चला तर आपण आज आपला आवडता क्रिकेट खेळाडू विराट कोहली याची माहिती बघूया :—
याचे नाव :- चिकू,किंग ऑफ क्रिकेट, रन मशीन king
जन्म :- ५नोव्हेंबर, १९८८ (वय: ३२) दिल्ली,.भारत
उंची :– ५ फु ९ इं गोलंदाजीची पद्धत :-उजव्या हाताने
Virat Kohali Information in Marathi विराट कोहली
हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणार्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे.इएसपीएन च्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलीट्सच्या २०१६ च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या संघाकडून तो खेळतो, आणि २०१३ पासून तो संघाचा कर्णधार आहे. कर्णधार झाल्यापासून तो खूप अचूक फलंदाजी खेळतो.
दिल्लीसाठी विविध वयोगटातील आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, विराट कोहलीने २००८ साली मलेशियामधील खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले. त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट २००८मध्ये, १९ वर्षांचा असताना त्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.
सुरुवातीला राखीव खेळाडू असलेल्या विराट कोहलीने लवकरच भारताच्या मधल्या फळीमध्ये एक महत्त्वाचे स्थान प्राप्त केले. २०११ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. कोहली आपला पहिला कसोटी सामना २०११ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध किंगस्टन येथे खेळला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने “एकदिवसीय विशेषज्ञ” हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला.
त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली२०-२० २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले.
२०१२ मध्ये कोहलीची भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्याने अनेकदा कर्णधार धोनीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली. २०१४ मध्ये धोनिने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर, कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला.
सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील बरेच विक्रम कोहलीच्या नावे आहेत. त्यांत सर्वात जलद शतक, सर्वात जलद ५००० धावा आणि सर्वात जलद १० शतके या विक्रमांचा समावेश आहे. सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे.
२०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके (१६) करण्याचा विक्रम सुद्धा कोहलीच्या नावे आहे.विराट हा तिन्ही खेळाच्या प्रकारात धावांचा वर्षाव करतो म्हणून त्याला ”विराट द रन मशीन” म्हटले आहे.
कोहलीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांत आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू २०१२ आणि २०११-१२ व २०१४-१५ साठीचा बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कारसुद्धा समाविष्ट आहे. २०१३ मध्ये त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले.
स्पोर्ट्सप्रो (Sports Pro), नावाच्या एका इंग्लंडच्या मासिकाने २०१४ मध्ये कोहलीला दुसरा सर्वात उल्लेखनीय खेळाडू म्हणून उल्लेखले आहे.११ डिसेंबर २०१७ रोजी विराट कोहली सिने अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत विवाहबद्ध झाला. विराट IPL मध्ये विराट आणि ए.बी.डिव्हीलियर्स या दोघांचा थाट वेगळाच असतो आणि ते दोघे एकमेकांचे खास मित्रही आहेत..
सुरुवातीचे जीवन
विराट कोहलीचा जन्म :- ५ नोव्हेंबर ,१९८८रोजी दिल्लीतील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला त्याचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी आहे. त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे. त्याच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांचा असल्यापासून कोहली त्याची क्रिकेट बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे.
कोहली उत्तम नगरमध्ये लहानाचा मोठा झाला आणि विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण सुरू झाले. १९९८ साली, पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीची स्थापना झाली, आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता.
“विराटने गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालविण्याऐवजी त्याचे नाव एका व्यावसायिक क्लबमध्ये नोंदवा”, असे शेजाऱ्यांनी सुचविल्यानंतर कोहलीचे वडील त्याला अकादमीमध्ये घेऊन गेले.अकादमीमध्ये कोहलीने राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्यावेळी नोयडा जवळच्या सुमित डोग्रा अकादमीकडून ही तो सामने खेळल
.नववीमध्ये असताना क्रिकेट सरावासाठी मदत म्हणून त्याने दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहातीमधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला. खेळा शिवाय कोहली अभ्यासातही हुशार होता. त्याचे शिक्षक त्याला ‘एक तेजस्वी आणि हुशार मुलगा’ समजत.
मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यावर असलेल्या कोहलीच्या वडीलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलत असताना कोहली सांगतो, “मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. लहान वयात माझ्या वडिलांचे निधन झाले, कौटुंबिक व्यापारही व्यवस्थित चालत नव्हता,
आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. कुटुंबावर कठीण वेळा आल्या… हे सर्व मनावर खोल रुतून बसलं आहे. कोहलीने सांगितल्यानुसार त्याच्या लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट प्रशिक्षणाला खूप पाठिंबा दिला होता, “माझे वडील हा माझा सर्वात मोठा आधार होता. ते नेहमी मला सरावासाठी घेऊन जात असत.
अजूनही कधी कधी मला त्यांच्या सहवासाची आठवण होते.”चुका उधृत करा: २००३-०४ पॉली उम्रीगर ट्रॉफीसाठी त्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. त्या स्पर्धेत पाच डावांत त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह ७८ च्या सरासरीने ३९० धावा केल्या.
२००४ च्या उत्तरार्धात तो २००४-०५ विजय मर्चंट ट्राफिसाठी १७ वर्षांखालील दिल्ली संघात निवडला गेला. त्या स्पर्धेत त्याने दोन शतकांसह ११७.५० च्या सरासरीने ४७० धावा केल्या, त्यात नाबाद २५१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. २००५-०६ विजय मर्चंट ट्रॉफी, १७ वर्षांखालील दिल्लीच्या संघाने जिंकली, ज्यात कोहली सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता.
त्याने ७ सामन्यांत तीन शतकांसह ८४.११ च्या सरासरीने ७५७ धावा केल्या. फेब्रुवारी २००६ मध्ये त्याने सर्विसेसच्या दिल्लीकडून लिस्ट अ संन्याविरुद्ध संघाविरुद्ध पदार्पण केले, परंतु त्याला फलंदाजी मिळाली नाही. जुलै २००६ मध्ये कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या १९ वर्षाखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवडला गेला.
त्याने इंग्लंडच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १०५ च्या सरासरीने तर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या. भारताच्या क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांच्या दोन्ही मालिकांमध्ये अजिंक्यपद मिळवले.
दौऱ्याच्या समाप्तीच्या वेळी संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत कोहलीच्या फलंदाजीने प्रभावित होत म्हणाले, कोहलीने जलद आणि फिरकी दोन्ही गोलंदाजी विरुद्ध मजबूत तांत्रिक कौशल्य दाखविले . सप्टेंबर महिन्यात भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला.
कोहलीने पाकिस्तान १९ वर्षाखालील क्रिकेट विरुद्ध कसोटी मालिकेत ५८तर एकदिवसीय मालिकेत ४१.६६ च्या सरासरीने धावा केल्या. ऑक्टोबर मध्ये दिल्ली १९ वर्षांखालील क्रिकेट संघाकडून खेळताना त्याने विनू मांकड ट्रॉफीमध्ये १५ च्या सरासरीनेआणि कुचबिहार ट्रॉफीमध्ये ७२.६६ च्या सरासरीने धावा केल्या. त्यानंतर तो विजय हजारे ट्रॉफीसाठी उत्तर विभाग १९ वर्षांखालील संघामध्ये निवडला गेला, ज्यामध्ये त्याने दोन सामन्यांत २८ च्या सरासरीने धावा केल्या.
मी ज्याप्रकारे खेळाला सामोरा गेलो, त्यामुळे तो दिवसच बदलला. माझ्या मनात एकच गोष्ट होती – की मला माझ्या देशासाठी खेळायचं आहे आणि माझ्या वडिलांसाठी ते स्वप्न जगायचं आहे. कोहली त्याच्या कर्नाटक विरुद्धच्या खेळीबद्दल. कोहलीने नोव्हेंबर २००६ मध्ये, तो १८ वर्षांचा असताना तामिळनाडूविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले.
एप्रिल २००७
मध्ये त्याने ट्वेंटी २०त पदार्पण केले आणि आंतरराज्य टी२० स्पर्धेत ३५.८० च्या सरासरीने १७९ धावा करून त्याच्या संघामध्ये त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने श्रीलंकेचा दौरा केला. त्यानंतरच्या दोन कसोटी सामन्यांच्या मलिकेत त्याने एका शतकाच्या आणि एका अर्धशतकाच्या जोरावर १२२ च्या सरासरीने २४४ धावा केल्या.
तो एक भक्कम शरीरयष्टी असलेला खेळाडू आहे. तो त्याची शरिरीक क्षमता त्याच्या खेळात वापरतो आणि त्याला त्याच्या कौशल्याची जोड देतो.
फेब्रुवारी-मार्च २००८
मध्ये कोहली मलेशिया मध्ये पार पडलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट वर्षाखालील विश्वचषक जिंकणार्या संघाचा कर्णधार होता. ४थ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ६ सामन्यांमध्ये ४७च्या सरासरीने त्याने २३५ धावा केल्या, आणि सर्वात जास्त धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान मिळविले.
स्पर्धेमध्ये शतक झळकावणार्या तीन फलंदाजांपैकी तो एक होता. वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्धची त्याच्या ७४ चेंडूंतील १०० धावांच्या खेळीला ESPNcricinfo ने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळी म्हणून संबोधले आहे.. त्याच्या या खेळीमुळे वेस्ट इंडीज विरुद्ध भारताने ५० धावांनी विजय मिळविला आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
कोहलीला सामन्यादरम्यान पायाला दुखापत झाली परंतु इंग्लंड १९ वर्षांखालील संघाविरुद्ध उपांत्यपूर्व सामना खेळण्यासाठी तो वेळेत बरा झाला.
न्यूझीलंडचा संघ
न्यूझीलंड १९ वर्षाखालील क्रिकेट संघविरुद्ध विजयात त्याचा खूप मोठा वाटा होता. त्या सामन्यात त्याने २७ धावांत २ गडी बाद केले आणि लक्ष्याचा तणावपूर्ण पाठलाग करताना ४३ धावा केल्या, या सामन्यातही त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने १९ धावा केल्या, हा सामना भारताने डकवर्थ/लुईस पद्धतीनुसार १२ धावांनी जिंकला.
ESPNcricinfo ने त्याने स्पर्धेत अनेकदा केलेल्या गोलंदाजीतील बदलांची प्रशंसा केली. १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने कोहलीला ३०,०००अमेरिकी डॉलर्स किंमतीत करारावर विकत घेतले. जून २००८ मध्ये कोहली आणि त्याचे १९ वर्षांखालील संघमित्र प्रदीप संगवान व तन्मय श्रीवास्तव या तिघांनाही बॉर्डर-गावस्कर शिष्यवृत्ती देण्यात आली.
या शिष्यवृत्तीअंतर्गत तिघांनाही ब्रिस्बेन येथे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये सहा आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी मान्यता देण्यात आली. जुलै २००८ मध्ये, सप्टेंबर २००८ दरम्यान पाकिस्तानात होणार्या आय सी सी चॅम्पियन ३० जणांच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव सामील करण्यात आले. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या चार संघांच्या उदयोन्मुळ खेळाडूंच्या स्पर्धेसाठी भारतीय उदयोन्मुख खेळाडूंच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला. त्या स्पर्धेतील सहा सामन्यांत त्याने ४१.२० च्या सरासरीने २०६ धावा केल्या.सर्वात चांगला कॅप्तैन आहे.विराट
कोहली याला २०१८ या वर्षीच्या इंडियन प्रेमियर लीगसाठी १७ कोटी रुपयाला राँयल चलेन्जेर्स बंगलोर या संघाने रिटेन केले आहे.
आंतरराष्ट्रीय कारकिर्द
ऑगस्ट २००८ मध्ये, श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी आणि पाकिस्तानात आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणार्या भारतीय संघामध्ये कोहलीची निवड करण्यात आली. श्रीलंकेच्या दौर्याआधी कोहली फक्त आठ लिस्ट अ सामने खेळला होता. त्यामुळे त्याच्या संघात निवडल्या जाण्याबद्दल आश्चर्य व्यक्त झाले. श्रीलंकेच्या दौर्यादरम्यान सचिन तेंडुलकरआणि विरेंद्र सेहवाग हे दोन्ही सलामीवीर जायबंदी झाल्याने, कोहलीने पूर्ण दौर्यामध्ये कामचलाऊ सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडली
वयाच्या १९ व्या वर्षी पदार्पणाच्या एकदिवसीय लढतीत तो फक्त १२ धावांवर बाद झाला. मालिकेतील चौथ्या सामन्यात त्याने ५४ धावा काढून तो सामना व मालिका जिंकण्यात योगदान दिलेइतर तीन सामन्यांत त्याने ३७, २५ आणि ३१ धावा केल्या.भारताने मालिका ३-२ अशी जिंकली. हा भारताचा श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत पहिलाच मालिका विजय होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ पुढे ढकलली गेल्या नंतर जायबंदी शिखर धवन जागी कोहलीची सप्टेंबर २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी मालिकेसाठी भारत अ संघात निवड झाली. दोन सामन्यांच्या मालिकेत त्याला एकदाच फलंदाजी मिळाली, त्यात त्याने ४९ धावा केल्या.
त्यानंतर त्याच महिन्यात तो निस्सार ट्रॉफीमध्ये एस एन जी पी एल विरुद्ध दिल्लीकडून खेळला, आणि दोन्ही डावांत तो ५२ आणि १९७ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला. सामना अनिर्णित राहिला परंतु एसएनजीपीएलचा संघाने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर ट्रॉफी जिंकली. ऑक्टोबर २००८ मध्ये कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय अध्यक्षीय XI संघाकडून चार दिवसीय सामना खेळला. त्याने ब्रेट ली,स्टुअर्ट क्लार्क, मिचेल जोन्सन, पीटर सिडल,जोसन क्रेझा अशा दिग्गज गोलंदाजांचा सामना करत १०५ आणि नाबाद १६ धावा केल्या.
नोव्हेंबर २००८
मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशी खेळल्या गेलेल्या मालिकेसाठी कोहलीची निवड झाली, परंतु तेंडुलकर आणि सेहवागच्या संघातील समावेशामुळे त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. डिसेंबर २००८ मध्ये बीसीसीआयच्या वार्षिक करारांच्या यादीत त्याला ड दर्जाचा करार देण्यात आला, ज्यामुळे तो १५ लाख रुपये मिळण्यास पात्र ठरला. त्यानंतर जानेवारी २००९ च्या श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत होणार्या दौर्यातून त्याला वगळण्यात आले.
जुलै-ऑगस्ट २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात होणार्या चार संघांच्या उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेसाठी कोहलीची निवड झाली. त्याने भारत उदयोन्मुख खेळाडूंच्या संघासाठी या स्पर्धेत सलामीवीराची भूमिका बजावली. सदर स्पर्धेत त्याने सात सामन्यांत ६६.३३ च्या सरासरीने स्पर्धेत सर्वाधिक ३९८ धावा केल्या.
त्याने ब्रिस्बेनयेथील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध १०२ चेंडूत १०४ धावा केल्या. भारताने तो सामना १७ धावांनी जिंकून विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या शेवटी राष्ट्रीय निवडसमितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत कोहलीच्या कामगिरीवर खूष होऊन म्हणाले, “मला सांगावसं वाटतंय, सलामीवीर विराट कोहली खूपच छान खेळला. त्याने खेळलेल्या काही फटकेच त्याची क्षमता सिद्ध करतात. कोहलीच्या मते ही स्पर्धा म्हणजे त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा क्षण होता.
कोहलीने नंतर श्रीलंकेतील त्रिकोणी मालिकेतीलजायबंदी गौतम गंभीरची जागा घेतली.२००९आय.सी. सी.चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जायबंदी युवराज सिंगच्या जागी ४थ्या क्रमांकावर कोहलीने फलंदाजी केली. फारसे महत्व नसलेल्या गट सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध १३० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना त्याने नाबाद ७९ धावा करीत पहिल्यांदाच सामनावीराचा पुरस्कार मिळवला.
विरुद्धच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मायदेशी होणाऱ्या सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोहलीची एक आरक्षित फलंदाज म्हणून निवड झाली, त्यापैकी दोन सामन्यांत तो दुखापत झालेल्या युवराज सिंग आणि गौतम गंभीर ऐवजी खेळला. डिसेंबर २००९ मध्ये मायदेशी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी कोहलीची निवड झाली.
त्याने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात २७ आणि ५४ धावा केल्या. त्यानंतर दुखापतीतून सावरलेल्या युवराज सिंगने तिसर्या सामन्यासाठी त्याची जागा घेतली. परंतु, युवराजच्या वारंवार उद्भवणार्या बोटाच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले.कोलकात्याच्या ४थ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने संघात पुनरागमन केले. त्याने १११ चेंडूंत १०७ धावा करीत पहिले एकदिवसीय शतक साकारले.
गौतम गंभीरने त्याच्या सर्वोच्च १५० धावा करून कोहलीसोबत तिसर्या गड्यासाठी २२४ धावांची भागीदारी केली. भारताने सात गडी राखून सामना जिंकला आणि मालिकेमध्ये ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. गंभीरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, तो त्याने कोहलीला दिला.
जानेवारी २०१० मध्ये झालेल्या बांगलादेश मधील त्रिकोणी मालिकेसाठी तेंडूलकरला विश्रांती देण्यात आली, त्यामुळे कोहलीला भारताच्या सर्वच्या सर्व पाच सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. श्रीलंकेविरुद्ध पराभव झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने ९ धावा केल्या, परंतु त्यानंतरच्या बांगला विरुद्धच्या सामन्यात २९७ धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी ५१/३ अशी कोसळली असताना त्याने ९१ धावांची खेळी करून भारताला विजय प्राप्त करून दिला.
पुढच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कोहलीने नाबाद ७१ धावा केल्या, त्यामुळे भारताने केवळ ३३ षटकांत २१४ धावांचा पाठलाग करून बोनस गुण मिळवला. पुढच्याच दिवशी त्याने बांगलादेशविरुद्ध त्याचे दुसरे शतक झळकावले आणि भारताने तो सामनासुद्धा जिंकला.भारतातर्फे २२व्या वाढदिवसाआधी दोन शतके झळकाविणारा तेंडूलकर आणि सुरेश रैनानंतर तो तिसराच फलंदाज.
या मालिकेमधील कोहलीच्या कामगिरीमुळे त्याची खुप प्रशंसा करण्यात आली, प्रामुख्याने कर्णधार धोणीद्वारा. श्रीलंके विरुद्ध अंतिम सामन्यात भारत ४ गडी राखून पराभूत झाला त्यात कोहलीने फक्त २ धावा केल्या,परंतु तरीही पाच डावांमध्ये ९१.६६ च्या सरासरीने २७५ धावा काढून तो मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.
फेब्रुवारी २०१० :- मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये दोन सामन्यांत त्याने ३१ आणि ५७ धावा केल्या.
तलागळातून वर कसा आला विराट-
पहिला पर्यायअसणार्या खेळाडूंना मे-जून २०१० दरम्यान होणार्या श्रीलंका आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या त्रिकोणी मालिकेमधून वगळण्यात आल्यामुळे रैनाची कर्णधार म्हणून तर कोहलीची उपकर्णधार म्हणून निवड झाली. कोहलीने दोन अर्धशतकांसह ४२.०० च्या सरासरीने १६८ धावा केल्या, परंतु चार सामन्यांपैकी तीन मध्ये पराभव झाल्याने भारत स्पर्धेतून बाद झाला. मालिकेदरम्यान, कोहली भारतातर्फे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. त्याने हरारे येथे झिंबाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले आणि नाबाद २६ धावा केल्या.
नंतर त्याच महिन्यात २०१० आशिया चषकासाठी कर्णधार धोणी आणि उपकर्णधार सेहवागच्या नेतृत्वाखाली भारताने आपला पूर्ण ताकदीचा संघ निवडला. संपूर्ण मालिकेमध्ये कोहलीने ३र्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि १६.७५ च्या सरासरीने ६७ धावा केल्या.
ऑगस्ट २०१० मध्ये पार पडलेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या त्रिकोणी मालिकेमध्ये सुद्धा त्याला सूर गवसला नाही. त्या मालिकेत तो फक्त १५ च्या सरासरीने धावा करू शकला. कोहली न्यूझीलंड विरुद्ध २०१० मध्ये फलंदाजी करताना.खराब कामगिरीनंतरसुद्धा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑक्टोबरमध्ये झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी कोहलीची निवड झाली. पहिला आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला.
विशाखापट्टणम् येथील दुसर्या सामन्यात कोहलीने त्याचे तिसरे एकदिवसीय शतक साजरे केले. त्याने १२१ चेंडूंत ११८ धावा केल्या त्यामुळे हा सामना २९० धावांचा पाठलाग करत असताना सलामीवीरांना लवकर गमावूनसुद्धा भारताने जिंकला.त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि त्याने कबूल केले की आधीच्या दोन मालिकांमधील अपयशामुळे भारतीय संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी तो दडपणाखाली होता.
२०१० च्या शेवटी न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिका गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताचा एक खूपच अननुभवी संघ निवडण्यात आला, ज्यात कोहलीने आपले स्थान राखले.गुवाहाटीमधल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने १०४ चेंडूत १०५ धावा केल्या, हे त्याचे लागोपाठ दुसरे व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील चवथे शतक.
सामन्यामध्ये भारताने ४० धावांनी विजय मिळवला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.दुसर्या आणि तिसर्या सामन्यात त्याने धावांचा पाठलाग करताना गंभीरसोबत १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आणि अनुक्रमे ६४ आणि ६३* धावा केल्या. भारताने मालिकेत न्यूझीलंडला ५-० ने हरवून व्हॉईटवॉश दिला. कोहलीच्या या मालिकेतील कामगिरीमुळे तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात एक नियमित झालाआणि तो भारताच्या विश्वचषक संघाचा एक प्रबळ दावेदार झाला २०१० मध्ये २५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७.३८ च्या सरासरीने ३ शतकांसह त्याने ९९५ धावा केल्या. त्यावर्षीची ही भारतीय फलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.
जानेवारी २०११ चा दौरा :– या दौऱ्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरकोहली एका आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याच्या मालिकेत आणि सर्वच्या सर्व पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत खेळला. टी२० सामन्यात भारताचा विजय झाला.
या सामन्यात त्याने २८ धावा केल्या, परंतु एकदिवसीय मालिकेत भारताचा २-३ असा पराभव झाला.
एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतकांसह ४८.२५ च्या सरासरीने त्याने १९३ धावा केल्या. एकदिवसीय मालिकदरम्यान विश्वचशकासाठी १५ खेळाडूंचा संघ ज्यात कोहलीचेही नाव होते मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत कोहली दुसर्या स्थानावर पोहोचला.
विश्वचशक संघ
विश्वचशकाच्या संघात कोहली आणि रैना दोघांचाही समावेश झाल्याने, शेवटच्या अकरा जणांत कोण खेळणार याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. स्पर्धेमधल्या भारताच्या पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधी धोणीने सूचित केले की, रैनाऐवजी ऐन भरात असलेल्या कोहलीला प्राधान्य दिले जाई.
भारताच्या विश्वचषकाच्या यशस्वी मोहिमेमध्ये कोहली प्रत्येक सामना खेळला. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद १०० धावा करीत आपले पाचवे एकदिवसीय शतक साजरे केले आणि पदार्पणातल्या विश्वचषकात शतक झळकाविणारा पहिला भारतीय फलंदाज बनला.
पुढच्या चार सामन्यांत त्याने इंग्लंड,आयर्लंड, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने अनुक्रमे ८, ३४, १२ आणि १ अशा खूपच कमी धावा केल्या. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याला त्याचा सूर सापडला आणि त्याने युवराज सिंग सोबत तिसर्या गड्यासाठी १२२ धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ५९ धावांचा होता.ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य सामन्यात त्याने २४ धावा केल्या, आणि पाकिस्तान विरुद्ध उपांत्य सामन्यात तो ९ धावा काढून बाद झाला.
भारताने दोन्ही सामने जिंकून मुंबईतील श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात २७५ धावांचा पाठलाग करताना पहिल्या सात षटकांमध्ये दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहली आणि गंभीरने तिसर्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी केली, ज्यात कोहलीने ३५ धावा केल्या.ही भागीदारी म्हणजे “सामन्याचा एक टर्निंग पॉईंट होता”. भारताने सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला आणि १९८३ नंतर पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला.
भारतीय संघाच्या वेस्टइंडिज दौऱ्यासाठी भारताने खूपच अनुभवी संघ निवडला, ज्यात तेंडूलकरला विश्रांती देण्यात आली आणि गंभीर व सेहवागला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. कसोटी संघामध्ये पदार्पण करण्यार्या तीन खेळाडूंपैकी एक कोहली होता.एकदिवसीय मालिका कोहलीसाठी यशस्वी ठरली.
त्याने ३९.८० च्या सरासरीने १९९ धावा केल्या. ही मालिका भारताने ३-२ अशी जिंकली. त्याची सर्वोत्कृष्ट खेळी ठरली ती पोर्ट ऑफ स्पेन मधील दुसर्या एकदिवसीय सामन्यातली. भारताने सामना ७ गडी राखून जिंकला, त्यात कोहलीने ८१ धावा केल्या आणि सामनावीराचा पुरस्कार मिळविला.
पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९४ धावा केल्या परंतू भारताच्या पदरी ७ गडी राखून पराभव पडला. कोहलीने त्याचे कसोटी पदार्पण त्यानंतर लगेचच झालेल्या किंग्स्टन मधील पाहिल्या कसोटीत केले. त्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर खेळला आणि ४ व १५ धावांवर बाद झाला.
दोन्ही वेळेस तो यष्टींमागे फिडेल एकवर्ड्स कडे झेल देऊन बाद झाला.भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली परंतू संपूर्ण मालिकेमध्ये कोहली धावांसाठी झगडताना दिसला, तो ५ डावांमध्ये फक्त ७६ धावा करू शकला आखूड टप्प्याच्या चेंडूविरूद्ध त्याला संघर्ष करावा लागला. आणि विशेषतः एडवर्डसच्या जलद गोलंदाजीने त्याला त्रस्त केले, त्याने त्याला मालिकेत तीन वेळा बाद केले.
विराटचा जुलै आणि ऑगस्ट २०११ दरम्यान पारपडलेला सामना- इंग्लंड विरुद्धच्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेतून सुरुवातीला वगळण्यात आलेल्या कोहलीला, दुखापतग्रस्त युवराजच्या जागी पाचारण करण्यात आले,परंतू त्याला मालिकेत एकाही सामन्यात खेळता आले नाही. त्यानंतर पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये माफक यश मिळाले, त्याने ३८.८० च्या सरासरीने धावा केल्या.
चेस्टर-ल-स्ट्रीट येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ५५ धावा केल्या, त्यानंतर पुढच्या तीन सामन्यांत त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. शेवटच्या सामन्यात, कोहलीने आपले सहावे एकदिवसीय शतक साजरे करताना राहुल द्रविड सोबत तिसर्या गड्यासाठी १७० धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ९३ चेंडूंत १०७ धावांचा होता.
राहुल द्रविडचा हा शेवटचा एकदिवसीय सामना होता, ज्यात भारताने मालिकेत पहिल्यांदा ३०० पेक्षा जास्त धावा केल्या.त्या सामन्यात कोहली हिट विकेटने बाद झाला. त्याचे शतक हे संपूर्ण मालिकेतील दोन्ही संघांकडून एकमेव शतक होते. त्याची “मेहनत” आणि “कष्ट” यामुळे त्याची खूपच प्रशंसा झाली. परंतू तरीही इंग्लंडने डकवर्थ/लुईस ने सामन्यात आणि मालिकेत ३-० असा विजय मिळवला
ऑक्टोबर २०११ मध्ये
इंग्लंड विरुद्ध मायदेशी एकदिवसीय सामन्यांमध्ये – कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ही मालिका भारताने ५-० अशी जिंकली. कोहलीने मालिकेत एकूण २७० धावा केल्या. दिल्लीतील दुसर्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९८ चेंडूंमध्ये ११२ धावा केल्या आणि गंभीरसोबत नाबाद २०९ धावांची भागीदारी केली, आणि मुंबई मध्ये ८६ धावा केल्या. दोन्ही सामन्यांत भारताने धावांचा यशस्वी पाठलाग केला.
या एकदिवसीय मालिकेतील यशामुळे नोव्हेंबर-डिसेंबर २०११ दरम्यान मायदेशी झालेल्या वेस्टइंडिज विरुद्ध कसोटी मालिकेसाठी रैना ऐवजी कोहलीची निवड करण्यात आली. युवराज सिंग बरोबर सहाव्या गड्यासाठी त्याची स्पर्धा होती, ज्यामध्ये तो फक्त शेवटच्या कसोटीत त्याची संघात निवड करण्यात आली.
सामन्यात त्याने दोनही डावांत अर्धशतक केले आणि याआधीची स्वतःची ३० धावांची सर्वोच्च कामगिरी मोडीत काढली.त्याच्या पहिल्या डावातील ५२ धावांच्या खेळीमुळे भारताला फॉलो-ऑन टाळता आला. सदर सामना अनिर्णितावस्थेत संपला.
पहिल्या दोन सामन्यांतील विजयामुळे भारताने मालिका २-० अशी जिंकली. त्यानंतरची एकदिवसीय मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवला, ज्यात कोहलीने ६०.७५ च्या सरासरीने २४३ धावा केल्या. मालिकेदरम्यान कोहलीने विशाखापट्टणम मध्ये त्याचे आठवे एकदिवसीय शतक केले.
ज्यामध्ये २७१ धावांचा पाठलाग करताना त्याने १२३ चेंडूंत ११७ धावा केल्या. त्याच्या ह्या खेळीमुळे त्याला “ॲन एक्सपर्ट ऑफ द चेस” (पाठलाग तज्ञ) असा नावलौकिक मिळाला.३४ सामन्यांत चार शतकांसह ४७.६२ च्या सरासरीने १३८१ धावा करणारा कोहली सन २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
एकदिवसीय उपकर्णधार म्हणून कसोटी
डिसेंबर २०११- च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार्या भारताच्या कसोटी संघामध्ये कोहलीची निवड झाली. युवराज सिंगला कसोटी संघातून वगळण्यात आले, क्रिकेट ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय XI संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात कोहलीने सर्वाधिक १३२ धावा केल्या, आणि बॉक्सिंग डे कसोटीसाठी स्वतःचे स्थान बळकट केले.
मेलबर्न येथील पहिल्या कसोटी सामन्यात कोहलीची निवड झाली, परंतू सामन्यात त्याचे बचावतंत्र उघड झाले. बेन हिल्फेन हौसने त्याला पहिल्या डावात ११ धावांवर तर दुसर्या डावात पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद केले.सिडनी मधील दुसर्या कसोटीतही त्याला धावांसाठी संघर्ष करावा लागला, त्याने २४ आणि ९ धावा केल्या.
सामन्याच्या दुसर्या दिवशी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना, त्याने दर्शकांकडे पाहून मधले बोट दाखवले, त्यासाठी त्याला सामनाधिकार्यांनी त्याच्या सामना शुल्कापैकी ५०% रकमेचा दंड ठोठावला. पर्थमधील तिसर्या सामन्यात भारताने सलग दुसर्यांदा डावाने शरणागती पत्करली.
तरीही दोन्ही डावांमध्ये ४४ आणि ७५ धावा करून कोहली भारतातर्फे सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. ॲडलेड मधील चवथ्या आणि शेवटच्य सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीने पहिले शतक साजरे केले, त्याने ११६ धावा केल्या; भारतीय फलंदाजांतर्फे संपूर्ण मालिकेमधील हे एकमेव शतक होते.
भारताने मालिका ४-० अशी गमावली आणि मालिकेमध्ये भारताकडून कोहलीने सर्वात जास्त धावा केल्या. त्याला उद्देशून “द लोन ब्राइट स्पॉट इन ॲन अदरवाईज नाईटमेयर विजीट फॉर द टूरिस्ट” (पाहुण्यांच्या दुःस्वप्नातील एकमेव तेजस्वी ठिपका) असे वर्णन करण्यात आले.
कसोटी मालिका Virat Kohali
कसोटी मालिकेनंतर, भारतीय संघ ऑसट्रेलियामध्ये दोन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका आणि कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिकांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध खेळला. १-१ अशा अनिर्णितावस्थेत संपलेल्या टी२० मालिकेमध्ये कोहलीने २२ आणि ३१ धावा केल्या. त्रिकोणी मलिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला, ज्यात कोहली ३१ धावा करुन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
पर्थ येथील श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या सामन्यात त्याने ७७ धावा केल्या आणि भारताने सामना चार गडी राखून जिंकला.[ पुढील पाच सामन्यात त्याने १८, १५, १२, ६६ आणि २१ धावा केल्या. भारतीय संघाला सात सामन्यांमध्ये फक्त दोन विजय आणि एक बरोबरी प्राप्त करता आली याचा अर्थ स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी, होबार्ट मधील श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात संघाला बोनस गुणासहीत विजयाची गरज होती.श्रीलंकेच्या ३२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, कोहली मैदानात उतरला तेव्हा भारतीय संघाची स्थिती २ बाद ८६ अशी होती. कोहलीच्या ८६ चेंडूंतील १३३ धावांच्या स्फोटक खेळीमुळे भारताने श्रीलंकेचे आव्हान १३ षटके राखून सहज पार केले.
त्याने लथीस मलिंगकाच्या एका षटकामध्ये २४ धावा फटकावल्या. भारताने सामन्यात बोनस गुणासह विजय मिळवला आणि कोहलीला त्याच्या मेहनतीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक डीन जॉन कोहलीच्या खेळीबद्दल म्हणाला, ” महान एकदिवसीय खेळींपैकी ही एक आहे.” परंतू तीन दिवसांनंतर श्रीलंकेने त्यांच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून भारताला मालिकेतून बाद केले.पुन्हा एकदा मालिकेत भारतातर्फे शतक झळकाविणारा एकमेव फलंदाज विराट कोहलीच होता, त्याने ५३.२८ च्या सरासरीने ३७३ धावा केल्या
अशाप्रकारे भारताच्या महान फलंदाज पैकी Virat Kohali आहे.