दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | SSC-HSC Exams Timetable 2023

SSC-HSC Exams Timetable 2023 – राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा पोक यांनी माहिती दिली आहे की 21 फेब्रुवारीला बारावीची परीक्षा तर दहावीची परीक्षा 2 मार्च ला सुरू होणार आहे.

शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने सुद्धा फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे जे संभाव्य वेळापत्रक आहे ते आता जाहीर करण्यात आलेले असून हे वेळापत्रक आपण राज्य मंडळांच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावर बघू शकता दिलेले संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहिती करीत आहे परीक्षेपूर्वी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपामध्ये वेळापत्रक देण्यात येणार आहे आणि तेच अंतिम असणार आहे श्रेणी तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत कनिष्ठ महाविद्यालय व शाळांना पाठवण्यात येतील असे ओक यांनी स्पष्ट केलेले आहे. या वेळापत्रकाबाबत काही सूचना किंवा हरकती असल्यास त्यांनी विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे पंधरा दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवावे असेही मंडळामार्फत सांगितलेले आहे.

वेळापत्रकातील संभाव्य तारखा

लेखी परीक्षेचा कालावधी 12वी करिता (सर्वसाधारण तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमाकरिता) 21 फेब्रुवारी 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीमध्ये होईल.

10वी 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीमध्ये परीक्षा होईल.

दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक, पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

See also  Sarswat Bank Bharti | सरस्वत बँक भरती 2023 |

Leave a Comment