Police Bharti 2022 जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल.
शारीरिक चाचणी पुढील प्रमाणे एकूण 50 गुणांची असेल
पुरुष उमेदवारांकरिता 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण गोळा फेक 15 गुण असे एकूण 50 गुण पुरूष उमेदवारांकरिता असणार आहेत
महिला उमेदवारांकरिता 800 मीटर धावणे 20 गुण 100 मीटर धावणे 15 गुण गोळा फेक 15 गुण अशाप्रकारे 50 गुण असणार आहेत.
लेखी चाचणी ही 100 गुणांची असणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरातीत दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणी साठी उपस्थित राहणे करता बोलावण्यास पात्र असतील.