RD Bank Rate of Interest in Marathi बँकेचे व्याज जास्त मिळवायचे असेल? तर हे करा

RD Bank Rate of Interest in Marathi तुम्ही जर बँकेमध्ये पैसे ठेवले असतील तर तुम्हाला हे माहिती पडलं असेल की बँका व्याजदर खूपच कमी प्रमाणात येत आहेत. यावेळी बरेचजण रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आर डी या खात्यात गुंतवणूक करुन जास्त व्याज मिळवण्याचा प्रयत्न देखील करतात पगारदार किंवा नियमित वेतन मिळणारे जास्त व्याज मिळवण्याचा प्रयत्न करतात.

RD Bank Rate of Interest बँकेचे व्याज जास्त मिळवायचे असेल? तर हे करा

ज्या लोकांना नियमित उत्पन्न मिळते ते आरडी खात्यामध्ये गुंतवणूक करतात दर महिन्याला RD मध्ये ठराविक रक्कम जमा करायची असते. या रकमेवर  2.50 ते 8 पॉइंट 50 टक्के इतका व्याजदर मिळू शकतो एकूणच आरडी खात्यावर फिक्स डिपॉझिट प्रमाणे व्याज दिले जाते. पण प्रीमियम महिन्याला जमा करण्याची मुभा याच्यामध्ये असते.

तुम्ही RD खात्यामध्ये अगदी दहा रुपयांपासून गुंतवणूक करू शकता पोस्ट ऑफिस मध्ये दहा रुपयाची RD काढण्याची तिकीट सुविधा आहे. RD मध्ये तुम्ही अगदी सहा महिन्यांपासून दहा वर्षापर्यंत चा कालावधी निवडू शकता. यावर चक्रवाढ व्याज मिळत असते. RD सुरू केल्यानंतर पैसे लगेच काढता येत नाही. तुम्हाला थोडा अवधी जाऊ द्यावा लागतो. नाहीतर तुम्हाला दंड देखील भरावा लागतो.

कोणत्या RD वर मिळते सर्वाधिक व्याज

मित्रांनो सध्याच्या घडीला इंडसंड Indusand बँक RD वर सर्वाधिक व्याज देत आहे. सामान्य नागरिकांकरिता व्याजाचा दर 7.25 % ते 8 %  इतका आहे. ज्येष्ठ नागरिकांकरिता हा व्याजदर 7.75 ते 8.50 एवढा आहे. कमी फायनान्स असलेल्या बँकांकडून आरडी वर  6.75 ते पॉईंट 8.50 एवढे व्याज मिळत असते. तर ज्येष्ठ नागरिकांकरता हा व्याजदर 7.35 ते 9.10 टक्के इतका आहे, तर मोठ्या बँकांमध्ये व्याजाचा दर 5 ते 7 टक्क्यांच्या आसपास असतो.

कोणत्या बँकेत महिन्याला 5 हजाराची गुंतवणूक करून 6 वर्षांनी 4.26 लाख मिळतील.

आता आयसीआयसीआय बँकेने मोबाईल ॲपच्या माध्यमातून RD खाते उघडण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याकरता तुम्हाला आयसीआयसीआय ICICI बँकेचे ॲप डाऊनलोड करावे लागेल येथे अकाउंट उघडल्यानंतर प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामधून विशिष्ट अशी रक्कम कापली जाईल आणि ती RD मध्ये जमा होईल. ज्येष्ठ नागरिक आणि सामान्यांसाठी अडीच आदर वेगवेगळा आहे तुम्ही आरडी खात्यामध्ये महिन्याला समजा पाच हजार रुपये गुंतवणूक सुरू केली तर समजा तुम्ही सहा वर्षापर्यंत गुंतवणूक केली आणि तुम्हाला 5.5 टक्के व्याज मिळाले. तर 2027 पर्यंत तुम्हाला 66 हजार 975 रुपये इतके व्याज मिळेल. याचा अर्थ असा की महिन्याला तुम्ही पाच हजाराची गुंतवणूक करून सहा वर्षांनी 4 लाख 26 हजार 975 रुपये मिळवाल.

See also  Gram Panchayat masik sabha niyam information in Marathi language | ग्रामपंचायत मासिक सभा नियम

4 thoughts on “RD Bank Rate of Interest in Marathi बँकेचे व्याज जास्त मिळवायचे असेल? तर हे करा”

Leave a Comment

x
error: Content is protected !!