Mahakaleshwar Ujjain Live Darshan महाकालेश्वर मंदिर हे एक बारा ज्योतिर्लिंगांपैकी ठिकाण आहे. महाकालेश्वर मंदिर मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन या नगरामध्ये आहे. पुराणांमध्ये, महाभारतामध्ये आणि कालिदासांनी असलेल्या ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख मिळतो. महाकवी कालिदासाने ‘मेघदूत’ मध्ये उज्जैन च्या मंदिराची प्रशंसा केलेली आहे.
1235 इ. स मध्ये अल्तमश ने या प्राचीन मंदिराचा विध्वंस केला, त्यानंतर जे शासक आले त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार आणि सौंदर्यीकरण यावर विशेष ध्यान दिले. मंदिराच्या इतिहासावर प्रकाश टाकता असे समजते की उज्जैन 1107 ते 1728 इसवीसन पर्यंत येथे यवनांचे शासन होते.
या शासन काळामध्ये अवंती हिंदूंचे 4500 वर्षापूर्वीचे स्थापित धार्मिक स्थळ नष्ट झाले होते परंतु 1690 मध्ये मराठ्यांनी माळवा क्षेत्रावर आक्रमण केले आणि 29 नोव्हेंबर 1728 ला मराठ्यांनी मालवा क्षेत्र आपल्या आधिपत्यमध्ये घेतला. त्यानंतर उज्जैन चा गेलेला गौरव पुन्हा मिळवल्या गेला.
Mahakaleshwar Mandir Live Darshan
मराठा शासन काळामध्ये येथे दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्या म्हणजे, एक महाकालेश्वर मंदिराचे पुनर्निर्माण केल्या गेले आणि दुसरे ज्योतिर्लिंग पुनरप्रतिष्ठा तसेच सिंहस्थ पर्वचे स्नान याची स्थापना केल्या गेली. राजा भोज यांनी या मंदिराचा विस्तार केला.
महाशिवरात्री तसेच श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी असते. मंदिरामध्ये एक छोटासा जलस्त्रोत आहे त्याला ‘कोटीतिर्थ’ म्हटल्या जाते.