Incometaxindiaefiling Gov In | Link Pan Card to Aadhaar Card

Incometaxindiaefiling Gov In | Link Pan Card to Aadhaar Card

सर्वप्रथम तुम्ही आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in यावर लॉगिन करायचे आहे.

1.  यानंतर तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय समोर दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

2.  त्यानंतर तुमचा पॅन नंबर आधार नंबर आणि तुमचे नाव बॉक्समध्ये भरायचे आहे.

3.  यानंतर तुमच्या समोर एक कॅपच्या कोट दिसेल तो काळजीपूर्वक भरावा.

4.  संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आधार शी लिंक अशा पर्यायावर क्लिक करायचे आहे.

दुसऱ्या पर्यायाने पॅन कार्ड आधार लिंक कसे करावे?

तुम्हाला आपले पॅन कार्ड आधार शी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांनी जोडता येईल. आपण एसएमएस SMS द्वारे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करू शकता या करता आपल्याला

UIDPAN<SPACE>12 अंकी आधार क्रमांक>SPACE><10 अंकी PAN> लिहून 567678 या नंबर वर किंवा 56161 वर मेसेज पाठवावा लागेल.

ऑनलाइन लिंक करण्याची प्रक्रिया पहा

पॅन कार्ड ला आधार लिंक करण्याची अधिकृत आयकर वेबसाईट https://incometaxindiaefiling.gov.in वर जा त्यानंतर होम पेज वर तुम्हाला लिंक आधार यावर क्लिक करायचे आहे. ते केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पान उघडेल, त्यावर तुम्हाला तुमचा पॅन नंबर, आधार नंबर आणि आपले नाव भरायचे आहे.  जर आपल्या आधारावर फक्त जन्माचे वर्ष लिहिली असेल, तर तुम्हाला एक पर्याय निवडावा लागेल तो म्हणजे ‘आधार कार्ड मध्ये माझ्याकडे फक्त जन्माचे वर्ष आहे’ असा हा पर्याय असणार आहे आता कॅफेच्या कोड भरा आणि लिंक आधार वर क्लिक करा ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक पृष्ठ उघडेल त्यामध्ये पॅन कार्डशी संबंधित माहिती आपल्याला दिसेल.

पॅन कार्ड आधार शी ऑफलाईन लिंक करायचे असेल तर…

ऑफलाइन लिंक करण्यासाठी आपल्याला पॅन सेवा प्रदाता किंवा NSDL किंवा UTIITSL च्या सेवा केंद्र वा भेट द्यावी लागेल आणि येथे तुम्हाला Annexure-1 हा फॉर्म भरावा लागेल आणि पॅन कार्ड व आधार कार्डची प्रत व सोबत काही अन्य कागदपत्रे ही तुम्हाला द्यावे लागतील यावेळी आपल्याला निश्चित अशी फी देखील द्यावी लागते. या प्रक्रियेद्वारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने पॅनला आपल्या आधारशी लिंक करू शकता. PAN link to Aadhaar हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हो आमच्या शेतकरी shetkaree या ब्लॉगला सुद्धा भेट द्या.