How To Get Pan Card In 3 Days | 3 दिवसात पॅन कार्ड कसे मिळवायचे | Pan Card Status | पॅन कार्ड स्थिती |

How To Get Pan Card In 3 Days | 3 दिवसात पॅन कार्ड कसे मिळवायचे | Pan Card Status | पॅन कार्ड स्थिती | नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे. की, पॅन कार्डचा वापर कशासाठी केला जातो ? व पॅन कार्ड नसले तर कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. हे आपण सर्वांना माहितीच आहे. तरी पण काही लोकांना पॅन कार्ड म्हणजे काय असतं ,पॅन कार्ड कसे काढावे? याची माहिती नसते तर चला आज आपण ते जाणून घेऊया पॅन कार्ड म्हणजे ते एक असे कार्ड असते जे देशातील विविध टॅक्स भरणाऱ्या व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशनला ओळखण्याचे साधन असते पॅन कार्ड हा दहा अंकी युनिट ओळख अल्फा नुमिरीक नंबर आहे त्याच्यात नंबर आणि अल्फाबेट असतात पॅन कार्डची प्रक्रिया ही संगणक आधारित प्रक्रिया आहे जी प्रत्येक भारतीय कर भरणाऱ्या संस्थेला अद्वियत ओळख क्रमांक देते व तसेच पॅन कार्ड म्हणजे कायम खाते क्रमांक परमनंट अकाउंट नंबर हा एक ओळख क्रमांक आहे जो भारतीय सर्व कर्दा त्यांना नियुक्त केला गेलेला आहे त्यांनी एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे ज्याद्वारे एखाद्या व्यक्ती किंवा कंपनीसाठी सर्व कर संबंधित माहिती एकाच पॅन क्रमांक विरुद्ध नोंदवले जाते. (Pan Card म्हणजे Permanent Account Number)

 शेतकऱ्यांना 600 कोटींची मदत, रक्कम थेट खात्यात जमा होणार.

आपल्याला पॅन कार्ड ची आवश्यकता का आहे:

पॅन कार्ड एक युनिक ओळख क्रमांक आहे जो भारताच्या प्रत्येक कर देणाऱ्या घटकास खालीलसह सक्षम करतो ओळखपत्र कर भरण्यासाठी आवश्यक पत्ता व्यवसायाची नोंदणी आर्थिक व्यवहार बँक खाते उघडण्याची या सर्वांसाठी पॅन कार्ड हे आवश्यक असते पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारी पात्रता ती म्हणजे पॅन कार्ड व्यक्ती, कंपन्या, फॉरेनर्स किंवा भारतात कर भरणारा कोणालाही दिले जाऊ शकतो व तसेच कोणत्या व्यक्तीला पॅन कार्ड हे कोणासाठी आवश्यक आहे.

  • एखादी व्यक्ती
  • कंपन्या
  • फॉरेनर्स
  • सोसायटी
  • ट्रस्ट फार्म
  •  पार्टनरशिप
See also  Voter Id Card Search List Download Online By Name | मतदार यादी मध्ये तुमचे नाव कसे शोधाल?

या सर्वांसाठी पॅन कार्ड अति आवश्यक असते.

पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

दोन पासपोर्टसाईज फोटो आणि आधार कार्ड पॅन कार्ड जर आपल्याला काढायचे असेल तर त्याला लागणारा खर्च फक्त 110 रुपये आहे परंतु हा एकशे दहा रुपये खर्च फक्त भारतीयांसाठी आहे व तसेच पॅन कार्ड जर भारताबाहेर पाठवायचे असेल तर एक हजार वीस रुपये अंदाजे द्यावे लागतात.

आपले पॅन कार्ड जर हरवले असेल (If Your PAN Card Is Lost ) तर अधिक काळजी घेण्याची गरज नाही डुबलीकेट पॅन कार्ड साठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन अर्ज करा तसेच एन एस डी एल किंवा यु डी आय आय टी एस एल वेबसाईटवर लॉगिन करा व तसेच भारतीय नागरिकांसाठी फॉर्म 49 ए किंवा परदेशी असल्यास फॉर्म 49 ए ए भरा आणि आपल्या पॅन कार्डचा डुबलीकेट कॉफी साठी ऑनलाईन पैसे भरावे हे प्रोसेस केल्यानंतर पॅन कार्ड हे 45 दिवसात पाठवण्यात येईल. आता आपण बघूया…

पॅन कार्ड ला आधार कार्ड कसे लिंक करायचे(How to link Aadhaar card to PAN card): तुमच्याजवळ पॅन कार्ड असेल  आणि तुम्हाला भविष्यात कोणतेही प्रकारच्या अडचणीचा सामना करायचा नसेल तरी बातमी काळजीपूर्वक वाचा या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास तुमची पॅन कार्ड निष्क्रिय केल्या जाऊ शकते. आयकर विभागाने ट्विट करून पॅन कार्ड धारकांना सतर्क केले आहे आयकर विभागाने ट्विटच्या माध्यमातून असे सांगितले आहे की 31 मार्च 2023 पर्यंत तुमचे पॅन कार्ड आधार लिंक करणे आवश्यक आहे अन्यथा असे न केल्यास एक एप्रिल पासून तुमचे पॅन कार्ड हे निष्क्रिय केले जाऊ शकते आयकर विभागाने मंगळवारी 17 जानेवारी रोजी विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून पॅन कार्डधारकांना याबाबतची माहिती सांगितली आहे असे म्हटले आहे की आयकर कायदा 1961 नुसार सर्व पॅन कार्ड धारकांना जे सूट मिळालेला श्रेणीत येत नाही 31 मार्च 2023 च्या आधी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे व तसेच हे देखील सांगितले आहे की जर पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक न केलेले पॅन कार्ड हे एक एप्रिल 2023 पासून निष्क्रिय होईल अर्जंट नोटीस डोन्ट डिलीट असे या आयकर विभागाने लिहिले आहे.

See also  Government Orders | सरकारी आदेश | Govt Results | सरकारी निकाल |

या समस्याचा सामना करावा लागेल(This problem has to be faced): आयकर विभागाचा हा संदेश हलक्यात घेणे तुमच्यासाठी अधिक समस्या निर्माण करू शकते याचे कारण म्हणजे आजच्या काळात पॅन कार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे जे प्रत्येक आर्थिक बाबीशी जोडलेले राहते आयकर विभाग या कार्डवर नोंदवलेल्या क्रमांकाद्वारे काढ धारकांना संपूर्ण आर्थिक डेटा रेकॉर्ड करतो अशा परिस्थितीत हा इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे नाहीतर आपण आणखी अडचणीत येऊ शकतात.

पॅन कार्ड निष्क्रिय झालं तर(If the PAN card is Deactivated) : जर तुमचे पॅन कार्ड 31 मार्च 2023 पर्यंत आधार कार्डशी लिंक केलं नसेल तर ते एक एप्रिल 2023 पासून निष्क्रिय करण्यात येईल मग अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार नाही मात्र समस्या इथेच संपणार नाही कारण पॅन कार्ड अवैध असल्यास तुम्ही म्युच्युअल फंड स्टॉक बँक खाते उघडू शकणार नाही कारण येथे पॅन कार्ड दाखवणे अनिवार्य असते

 घरबसल्या लिंक करा आधार कार्ड(Link Aadhaar Card at home): प्राप्तिकर विभागाच्या eportal.incometax.gov.in  या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्ड सिलिंग करू शकता यासाठी तुमचा पॅन क्रमांक युजर आयडी म्हणून वापरावा लागतो तुमचा युजर आयडी पासवर्ड आणि जन्मतारीख असं लॉगिन केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर येईल तेथे लिंक आधारचा पर्याय दिसेल यावर क्लिक केल्यावर तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड ची माहिती विचारली जाईल माहिती प्रविष्ट करा आणि प्रक्रिया पूर्ण करा तसेच याशिवाय देखील एसएमएस सुविधेचा वापर करून तुम्ही हे काम अगदी सहजरीत्या करू शकता.

Government scheme माझी कन्या bhagyashri

घरबसल्या आधार कार्ड लिंक करण्यासाठी येथे Click करा.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे Click करा.

Leave a Comment