Railway Recruitment 2022 | रेल्वेत 2400 पेक्षा जास्त ट्रेड अप्रेंटिसच्या भरती

Railway Recruitment 2022 – तुम्ही रेल्वे खात्यात नोकरी करू इच्छित असाल तर ही माहिती खास तुमच्याकरिता रेल्वेमध्ये दहावी पास उमेदवारांसाठी 2400 पेक्षा अधिक पदांसाठी भरती.

रेल्वे खात्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आता रेल्वेत भरती होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) मध्य रेल्वेने 2400 पेक्षा जास्त ट्रेड अप्रेंटिसच्या भरतीसाठी अर्ज जाहिरात करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2022 आहे.

हे पण पहा : Boigraphyof.in

अर्ज करणार्‍या उमेदवाराचे संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र धारक असावा. तसेच 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे आहे. आरक्षित वर्गाला नियमानुसार सूट देण्यात येतील.

अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएसला 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर हा अर्ज आरक्षित वर्गासाठी विनामूल्य आहे. एकूण रिक्त पदांची संख्या 2422 आहे. या भरतीअंतर्गत मुंबईत 1659 पदे, भुसावळमध्ये 418 पदे, पुण्यात 152 पदे, नागपूरमध्ये 114 पदे आणि सोलापूरमध्ये 79 पदे भरण्यात येणार आहेत.

उमेदवारांना अर्ज करताना काही अडचण आल्यास ते सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळेत 022-67453140 या क्रमांकावर कॉल करून माहिती मिळवू शकतात. रविवार आणि इतर सुटीच्या दिवशी हा क्रमांक उपलब्ध होणार नाही. याशिवाय उमेदवार माहितीसाठी act.apprentice@rrccr.com वर मेल करू शकतात.

Railway Recruitment 2022 ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

See also  1032 Posts of Senior Resident Doctors Sanctioned | वरिष्ठ निवासी डॉक्टरांची 1032 पदे मंजूर |

Leave a Comment