Staff Selection Commission | कर्मचारी निवड आयोग | नमस्कार मित्रांनो, बातमी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे आता स्टाफ सिलेक्शन ही परीक्षा आधी हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषेमध्ये होत होती. परंतु आता त्यामध्ये स्टाफ सिलेक्शन ची ही परीक्षा मराठी भाषेतही होणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन एसएससी(SSC) Staff Selection Commission नॉन टेक्निकल या पदासाठी प्रथमच मराठीसह तेरा प्रादेशिक भाषा मधून परीक्षा घेता येणार आहे. त्या भाषेमध्ये उर्दू, तामिळ, मल्याळम, तेलगु, कन्नड, आसामी, बंगाली, गुजराती, कोकणी, मणिपुरी, ओडीसा, पंजाबी या भाषेतूनही परीक्षा असताना उत्तर पत्रिका आता दिली जाणार आहे. केंद्रीय कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी असे सांगितले की केवळ एखादी भाषा येत नसल्याने कोणालाही नोकरी मिळण्यात अडथळे यायला नको.
अधिकृत Website पाहण्यासाठी येथे Click करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार आहे त्यामुळे आता इंग्रजी हिंदी तसेच तेरा प्रादेशिक भाषांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन ची परीक्षा घेण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. येत्या काही काळात परीक्षा आता 22 भाषांत गीता येणार आहे केंद्र राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी असे म्हटले की कनिष्ठ पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा आता हिंदी इंग्रजी या भाषेसह तसेच मराठी व इतर 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल राज्यघटनेच्या आठव्या अधिसूचनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 22 भाषांमध्ये आगामी काळात ही परीक्षा घेण्यात यावी अशी शिफारस या मुद्द्याच्या अभ्यासासाठी नेमलेल्या समितीने केली होती त्या शिफारिचा केंद्र सरकारने स्वीकार केला आहे. आता सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा प्रादेशिक भाषा मध्ये घेण्यात यावी अशी मागणी मुख्यत्वे दक्षिण भारतातून करण्यात येत होती. त्यांचा विचार लक्षात घेऊन केंद्रीय कारणीक व प्रशिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे प्रादेशिक भाषेतून या परीक्षा घेता येतील का यावर करण्यासाठी विशेष तज्ञांची एक समितीची नेमणूक करण्यात आली होती व त्या समितीने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे.