स्विस बँकेत कोन उघडू शकतो अकाउंट? Swiss Bank Account

Swiss Bank Account – कोरोना संकट आणि भारत-चीन तणाव यामुळे अस्थिरता आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या वातावरणात निवडक भारतीय नागरिकांनी स्विस बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा केली. मागील 13 वर्षांचा आढावा घेतला. तर स्विस बँकेत एका वर्षात जमा झालेली 2020 मधील रक्कम ही सर्वात मोठी रक्कम आहे.

स्विस बँकेत कोन उघडू शकतो अकाउंट? Swiss Bank Account

या प्रकरणी केंद्र सरकार आणखी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. पण या निमित्ताने स्विस बँक आणि तिथली बँक खाती यावरुन चर्चेला उधाण आले आहे.

स्विस बँकेत कोण खाते उघडू शकते? Who open account in Swiss Bank गोपनीयता कशी राखली जाते? याविषयी सामान्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. तुम्ही सिनेमांमध्ये किंवा आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये लोकांना स्विस बँकेत पैसे ठेवल्याचे ऐकले असेल तसेच आपण कोणाच्याही काळा पैसा किंवा ब्लॅक मनी बद्दल बोललो तर आपण असेच म्हणतो की, याने स्विस बँकेत पैसे ठेवलेले असावे परंतु आपण असे का म्हणतो? कारण या बँकेत पैसे ठेवलेल्या व्यक्तींचा डाटा कोणालाच मिळत नाही.

ज्यामुळे हे लोक इन्कम टॅक्स आणि अन्य अधिकाऱ्यांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांचे पैसे या बँकेत ठेवतात असे बोलले जाते परंतु या यामध्ये लोक का पैसे ठेवतात? यामागचे खरे कारण माहीत आहे का? स्विस बँक म्हणजे स्विझरलँड मधील बँक. स्विझरलँड हे जगातील सगळ्यात स्टेबल आणि चांगली अर्थव्यवस्था असलेल्या देशां पैकी एक आहे. हेच कारण आहे, ज्यामुळे स्वित्झर्लंडमधील बँकांवर लोक अधिक विश्वास ठेवतात. आपल्या गोपनीयता धोरणामुळे म्हणजेच त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे स्विस बँकेची जगभरात चर्चा आहे, कारण ते ग्राहकांची माहिती कोणाबरोबरही शेअर करत नाही.

स्विझरलँड हा जगातील एक श्रीमंत देश आणि एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र देखील आहे. 1934 च्या बँकिंग कायद्यात ग्राहकांची ओळख जाहीर करणे हा एक गुन्हा आहे. यामुळे बँक कोणत्याही ग्राहकाची माहिती कोणालाही देत नाही. ही माहिती केवळ बँकेकडे असते. म्हणजे जर तुम्ही बँकेत पैसे जमा केले, तरी तुमचं यामध्ये खाते आहे किंवा नाही किंवा खात्यात किती पैसे आहेत? याची माहिती कोणालाही दिली जात नाही. या व्यतिरिक्त जेव्हा खातेदाराकडून बँकेत पैसे जमा केले जातात तेव्हा हे पैसे कुठून आले आणि त्या पैशांची स्त्रोत काय? असा प्रश्न त्यांना विचारला जात नाही.

See also  Doctors fitness certificate for driving licence वयाच्या चाळीशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणारे डॉक्टरांचे प्रमाणपत्र

यामुळे लोक कोणत्याही अडचणी शिवाय लाखो रुपये बँकेत जमा करतात. असे मानले जाते की, तिथे केवळ काळा पैसा ठेवला जातो, कारण कोणत्याही सोर्सशिवाय किंवा हा पैसा कुठून आला अशी कोणतीही माहिती न मागता पैसे जमा करतात. तसेच ही बँक आपली माहिती इतर कोणालाही देत नाही. इतकेच नाही तर जेव्हा तुम्ही बँकेत खाते उघडता. तेव्हा बँक तुमच्याशी फक्त खाते क्रमांकावर व्यवहार करते. बँकेला तुमचे नाव पत्ता किंवा व्यवसाय इत्यादी बद्दल कोणतीही माहिती नसते. त्यामुळे लोकांची प्रायव्हसी जपली जाते. केवळ पुष्कळ पैसे असलेले लोक स्विस बँकेत खाते उघडू शकतात, परंतु तसे नाही या बँकांमध्ये 18 वर्षापेक्षा जास्त वयाची प्रत्येक व्यक्ती खाते उघडू शकते. परंतु त्या व्यक्तीकडे वैद्य पासपोर्ट असणे आवश्यक आहे. परंतु या बँकांना जर समजले की, या व्यक्तीचे उत्पन्न चुकीच्या मार्गाने आलेले आहे, तर बँका अशा लोकांचे खाते रद्द करू शकतात.

Leave a Comment