RBI Assistant Recruitment 2022 | रिझर्व्ह बँकेत 950 पदांसाठी भरती

RBI Assistant Recruitment 2022 – रिझर्व्ह बँकेत 950 पदांसाठी भरती, असिस्टंट पदासाठी बँकेत नोकरी मिळवण्याची संधी

तुम्हीसुद्धा बँकेमध्ये नोकरी करू इच्छित असाल तर तुमच्या करिता ही खुशखबर आहे. बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये 950 पदांकरिता रिझर्व बँकेने असिस्टंट ( RBI Assistant Recruitment 2022) या पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे.  बँकेत नोकरी (Bank Jobs) करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आरबीआयमध्ये मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं सुरु होणार आहे. आरबीआयच्या वेबसाईटवर भेट देऊन इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्यास 17 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. निवड झालेल्या उमदेवारांना देशातील विविध शहरांमध्ये रुजू व्हावं लागेल. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार असिस्टंट या पदासाठी अर्ज दाखल करायचा असल्यास तो ऑनलाईन पद्धतीनं सादर करावा लागेल. rbi.org.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याची सुविधा 17 फेब्रु पासून उपलब्ध होणार आहे. तर, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 8 मार्च आहे. आरबीआयकडून या पदांसाठी परीक्षा 26-27 मार्च रोजी घेण्यात येणार आहे.

पात्रता/ निकष :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारानं भारत सरकारनं मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून 50 टक्के गुणासंह पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. एसटी, एससी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केवळ उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 20 ते 28 वयोगटातील उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.

निवड प्रक्रिया :

( RBI )आरबीआयद्वारे असिस्टंट या पदावर उमदेवारांची नियुक्ती करण्यासाठी दोन परीक्षा घेण्यात येतील. त्यानंतर भाषा क्षमता चाचणी घेण्यात येईल, त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

परीक्षा शुल्क :

पात्र उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर 8 मार्चपर्यंत अर्ज सादर करु शकतात. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर माहितीसाठी स्वत:कडे प्रिंटआऊट सोबत ठेवावी. या परीक्षेचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं जमा करायला लागणार आहे. 450 रुपये शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येतील.

See also  Online Application for Passport मोबाईल वरून ऑनलाइन एप्लीकेशन करा पासपोर्टकरीता

तुम्ही या पात्रतेच्या अटी मध्ये बसत असाल तर हा अर्ज भरू शकता व आपले स्वप्न बँकेमध्ये नोकरी करण्याचा पूर्ण करू शकता तर RBI Assistant Recruitment 2022 ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.

x
error: Content is protected !!