Police Arrested Todi Who Broke The ATM in Akola | अकोल्यात ATM फोडणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली | नमस्कार मित्रांनो, मराठी बातमी मध्ये तुमचे स्वागत आहे. आपण सर्वांनाच माहिती आहे की अकोल्यामध्ये चोरट्यांनी एटीएम (ATM)फोडून कँँश लंपास केली होती. परंतु पोलिसांच्या हुशारीमुळे ते चोट्यांची टोळी अकोला पोलिसांना हरियाणा मध्ये सापडली. एटीएम मशीनचे तांत्रिक ज्ञान असलेल्या एटीएम (ATM) मशीन फोडून लाखो रुपये चोरणाऱ्या हरियाणा प्रदेशाच्या तोडीला अकोला पोलिसांनी अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. व तसेच या प्रकरणी हरियाणा येथून चार आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे आपण सर्वांनाच माहिती आहे की 05 जानेवारी 2023 रोजी पोलीस स्टेशन खदान अकोला हद्दीतील रिंग रोड वरील केशवनगर येथील एसबीआय बँक येथील एटीएम अनोळखी व्यक्तींनी गॅस कटाच्या सहाय्याने एटीएम (ATM) फोडून त्यातून 16 लाख 54 हजार 300 रुपये इतकी रक्कम चोरी केल्यावरून फरार झाल्याची बातमी एसबीआय बँक येथील तक्रारदार प्रफुल सुरेश डावरे एटीएम (ATM) टेलर मॅनेजर यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन खदान अकोला येथे जानेवारी 2023 रोजी कलम 380 व 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता मा पोलीस अधीक्षक सा अकोला यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करून त्यांना आरोपी यांना शोधण्यासाठी हरियाणा राज्यात रवाना केले व या गुन्ह्याचा तपास दोन्ही पथकांनी सलग बारा दिवस करून तांत्रिक आणि पारंपारिक पद्धतीने सदर गुन्हा उघडीस आणून गुन्ह्यातील एक आरोपी नाव युसूफ खान आस मोहम्मद वय 35 वर्ष व राहणार बिना गवा तालुका पुन्हाना व जिल्हा राज्य हरियाणा याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यांमध्ये वापरलेली क्रेटा हे वाहन (HR93 B1370) नंबर असलेली व किंमत बारा लाख रुपये व 50 हजार रुपये रोख रक्कम आणि ओपो कंपनीचा मोबाईल दहा हजार रुपये असा एकूण बारा लाख साठ हजार रुपयाचा माल जप्त करून आरोपी याला मा. वी. कोर्ट पुन्हाना जिल्हा नुहा हरियाणा येथून तीन दिवसाचा रिमांड वर घेण्यात आले. सदर आरोपी याने त्यांच्या टोळीमध्ये सहभाग असलेल्या व्यक्तींचे नावे देखील सांगितले आहे.
1) सद्दाम माजिद रा. पडली जि. नुह
2) आताऊल्ला थांब रा. पडली जि. नुह
3) सलीम खान हनीफ खान रा. पिनागवा
4) संजय यादव रा. रामगड जि. अलवर, राजस्थान
या आरोपींनी यांच्यासोबत सदर गुन्हा केला आहे अशी कबुली दिली आहे. व ही कार्यवाही महाराष्ट्र पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत उप. वि. पोलीस अधीक्षक दूधगावकर यांच्या मार्गदर्शन खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी संतोष महाले सानेगुनी शाखा स.पो.नी गोपाल ढोले ,पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव ,पोलीस अंमलदार ,गोकुल चव्हाण, खुशाल नेमाडे ,लीलाधर खंडारे, मोहम्मद. अमीर मोहम्मद, अन्सार, सतीश पवार,अक्षय बोबडे, प्रवीण कश्यप यांनी हा गुन्हा करणाऱ्यांना गजाड केले आहे.