Thibak Yojana Maharashtra | ठिबक योजना

मागेल त्याला ठिबक

Thibak Yojana Maharashtra शेतकरी मित्रांनो शेती पिकाच्या वाढीकरिता आणि उत्पन्न वाढण्याकरता शेतीसाठी पाण्याची गरज असते. हे पाणी नियोजन बद्ध शेतीस देण्याकरिता तशा प्रकारे सुविधा असणे गरजेचे आहे. म्हणूनच शासनाने शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. ज्यामध्ये सूक्ष्म सिंचनाची योजना ‘मागेल त्याला ठिबक’ या तत्त्वावर राबविले जाणार आहे. यामध्ये अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा देण्याचे शासनाने ठरवले आहे.

किती टक्के अनुदान मिळेल?

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान म्हणजेच एकूण ८० टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान म्हणजेच ७५ टक्के कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

यासाठी लागणारा अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार असल्याची माहिती राज्य कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.

किती तालुक्यांचा समावेश या योजनेत आहे?

या योजनेमध्ये राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील, शेतकरी आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त अशा एकूण २४६ तालुक्यांचा समावेश होता. शासनाने उर्वरित १०६ तालुक्यांचा समावेश करुन सदर योजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे.

आतापर्यंत २५.७२ लक्ष हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून, या नवीन योजनेमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता रु.५८९ कोटी रकमेस शासनाची प्रशासकिय मान्यता आहे.

तर अशाप्रकारे शेतकरी मित्रांनो शासनामार्फत ‘मागेल त्याला ठिबक’ ही योजना राबविली जात आहे याचा लाभ शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा.

See also  |Anganwadi Sevika v Madatnis Padanchi Bharti 2022|अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती 2022|

Leave a Comment