Online Driving Licence at Home Only Rs201 | आता बनवा घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स फक्त 200 रुपयात

Online Driving Licence at Home Only Rs201 मित्रांनो आता घरबसल्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकता फक्त 201 रुपयांमध्ये. मित्रांनो ह्याकरता अर्ज कसा करायचा प्रोसेस काय आहे. ऑनलाइन कोणत्या वेबसाईटवर आपल्याला लॉगिन करावे लागेल याची सर्व माहिती या लेखामध्ये आम्ही देणार आहोत.

मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला परिवहन सेवा Parivahan Seva या राज्य सरकारच्या परिवहन वेबसाईटवर जावं लागेल, त्याकरिता आपण https://parivahan.gov.in या पोर्टलवर जा.

ऑनलाइन अर्ज खालील प्रमाणे करता येईल?

  • त्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग सर्विसेस Driving Services या ऑप्शन वर क्लिक करा.
  • यामध्ये तुम्हाला दोन नंबर वर ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिसेस हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • पुढील ऑप्शन मध्ये आपल्याला राज्य निवडायचे आहे.
  • त्यापुढे आपल्यासमोर एक डॅशबोर्ड उघडेल त्यामधल्या अप्लाय फॉर लर्नर लायसन्स (Apply for learner licence)
  • पुढे आपल्यासमोर सूचना येतील त्या पूर्ण वाचून घ्या आणि कंटिन्यू Continue या बटनवर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्याला तीन ऑप्शन दाखवल्या जातील त्यातील पहिले ऑप्शन आपल्याला निवडायचे आहे.
  • त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा आणि तिथे सुद्धा दोन ऑप्शन आपल्याला दिसतील त्यामध्ये सबमिट व्हाया आधार अथेंटीकेशन आणि सबमिट विदाऊट आधार ॲथॉन्टीकेशन असे दोन ऑप्शन दिसतील. म्हणजेच आपल्याला आधार कार्डसह किंवा आधार कार्ड विना एप्लीकेशन करायचे असेल तर दोन पैकी जे ऑप्शन तुम्हाला आवश्यक वाटते ते निवडा. आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्याला आधार कार्ड नंबर (Aadhaar Card) विचारला जाईल तो टाका आणि आधार कार्ड च्या सिम कार्डची लिंक आहे त्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी टाका आणि तिन्हीही चेक बॉक्स टिक करा आणि Authentication बटन प्रेस करायचे आहे.
  • हे केल्यानंतर तुमच्या आधारचा सर्व डेटा (Aadhar Card Data)म्हणजे आधार कार्ड ची माहिती आहे ती तुमच्या समोर दिसेल
  • माहिती बरोबर असेल तर प्रोसीड या बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्याला आपल्या आरटीओ ऑफिस चा पत्ता सिलेक्ट करायचा आहे.
  • त्यानंतर आपले जन्म ठिकाण निवडा.
  • त्यानंतर आपले शिक्षण निवडा.
  • त्यानंतर आपल्या ब्लड ग्रुप ची माहिती द्या.
  • मोबाईल नंबर ही टाका.
  • त्यानंतर दोन प्रकारच्या जन्मखुणा टाकायच्या आहेत.
  • पत्त्यामध्ये बदल करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता.
  • त्यानंतर तुम्ही या पत्त्यावर किती वर्षापासून वास्तव्य करत आहात ते वर्ष आणि महिने लिहा.
  • त्यानंतर तुम्ही कोण्या बाईक साठी हे ॲप्लिकेशन करत आहात ते लिहा.
  • ज्या ड्रायव्हिंग स्कूल मधून तुम्ही लर्निंग घेतले असेल तर ते लिहा.
  • नसेल केले तर बॉक्सला ठीक करू नका.
  • त्यानंतर आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म एक दाखवल्या जाईल त्यावर क्लिक करा.
  • फॉर्म वन कंप्लिट भरा म्हणजे Yes आणि No मध्ये तो असणार आहे त्याला सबमिट करा त्यानंतर खाली सुद्धा आणखी काही सूचना आपल्याला दाखवल्या जातील.
  • त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा अर्ज तात्पुरत्या स्वरूपात सबमिट होईल.
  • त्यानंतर भरलेला अर्ज अर्ज क्रमांक सहा येईल तसेच किंवा कोड दाखवल्या जाईल त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटन वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतरची प्रोसेस राहील पेमेंटची आणि फोटो तसेच स्वाक्षरी सबमिट करायची.
  • अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये जे काही बाकी राहिलेले असेल त्याची स्थिती दाखवल्या जाईल आणि नंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • आपल्याला एसबीआय पे दाखवत आहे आणि कॅपच्या कोड दाखवत आहे तो तिथे व्यवस्थित टाका आणि पे न्यू या बटणावर क्लिक करा.
  • आपलिकेशन नंबर सह दोनशे रुपये पेमेंट दाखवल्या जाईल आय ॲग्री या वर क्लिक करून प्रोसेस फॉर पेमेंट यावर क्लिक करा.
  •  त्यानंतर तुमच्यासमोर एसबीआय चा पेमेंट गेटवे दाखवले जाईल. Credit Card तसेच UPI  किंवा कार्ड किंवा नेट बँकिंग ने तिथे तुमचं पेमेंट करू शकता.
  • पेमेंट भरून झाल्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती आपल्याला पाहता येईल.
See also  LPG Gas Connection Riffle Booking Miss Call नविन गॅस कनेक्शन

ऑनलाइन परीक्षेसाठी येथे क्लीक करा

 

pratiksha Thorat Age, Biography, Wikipedia,Birth date,Family, instagram &etc.

 

Leave a Comment