅन कार्डशी आधार कार्ड कसे लिंक करावे?

आज कोरोना संकटामुळे सध्या आपल्याला दैनंदिन व्यवहार किंवा इतर कामकाज करण्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पॅन कार्ड आधार कार्ड करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली दिसते.

ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न करण्यासाठीसुद्धा अतिरिक्त कालावधी देण्यात आलेला आहे. बऱ्याच लोकांना आपले पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक आहे किंवा नाही याची कल्पना नसते. आपण सहज रित्या इन्कम टॅक्स च्या वेबसाईटवर जाऊन आपला पॅन कार्ड सहजपणे आधार कार्डशी लिंक करू शकतो. यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. ती वेबसाईट आहे, www1.incometaxindiaefiling.gov.in/eFilingGS/Services/AdhaarPreloginstatus.html

यावर लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन बॉक्स समोर दिसतात.  यापैकी एका बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल, तर दुसऱ्या बॉक्समध्ये पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर view link Aadhaar status यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर जर तुमचे आधार कार्ड पॅन क्रमांकाची जोडलेली असेल, तर तुम्हाला सक्सेस Success असे दाखवले जाईल. मात्र जर तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक नसेल तर,  तेही तुम्हाला तिथे दाखवले जाईल. त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्डशी जोडले आहे किंवा नाही हे ताबडतोब समजेल.

पॅन कार्ड आधार कार्ड कसे जोडावे? येथे क्लिक करा

 

See also  LPG Gas Connection Riffle Booking Miss Call नविन गॅस कनेक्शन

2 thoughts on “PAN link to Aadhaar Card पॅन कार्डशी आधार कार्ड कसे लिंक करावे?”

Leave a Comment

x
error: Content is protected !!