महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपले पुढचे आयुष्य हे सुखाचे असावे. यासाठी शेतकरी असो गरीब असो हे नेहमी काम करून नफा मिळवून आपल्या गरजा भागवत असतात. आणि काही नोकरी करूनही आपला उदरनिर्वाह करतात. काही बचत व्हावी म्हणून लोक सोने खरेदी करतात, बँकेमध्ये एफडी करतात, काही लोक बॉण्ड्स करतात व त्यामध्ये म्युच्युअल फंड असेही एक ऑप्शन आहे. अशा विविध गोष्टीतून व्यक्ती आपली बचत जमा करतो. यासाठी मोदी सरकारने एक योजना चालू केली आहे, ती म्हणजे अटल पेन्शन योजना , या योजनेमध्ये नागरिक हे बचत करून दर महिन्याला एक ते पाच हजार रुपये या राशीमध्ये पेन्शन मिळू शकतात. मोदी सरकारने ही योजना 2015 सली चालू केली होती . या योजनेचा लाभ हा 18 ते 40 वर्षे वयोगटातल्या पुरुष अथवा महिला अथवा विद्यार्थी लाभ घेऊ शकतात. या योजनेमधल्या अटी व शर्ती पूर्ण करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेची लोकप्रियता आता बरीच वाढलेली आहे. यासाठी तुमचे बँकेत अकाउंट असणे गरजेचे आहे. यासाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेमध्ये अकाउंट उघडू शकतात.