Bandhkam Kamgar Yojana Information in Marathi language | बांधकाम कामगार योजना

Bandhkam Kamgar Yojana Information in Marathi language महाराष्ट्र हे उपेक्षित घटकांसाठी योजना राबविण्यात नेहमीच आघाडीवर राहत आलेले राज्य आहे. नव्या योजना निर्माण करणे, त्यांची अंमलबजावणी करणं यातही महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिला आहे. त्यादृष्टीनं विचार केला तर असंघटित क्षेत्रातील कामगार हे तसे दुर्लक्षित राहत आले. पण महाराष्ट्र सरकारने या असंघटित क्षेत्रात अतिशय मोठा वर्ग असलेल्या बांधकाम कामगारांसाठी धोरणं ठरविली आहेत. एवढेच नव्हे तर या बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचीही निर्मिती केली. असंघटित आणि ज्यांना स्वत:चा असा आवाज नसणाऱ्यांना कायद्याचं संरक्षण देण्यात येणारं, त्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन काम करीत आहे.  कामगार बांधकाम योजनेविषयी माहिती पाहूया.

बांधकाम कामगार योजना

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ माहिती महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार नियम 2007 आणि इमारत व इतर बांधकाम अधिनियम 1966 कायद्याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने 1 मे 2011 रोजी राज्यातील कामगारांचे सर्वागीण हीच साधण्याच्या दृष्टीने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ Bandhkam Kamgar kalyankari Mandal या मंडळाची स्थापना केली. राज्यात असलेला इमारत व बांधकाम आस्थापने कडून बांधकाम खर्चाच्या 1% दराने उपकर वसूल करून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जमा केला जातो. जमा झालेल्या उपकाराच्या निधीतून बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध बांधकाम कामगार कल्याणकारी योजना राबवल्या जातात.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे उद्दिष्टे

कामगारांच्या नोंदणी असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना विशेष हिताच्या योजना राबविणे हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य उद्दिष्ट असते. त्यामध्ये बांधकाम कामगारांना पर्यंत पोहोचवीने आणि त्यांच्याकडून विविध माहिती गोळा करून घेणे, बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे, योजनेच्या लाभासाठी चा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतीत अधिक सुलभपणे आणणे योजनेच्या लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे, कल्याणकारी योजनेचा लाभ देण्याच्या पद्धती सुटसुटीतपणा आणणे, बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे इ.

See also  Home Guard New Update|होमगार्ड साठी एक धक्कादायक बातमी|Home Guard Bharti 2022 Date Maharashtra|

बांधकाम कामगारांसाठी निर्णय

महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 21 ऑक्टोबर 2013 रोजी बांधकाम कामगारांना भेटवस्तू देण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार उद्योग,उर्जा आणि कामगार विभागाने 24 जानेवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार बांधकाम कामगारांना मच्छरदाणी, ब्लॉकेट, चादर, जेवणाचा डब्बा, चटई या पाच वस्तू खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी 30 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भेटवस्तू खरेदी करुन देण्याऐवजी कामगारांना त्यांच्या पसंतीच्या वस्तू खरेदी करता याव्यात या दृष्टिकोनातून बांधकाम कामगारांस तीन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.

बांधकाम कामगार योजना कार्यपद्धती

बांधकाम कामगारांना या अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून आणि लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखांमार्फत यात प्रामुख्याने अपर कामगार आयुक्त, कामगार उप आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांच्यामार्फत अर्थसहाय्याचे वाटप करण्यात येत आहे.

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर मंडळाच्या नावे एक स्वतंत्र बचत बँक खाते उघडण्यात आले आहे. राज्य शासनाने जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखांना हे अर्थसहाय्य आरटीजीएस किंवा धनादेशाव्दारे लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी तसेच
जिल्हास्तरावरील बचत बँक खात्याचे परिचलन (ऑपरेट) करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरीत करण्यापूर्वी संबंधित लाभार्थी प्रत्यक्ष नोंदणीकृत असल्याची खात्री करण्यात येणार आहे. अर्थसहाय्य तातडीने वितरीत करता यावे म्हणून कामगार आयुक्त तथा अध्यक्ष महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ हे कार्यपध्दतीबाबत आवश्यक ते आदेश देऊ शकतात.

बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे विविध सोळा प्रकारच्या कल्याणकारी योजना अंतर्गत हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे.

बांधकाम कामगार योजना 2021 लिस्ट

या योजनेमध्ये चार घटकांमध्ये योजनेचा लाभ दिला जातो.
1)बांधकाम कामगार सामाजिक सुरक्षा योजना 2)बांधकाम कामगारशैक्षणिक योजना बांधकाम 3)कामगार आर्थिक सहाय्य योजना
4) बांधकाम कामगार आरोग्य योजना

See also  Pune PMC Recruitment 2022 | पुणे महानगरपालिका भरती २०२२.

बांधकाम कामगारांच्या नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे

1) वयाचा पुरावा

2) रहिवासी पुरावा 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र. ( ओळखपत्र पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड ओळखपत्र)

3) बँक पासबुक पासपोर्ट आकाराचे तीन फोटो

4) ग्रामपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र नोंदणी करतेवेळी नोंदणीही रुपये पंचवीस व पाच वर्षासाठी वार्षिक वर्गणी रुपये 60 एवढी असते.

बांधकाम कामगार आवास योजना :
आपल्याला प्रत्येकाला वाटते की, आपले स्वतःचे हक्काचे घर असावे या अनुषंगाने केंद्र सरकारने जून 2015 मध्ये सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान मंत्री आवास योजना सुरु केली आहे.

सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनांवर या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. याशिवाय या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय मंजुरी व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.

या माध्यमातून बांधकाम क्षेत्र व देशातील जनतेला मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणारे क्षेत्र निर्माण झालेले आहे. त्यामध्ये पाणी, रस्ते, वीज, शौचालये इत्यादी पायाभूत सुविधा असलेली घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी बांधकाम कामगार आवास योजना राज्यात 382 शहरांमध्ये राबवण्यात केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजाराची मदत

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील नोंदणी मात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी उपयुक्त व आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरता 5000/- रुपये अर्थसहाय्य हे बांधकाम कामगारांच्या नोंदणीनंतर लगेच देण्यात येते.

पुढील तीन वर्षानंतर लाभ घेण्यासाठी अशा बांधकाम कामगारांची मंडळाकडे सलग तीन वर्षे नोंदणी असणे अनिवार्य आहे. म्हणजे जर बांधकाम कामगारांची नोंद तीन वर्षे कायम असेल तर पुढील तीन वर्षांनंतरही पाच हजार रुपयाची मदत मिळते.

Bandhkam Kamgar Yojana 2021 information in Marathi language.
बांधकाम कामगार योजना 2021 ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व जास्तीत जास्त शेयर करा.

See also  How to increase Android mobile speed in Marathi मोबाईल हँग होत असेल तर काय करावे?

Leave a Comment