Mahavitaran Employees On Strike For 3 Days | महावितरणचे कर्मचारी ३ दिवस संपावर |

Mahavitaran Employees On Strike For 3 Days | महावितरणचे कर्मचारी ३ दिवस संपावर |

राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरु  असताना राज्य शासनाने एका खासगी कंपनीस  समांतर परवाना देण्याचे ठरविले आहे . यास विरोध करण्यासाठी बुधवार दि ४/०१/२०२३  पासून वीज कर्मचारी, अभियंते 72 तासांच्या संपावर जात आहेत. महाराष्ट्र वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, संघर्ष समितीच्या वतीने ही माहितीमिळाली आहे . राज्यात ३ कंपनी चे  कामकाज चांगले पध्दतीने सुरू आहे. मात्र, राज्य शासनाने खासगीकरणाचे धोरण अवलंबविले आहे. त्यानुसार शासनाने संघर्ष समितीने विरोध दर्शविणारे पत्र दिले होते. त्यामध्ये शासन तिन्ही कंपन्या मधून कोणत्याही कंपनी मध्ये खाजगीकरण करणार नाही , असे स्पष्ट नमूद केले होते असे असतानादेखील अदानी इलेक्ट्रिकल्स या खासगी कंपनीने भांडुप परिमंडलातील क्षेत्रामध्ये वितरण करण्याचा समांतर परवाना राज्य विद्युत नियामक आयोगाकडे मागितला आहे. यास विरोध करण्यासाठी संघर्ष समितीने राज्यभर गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारची आंदोलने, व्दारसभा आयोजित केल्या होत्या. मात्र आता  राज्यभर बुधवारपासून 72 तासांचा संप करण्यात आला आहे. हा संप करूनदेखील शासनाने लक्ष न दिल्यास 18 जानेवारीपासून बेमुदत संपावर जाईल असा  इशारा संघर्ष समितीने दिला आहे. संघटनेच्या पदाधिका-यांनी कळविले आहे की, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सर्व सदस्य आणि राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  Post Office Bharati Maharashtra 2022 | पोस्ट भरती महाराष्ट्र २०२२

Leave a Comment

error: Content is protected !!