Doctors fitness certificate for driving licence वयाच्या चाळीशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणारे डॉक्टरांचे प्रमाणपत्र

Doctors fitness certificate for driving licence मित्रांनो आपल्या वयाची 40 वर्ष पूर्ण झाली असतील आणि त्यानंतर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन परवाना काढायचा असेल तर एमबीबीएस डॉक्टरांची वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे आहे पूर्वी हे प्रमाणपत्र ऑफलाइन सादर करायचे होते मात्र आता यामध्ये बदल होऊन ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे त्यामुळे आता वयाच्या चाळीशी नंतर आपण जर शारीरिक दृष्ट्या सक्षम नसाल तर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही.

म्हणजेच आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स 40 वर्षे वयानंतर पाहिजे असेल तर वैद्यकीय व शारीरिक दृष्ट्या आपण सक्षम असलं पाहिजे म्हणजेच आपण महान व्यवस्थित चालू शकतो असा त्याचा अर्थ होतो.

आता आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याकरिता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली आहे या अंतर्गत आपल्याला घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढणे सोयीचे झाले आहे त्यामुळे तुम्ही जर चाळीशी ओलांडली असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स करिता किंवा नूतनीकरण न करता आपल्याला डॉक्टरांची वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करावी लागणार आहे याकरता आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे आणि त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करावे लागणार आहे त्यामुळे चाळिशीनंतर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे तरच तुम्ही वाहन परवाना काढू शकणार आहात.

ऑनलाईन लर्निंग लायसन्स कसे काढावे?

ड्रायव्हिंग लायसन काढण्याकरता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात. तसेच दलालांकडून अतिरिक्त पैसे सुद्धा घेतले जातात अशी ओरड बरेच जण करतात आणि त्यामुळेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली आहे या सेवेअंतर्गत लाखो लोकांचे ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यात आलेले आहे.

यापूर्वीसुद्धा चाळीशीनंतर वाहन परवाना पाहिजे असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक होते परंतु आता ते ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहे या करता आपल्याला लोगिन आयडी देण्यात येणार आहे लोगिन आयडी वापरून मिळालेले प्रमाणपत्र आपल्याला वेबसाईट वर अपलोड करावे लागणार आहे. सध्या ही सेवा अंडर प्रोसेस आहे.

See also  पोलीस वाहन चालक भरती 2022 | Police Vahan Chalak Bharti 2022

लायसन्स किती वयापर्यंत मिळत असते?

आपल्याला जर वाहन चालवायचे असेल तर परवाना घेण्यासाठी चालकाचे वय हे किमान 16 वर्ष असणे गरजेचे आहे.

चालकास वयाच्या कितीही वर्षापर्यंत लायसन्स काढता येते किंवा नूतनीकरण करता येत असते परंतु वयाच्या चाळीशी नंतर वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.

चाळिशीनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर लायसन्स काढता येत नाही किंवा त्याचे नूतनीकरण सुद्धा होत नाही.

अशाप्रकारे मित्रांनो आता वयाच्या चाळीशनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याकरता आपल्याला डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल.

 

2 thoughts on “Doctors fitness certificate for driving licence वयाच्या चाळीशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणारे डॉक्टरांचे प्रमाणपत्र

Leave a Reply

Your email address will not be published.

x
error: Content is protected !!