12 Jyotirling बारा ज्योतिर्लिंग

सोमवार Monday हा दिवस भगवान शिवशंकराचा दिवस म्हणून ओळखला जातो. तसेच प्रत्येक सोमवारी देवाची पूजा केली जाते मात्र श्रावण महिन्यामध्ये येणारे सोमवार व महाशिवरात्री हे खूप महत्त्वाचे मानले जातात तसेच श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतातील लोक भाविक भक्त हे बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येत असतात.

12 Jyotirling बारा ज्योतिर्लिंग

भारतामध्ये शंकराची एकूण बारा महत्त्वाची मंदिर आहे. त्यांनाच आपण बारा ज्योतिर्लिंग 12 Jyotirlingकिंवा द्वादश ज्योतिर्लिंग असे म्हणतो. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगाच्या यात्रेत अक्रम सांगितलेला आहे. तर चला मग पाहूया आपण ज्योतिर्लिंग विषयी माहिती.

सोमनाथ मंदिर Somnath Temple

सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी 12 Jyotirling प्रथम स्थानावर आहे. गुजरातमध्ये सौराष्ट्रात वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर आहे. देशातील प्राचीन तीर्थस्थळ सोमनाथ या मंदिराचा समावेश होतो. हे मंदिर गर्भगृह सभामंडप आणि नृत्य मंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे. पुराणात या मंदिराच्या एक कथा आहे चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्याचा प्रकाश दिवसा-दिवसाने कमी होत जाईल, असा शाप दिला व अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तिथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम होणार नाही असे सांगितले.

मल्लिकार्जुन Mallikarjun

हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी 12 Jyotirling दुसऱ्या स्थानावर असणारे मंदिर म्हणजे मल्लिकार्जुन हे आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य येथे वसलेले आहे. तसेच हे आत्माकुरहून गावात मोटारीने जावे लागते. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल पर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकरिता मल्लिका म्हणजेच पार्वती व अर्जुन म्हणजे शंकर तिथे आले, म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुन याच्या पलीकडे पाच महिलांवर पातळगंगा म्हणजेच कृष्ण नदी आहे.

महाकालेश्वर Mahakaleshwar

महाकालेश्वर हे मंदिर मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यात आहे. हे ज्योतिर्लिंग 12 Jyotirling व स्वयंभू असून रुद्र सागर तलावाच्या काठावर उज्जैन शहरात आहे. हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसलेले आहे. या नदीला ऐतिहासिक वारसा असून पूर्वीच्या काळी विक्रमादित्य याची राजधानी होती. दरबारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात जगभरातून भाविक येथे जमा होत असतात. श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगची प्रतिमा दक्षिणमुखी आहे. बारा ज्योतिर्लिंग दक्षिणमुखी पूजेचे महत्व फक्त महाकालेश्वर येथेच भस्म आरती होते. वर्षात केवळ एकदा शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भगवान श्री महाकालेश्वर यांची दुपारी बारा वाजता भस्म आरती होते.

See also  Ashtavinayak Ganpati अष्टविनायक गणपती नावे

ओंकारेश्वर Omkareshwar

ओंकारेश्वर मध्य प्रदेशाच्या खांडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये शिवपुरी नामक बेटावर वसलेले असून मोरटक्का गावा पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. हे द्वीप हिंदू पवित्र चिन्ह ओम आकारांमध्ये बनले आहे. येथे दोन मंदिरे आहेत. ओंकारेश्वर आणि महेश्वर ओंकारेश्वरची निर्मिती नर्मदा नदी पासून झालेली आहे. ही नदी भारताची अत्यंत पवित्र नदी मानली जाते. राजा त्याने तेथे नर्मदा किनारी घोर तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्याच्याकडून तेथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले. तेथे एकूण 68 तीर्थ असून तेथे तीस कोटी देवता राहतात अशी कल्पना आहे. शास्त्रात अशी मान्यता आहे की, कोणीही तीर्थयात्री देशाचे सर्व तीर्थ करून परत आले, परंतु जोपर्यंत तो ओंकारेश्वरचे दर्शन घेत नाही; तोपर्यंत त्याचे बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण झाले असे मानत नाही किंवा ती अधुरीच मानली जाते.

परळी वैजनाथ Parali Vaijnath

भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी 12 Jyotirling परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान जागृत आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केलेला होता. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही काही पण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत.

भीमाशंकर Bhimashankar

भीमाशंकर हे भीमानदीच्या उगमस्थानी असलेले बारा ज्योतिर्लिंगा -पैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. मंदिर हेमाडपंती असून मंदिरावर उत्कृष्ट कलाकुसरीचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. भीमा नदीचा उगम आणि श्री महादेवाचे शंकराचे स्थान म्हणून याला भीमाशंकर असे म्हणतात. हे थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहे. निसर्गरम्य वातावरण आहे तसेच हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.

See also  आई Aai

रामेश्वर Rameshwar

रामेश्वर हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावरील एक शिव मंदिर आहे. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा विरुद्ध झुंजलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी वाळूचे शिवलिंग बनवून भगवान शंकराची आराधना केली. त्याच्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात निवास करण्याचे वचन भगवान रामचंद्रांना दिले. येथे दरवर्षी उत्सवाच्या वेळेस भगवान शंकर-पार्वतीची सोन्या चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक काढली जाते.

नागेश्वर Aundha Nagnath

नागेश्वर हे महाराष्ट्रातील औंढा नागनाथ हे मंदिर आहे पांडवाच्या 14 वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्टिर मे औंढा नागनाथाचे मंदिर बांधले असे म्हटले जाते. हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे आहे तसेच याचा विस्तार सात हजार चौरस फूट एवढा प्रचंड मोठा आहे. महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही तर नंदीचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे. हे तेथील वैशिष्ट्य आहे. तसेच मंदिराच्या आवारात बारा ज्योतिर्लिंगाची छोटी छोटी मंदिरे असून 108 महादेवाचे मंदिर यांनी आणखीन 68 महादेवाच्या पिंडी आहेत. याशिवाय वेदव्यास लिंग भंडारेश्वर नीलकंठेश्वर गणपती दत्तात्रय मुरलीमनोहर दशावतार यांचीदेखील मंदिरे आहेत.

विश्वेश्वर Vishweshar

विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिर होते. वाराणसी भारताची सांस्कृतिक राजधानी असून ते भारताचे पवित्र नदी गंगाच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. शहराच्या मध्यावर विश्वनाथ मंदिर असून तेथे भगवान शिव विश्वेश्वर किंवा विश्वनाथ स्थापिलेल्या आहे. श्री विश्वेश्वर ज्योतिर्लिंग आहे. कोणाच्या तपस्येने तयार झाले नसून ते साक्षात भगवान शिव हेच विश्वनाथच्या रूपात प्रकट झाले. असे म्हणतात की, मृत्यू येणाऱ्या प्रत्येकास मोक्षप्राप्ती होते.

त्रंबकेश्वर Tranbakeshwar

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या शहरातील 12 Jyotirling हे एक येथे ठिकाण आहे. हे भारतातील ज्योतिर्लिंगां पैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते. या मंदिराचे बांधकाम पेशवे बाळाजी बाजीराव यांनी केल्याचा उल्लेख आढळतो. दर बारा वर्षांनी नाशिक बरोबर त्रंबकेश्वरला ही कुंभमेळा भरतो. नाशिक पासून फक्त 28 किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे.

See also  Mahakaleshwar Ujjain Live Darshan महाकालेश्वर मंदिर उज्जैन लाईव्ह दर्शन

केदारनाथ Kedarnath

केदारनाथ हिमालयातील उत्तराखंडाच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये मंदाकिनी नदीच्या किनारी आहे. पुराना प्रमाणे भगवान विष्णू जगाच्या कल्याणा करिता पृथ्वीवर निवास करण्यासाठी आले त्यांनी बद्रीनाथ मध्ये आपले पहिले पाऊल ठेवले. हे अगोदर भगवान शिवाचे स्थान होते. परंतु भगवान विष्णूसाठी त्यांनी या स्थानाचा त्याग केला आणि केदारनाथमध्ये वास्तव्य केले. या ठिकाणी शंकर यांनी आपल्या वयाच्या 32 व्या वर्षी समाधी घेतली. केदारनाथ हे ज्योतिर्लिंगा बरोबरच चार धामांपैकी एक धाम आहे. प्रतिकूल हवामानामुळे हे मंदिर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत दर्शनासाठी खुले असते.

घृष्णेश्वर Ghrushneshwar

बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वराचे एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. शिवलिंगाच्या उपासकांसाठी पवित्रस्थान असलेल्या घृष्णेश्र्वर मंदिरात शिवभक्तांची खूप मोठी गर्दी असते. घृष्णेश्वराचे मंदिर संभाजी नगर जिल्ह्यात असून वेरूळ पासून अगदी जवळ आहे. अशाप्रकारे 12(बाराही)ज्योतिर्लिंग jyotirling स्थळ खूप प्रसिद्ध आहेत. तुम्ही या स्थळांना नक्की भेट द्या व बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन द्या.

“आमचा लेख बारा ज्योतिर्लिंगा विषयी 12 jyotirling कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment