इंग्लडमधून जगदंबा तलवार भारतात परत आणण्याच्या हालचाली सुरू | Jagdamba Talwar | Bhavani Talwar

Jagdamba Talwar Bhavani Talwar मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. लंडनमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार परत आणण्याकरिता महाराष्ट्र सरकारकडून आता हालचाली सुरू झालेले आहेत. याकरिता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी आज न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे.

ऋषी सुनक भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान झालेले आहेत, त्यामुळे आता जगदंबा तलवार पुन्हा भारतात आणण्यात यावी अशा प्रकारची मागणी जोर धरत आहे. शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे जगदंबा तलवार पावन झाली होती. ही जगदंबा तलवार देशाची अस्मिता आहे, शिवाजी महाराजांची ही तलवार कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी 1875 मध्ये तत्कालीन ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेट म्हणून दिली होती.  सध्या ही तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयामध्ये आहे.

छत्रपती शिवाजी महाराज विजय दशमीच्या दिवशी या रत्नजडित जगदंबा तलवारीची पूजा करायचे. सध्या ही तलवार इंग्रजांकडे आहे आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान असल्यामुळे आता जगदंबा तलवार हे आपल्याला परत मिळेल, अशी आशा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने ही तलवार पावन झाली आहे ही तलवार महाराष्ट्राला परत करावी असे पत्र आम्ही केंद्राला पाठवले आहे तसेच ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही विनंती केली आहे असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लीक करा

See also  How To Get Pan Card In 3 Days | 3 दिवसात पॅन कार्ड कसे मिळवायचे | Pan Card Status | पॅन कार्ड स्थिती |

Leave a Comment