Police Vahan Chalak Bharti 2022 महाराष्ट्र शासन या अधिकृत अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक पोलीस हवालदार चालक पोलीस नाईक चालक पोलीस शिपाई चालक सेवाप्रवेश नियम 2019 यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे या यमास महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक, पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियम 2022 असे म्हणावे सदर नियम शासन राजपत्र प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून अमलात येईल महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक, पोलीस शिपाई चालक सेवाप्रवेश नियम 2019 याच्या नियम 7 ते 10 या ऐवजी पुढील नियम दाखल करण्यात येतील
शारीरिक चाचणी (50 गुण)
जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांना शारीरिक पात्रता चाचणी देणे आवश्यक असेल.
शारीरिक चाचणी पुढील प्रमाणे 50 गुणांची असेल
पुरुष उमेदवार
1600 मीटर धावणे 30 गुण
गोळा फेक 20 गुण
असे एकूण 50 गुण
महिला उमेदवार
800 मीटर धावणे 30 गुण गोळा फेक 20 गुण असे एकूण 50 गुण असतील
लेखी चाचणी 100 गुण शारिरीक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात नमूद केलेल्या रिक्त जागांच्या 1:15 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात पात्र असतील.
उदाहरणार्थ जर अनुसूचित जाती प्रवर्गात 100 रिक्त जागा आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील 5 रिक्त जागा असतील तर अनुसूचित प्रवर्गातील 150 म्हणजेच 15×10= 150 उमेदवारांना गुणवत्तेनुसार सूचीबद्ध करण्यात येईल आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील 75 म्हणजेच 15×5=75 उमेदवारांना सूचीबद्ध करण्यात येईल. तथापि गुुुणानूक्रमाांक 150 वर असलेल्या अधिसूचित जाती अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार म्हणून अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या उमेदवारांना सारखेच गुण मिळाले आहेत असे सर्व उमेदवार लेखी चाचणीला बसवण्यासाठी बोलावण्यास पात्र असतील त्याच प्रमाणे गुुुणानूक्रमांक 75 असलेल्या अनुसूचित जमातीतील ज्या उमेदवारांना 75 गुणानुक्रम असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार म्हणून सारखेच गुण मिळालेले आहेत असे सर्व उमेदवार लेखी चाचणी ला बसवण्या करता बोलवण्यात पात्र असतील.
लेखी चाचणी मध्ये पुढील विषयांचा समावेश असेल
अंकगणित सामान्यज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण आणि मोटार वाहन चालवणे किंवा वाहतुकीबाबत चे नियम माहिती असणे लेखी चाचणी चाकाला अवधी 90 मिनिटे इतका असे लेखी चाचणी मध्ये विचारलेले प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील आणि ही चाचणी मराठी भाषात भाषेत घेण्यात येईल वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी 50 गुण लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी खालील प्रमाणे द्यावी लागेल
सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल. कौशल्य चाचणी मध्ये पुढील चाचण्यांचा समावेश आहे
1. हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी 25 गुण
2. जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी 25 गुण
कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत. वाहन चालविण्याचे कौशल्य चाचणी चे निकष महा संचालकांकडून वेळोवेळी ठरवण्यात येतील.
वाहन चालविण्याचे कौशल्य चाचणी घेण्याकरिता समितीमध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल पोलिस महासंचालकांनी त्या घटकासाठी गठीत केलेले निवड मंडळ हे या नियमांना पोटनियम 7 व 8 मध्ये नमूद केलेल्या शारीरिक चाचणी व लेखी चाचणी मधील प्राप्त एकत्रित गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करील शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये प्राप्त होणारे गुण एकत्र केल्यानंतर उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी ही शासन प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णया पमाणे करण्यात येईल.