SBI Recruiment for Senior Executive Advisor Manager भारतीय स्टेट बँकेत मेगाभरती

SBI Recruiment for Senior Executive Advisor Manager – वरिष्ठ कार्यकारी (Senior Executive) , सल्लागार (Advisor) आणि व्यवस्थापक (Manager) पदांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती प्रक्रिया सुरु आहे. एकूण रिक्त पदे 8 असून अर्ज काल 8 एप्रिल 2022 ला सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची मुदत 28 एप्रिल 2022 आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता त्या-त्या पदांनुसार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज भरण्याआधी उमेदवारांनी SBI वेबसाईट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंक द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड झाल्याशिवाय उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही. अर्ज कसा भरावा याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या बातमीत खाली PDF जाहिरात दिलेली आहे. अधिक माहितीसाठी PDF बघावी.

पदाचे नाव वरिष्ठ कार्यकारी (Senior Executive), सल्लागार (Advisor) , व्यवस्थापक (Manager)

शैक्षणिक पात्रता पदवीधर (Graduation)/ बी.कॉम(B.Com)/ बी.इ (BE) / बी.टेक (B.Tech)

पद संख्या – 08

  1. वरिष्ठ कार्यकारी (SeniorExecutive) – 02
  2. सल्लागार (Advisor) – 04
  3. व्यवस्थापक (Manager) – 02

अर्ज शुल्क

  • SC/ ST/ PWD – विनाशुल्क
  • GENERAL/ EWS/ OBC – 750 रुपये
  • नोकरीचं ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु झाल्याची तारीख – 8 एप्रिल 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट – sbi.co.in या वेबसाईटला आवश्य भेट द्या

महत्वपूर्ण

अर्ज भरण्याआधी उमेदवारांनी SBI वेबसाईट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंक द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

परीक्षेची फी भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

हे सुद्धा वाचा:- शेतकरीआई मराठी 

See also  Covid 19 New Cases In India | भारतात कोविड 19 नवीन प्रकरणे |

Leave a Comment