Sharad Pawar Family Tree शरद पवार वंशावळ

Sharad Pawar Family Tree शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर हे तीन आदर्श त्यांचे आहेत. शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदा बाई आहे. शरद पवार यांचे वडील नीरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच काळ सेक्रेटरी होते. आपण त्यांची वंशावळ सुद्धा बघू.

Sharad Pawar Family Tree शरद पवार वंशावळ

Sharad Pawar Family Tree शरद पवार वंशावळ

त्यानंतर ते बारामती येथे निघालेल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक सुद्धा झाले. तसेच त्यांची आई शारदाबाई ह्या 1938 मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या.

Sant Eknath Maharaj information in the Marathi language

Sharad Pawar यांनी तब्बल चार वेळा मुख्यमंत्री पद भूषवले आहे. बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या त्यांची मुलगी आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी पाटबंधारे मंत्री अजित पवार आहेत. यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यापूर्वी कधीही कोणत्याही नेत्याने घातलेली नव्हती. त्याची सुरुवात शरद पवार साहेबांनी केली आणि शर्ट पॅन्ट सफारी वापरणारी नवीन पिढी आली.

Sharad Pawar  साहेबांच्या कामाची विशिष्ट शैली आणि शेतकऱ्यांच्या उज्वल भवितव्याची तळमळ यातूनच त्यांनी प्रचंड मोठे काम केले.  सामान्यांकारीता  तळमळ असलेला नेता झालं नाही.

शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना पाणी आडवा पाणी जिरवा,  जलसंधारण मध्ये विकसित केलेले रूपांतर अधिक सक्षम व नवतंत्रज्ञान मोठी यंत्रसामग्री वापरून युद्धपातळीवर कराव लागेल असे निर्णय त्यांनी महाराष्ट्राकरिता घेतले. बांध,  लहान तलाव याचे भक्कम जाळे तयार केलं तर विहिरीचं पाणी सुद्धा वाढेल व ठिबक सिंचन स्प्रिंकलरने पाणी दिलं तर क्षेत्रही वाढेल असे त्याचे म्हणणे होते.

त्यातून दर्जेदार व बाजारात अधिक किंमत मिळणारा माल मिळेल.  शेतकऱ्यांना एकरी  चांगले उत्पन्न मिळेल. त्यासाठी दोन चार वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन काम पूर्ण व्हावं असे निर्णय त्यांनी घेतले.  ठिबक सिंचनास अधिक अनुदान देऊन या पाणलोट विकासासाठी पैसा अधिक लागणार तो  कमी पडणार नाही यासाठी केंद्रात सतत प्रयत्न केले .

See also  Shivneri Fort Information in Marathi शिवनेरी किल्ला

शरद पवार यांचा इतिहास Sharad Pawar Family Tree

शरद पवार हे 1956 चाली शाळेत असताना त्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता.  तेथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.

पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले. त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवार यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाण यांनी  पवार यांच्यातील सुप्त नेता हेरला व त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटीदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेक वेळोवेळी मार्गदर्शन केले.

वयाच्या चोविसाव्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. 1966 साली पवारांना युनोस्को शिष्यवृत्ती मिळाली. त्या अंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करण्याच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.

Sharad Pawar विधानसभा कार्यकाळ

शरद पवार हे सर्वप्रथम 1967 च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. श्री वसंतराव नाईक यांच्या मित्र मंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला ते ही वयाच्या 29 व्या वर्षी. 1972 आणि 1978 सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले, तसेच 1978 सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले.

यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील हे ही पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे बारा आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षांबरोबर हातमिळवणी केली व वसंतदादा चे सरकार पडले. त्यानंतर पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतराव यांनी केली.

पवार यांचा मुख्यमंत्री कार्यकाळ

Sharad Pawar यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तो दिवस होता, 18 जुलै 1978. पवारांसोबत काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले बारा आमदार काँग्रेस पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्यांचे नेते पवार हे झाले. ते राज्याचे सर्वांत तरूण मुख्यमंत्री होते.

See also  Baji Pasalkar बाजी पासलकर

तसेच 1980 साल इंदिरा गांधीचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली, त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. 1980 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस पक्षाने 288 पैकी 186 जागा जिंकल्या आणि बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.

पवारांचा लोकसभा कार्यकाळ

1984 सालच्या लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधीच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्षात राज्यातील 48 पैकी केवळ पाच जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती जागेचा समावेश होता. मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याचे राजकारणातच राहायचे ठरवले.

मार्च 1985 राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीत पवारांच्या पक्षाने 288 पैकी 30 जागा जिंकल्या आणि पवार राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.

परत विधानसभा

Sharad Pawar  यांनी राजीव गांधीच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जून 1978 मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केन्द्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. 26 जून, 1988 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली.

नोव्हेंबर, 1989 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील 48 पैकी 28 जागा जिंकल्या. पक्षाची राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांत झाली वाताहत झाली तशी महाराष्ट्रात झाली नाही. नरसिंह रावांनी पवारांना केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. 26 जून, 1991 रोजी त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली. राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. त्यांनी 6 मार्च, 1993 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली.

See also  झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या मुलाचे पुढे काय झाले? Jhanshi Rani Laxmibai

पवारांची मुख्यमंत्री पदाची चौथी कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली. ते परत मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, 12 मार्च 1993 रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले. त्यांत 257 लोक ठार तर 600 हून अधिक लोक जखमी झाले. 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले.

या संकंटांबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त  गो. रा. खैरनार यांनी पवारांना दोषी ठरवून त्यांच्यावर अनेक आरोप केले. प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचारा विरोधात उपोषण केले. तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप झाला.

23, नोव्हेंबर 1994 रोजी नागपूर येथे गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला, तेव्हा मुख्यमंत्री या नात्याने मोर्चेकऱ्यांची भेट न घेता त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. त्यात चेंगराचेंगरी होऊन 114 लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांना तेव्हा या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागला.

राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी, मार्च 1995 मध्ये निवडणुका होणार होत्या. त्यात काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला. शिवसेना-भाजप युतीस 288 पैकी 138 जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास 80 जागांवर समाधान मानावे लागले. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचा 14 मार्च, 1995 रोजी शपथविधी झाला.

1996 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात उतरले. जून, 1997 मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी  यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला.

“तुम्हाला आमचा लेख शरद पवार साहेबांविषयी Sharad Pawar Family Tree कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment