तुळजाभवानी देवस्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले एक प्रमुख देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा आपल्याला कळस दिसत नाही.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस मानाचे स्थान आहे. मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता आहे. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे.
40 टक्के अनुदानासह छतावर सौर पॅनल बसवा
तुळजापूर हे महाराष्ट्र मधील प्रसिद्ध देवस्थान. देवीच्या साडेतीन पीठांपैकी तुळजापूरचे मंदिर आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रामध्ये येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. साडेतीन पीठा मध्ये श्री क्षेत्र कोल्हापूर श्री महालक्ष्मी माता, श्रीक्षेत्र माहूर देवी रेणुकामाता, श्री क्षेत्र तुळजा भवानी तुळजापुर आणि श्री क्षेत्र सप्तशृंगी माता आहेत.