Parvatibai Phunde is a Successful Woman Entrepreneur | पार्वतीबाई फुंदे या एक यशस्वी महिला उद्योजिका आहेत |
22 बँकांनी कर्ज नाकारलं तरी आता पाच कोटीच्या जागेत 51 उद्योग उभारणार……
“22 ते 23 बँका कर्ज फेडले असता तरी मला लोन भेटले नाही माझे शिक्षण कमी असल्यामुळे व तुम्ही हा उद्योग चालू शकणार नाही तुम्ही फक्त पापड उद्योग सुरू करा आम्ही ५० लाख देऊ व हा इंजिनिअरिंग झोन आहे तुम्ही पाईप उद्योग चालू शकणार नाही”. नववी पास असलेल्या पार्वती बाई फुंदे यांना 90 च्या शतकात मिळालेले हे काही सल्ले पण त्याच पार्वती बाईंची आज औरंगाबादच्या ( संभाजीनगर) शेंद्रा एम. आय. डी. सी (MIDC) PVC पाईप निर्मितीची कंपनी आहे. पार्वती बाई फुंदे या चार चाकी तुन खाली उतरतात तेव्हा त्यांच्या हातात पर्स असते. आणि त्यामध्ये मोबाईल ठेवलेला असतो त्यांचा मोबाईल हातात वाजत असतो कारण कुणी त्यांना बिजनेस संदर्भातल्या माहितीसाठी फोन करत असतं तर कोणी मीटिंगची वेळ ठरवण्यासाठी फोन करीत असतात. पार्वती बाईंची कंपनी जेथे आहे तेथील प्रवेशद्वार उघडल्यावर त्यावर मोठ्या अक्षरांमध्ये किसान पीव्हीसी पाईप कंपनी लिहिलेलं दिसून येत आहे यासोबतच पार्वती बाईंना इसवी सन 2000साली लख्ख आठवतं काहीतरी करायला पाहिजे. हे त्यांच्या डोक्यात होतं मी बरेचसे उद्योग करून पाहिले कापड चे दुकान टाकलं, पापड लोणच्याचा उद्योग केला, परंतु मग 2005 मध्ये पाईपच्या क्षेत्रात उतरायचं ठरवलं असं त्या म्हणाल्या त्यानंतर हे सुद्धा की आपण एक शेतकऱ्याची मुलगी आहोत आणि आपलं पुरेसं शिक्षण हे झालेलं नाही त्यामुळे मारुती बाईंनी पाईपचा व्यवसाय निवडला त्यासाठी त्यांनी इसवी सन 2000 साली. एम आय डी सी चा( (MIDC) ) फॉर्म भरला 2005 मध्ये त्यांना उद्योगासाठी जागा मिळाली व नंतर एका बाईक्स कर्ज आणि पतीच्या आर्थिक मदतीने त्यांनी पीव्हीसी पाईप निर्मितीची कंपनी टाकली व त्यासाठीची मशिनरी उपलब्ध करून पाईप निर्मिती सुरू केली. पार्वती बाई फुंदे असे सांगतात “आम्ही कंपनीचे उद्घाटन केलं पण दोन महिने एकही पाईप विकला गेला. नाही मग मार्केटिंग करायचं ठरवलं त्यासाठी एखाद्या शेतात शेतकरी दिसला की आम्ही त्या शेतात जायचं तिथे थांबायचं तिचा पाईप बद्दल सांगायचं,आमचा ब्रँड कसा आहे ते त्यांना समजावून सांगायचं , आठवडी बाजार असला की तिथे जायचं आणि पाईपची माहिती सांगायचं, त्यानंतर पार्वतीबाई फुंदे यांनी पुढे व्यवसायाचा शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायला पाहिजे असे त्यांनी ठरवले 2000 मध्ये पार्वती बहिणी महाराष्ट्र सरकारच्या एमआयडीसी (MIDC) म्हणजेच आपण त्याला महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र प्रशिक्षण असे म्हणतो त्यांनी या केंद्रामधून प्रशिक्षण घेतला व या प्रशिक्षणामुळे त्यांचा उद्योग होण्याचा आत्मविश्वास हा अधिक बळकट झाला एम आय डी सी (MIDC) बद्दल पार्वतीबाई फुंदे कौतुकाने सांगतात पापड लोणचं मसाला पासून ते इंजिनिअरिंग पर्यंत बँक कशी निवडायची बँकेचे लोन कसा काढायचा सबसिडी कशा प्रकारे मिळतात कोणत्या पद्धतीने मिळतात कोणत्या स्कीम राबवल्या जातात हे सगळे माहिती मला या प्रशिक्षणातून मिळाले ज्याप्रमाणे शाळेत शिक्षक असतो त्याचप्रमाणे एमआयडीसी हे उद्योग यासाठीच शिक्षक म्हटलं तरी चालेल.
पार्वती बाईच्या शेंद्रा येथील कंपनीत वेगवेगळ्या आकाराच्या पीव्हीसी पाईप ची निर्मिती केली जाते व या मधून त्यांनी दहा जणांना रोजगार उपलब्ध करून दिला व तसेच औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यातील दहा जणांच्या राहण्याची व सर्व सोय सुविधा तेथेच मागच्या बाजूला करण्यात आली आहे पार्वती बाईंनी हे देखील सांगितले जेव्हा रॉ मटेरियल आम्ही जळगावहून आणतो तर कधी सुरत वरून आणतो आमच्या कंपनीत अर्धा एक दीड दोन अडीच तीन आणि चार इंची पाईप बनवल्या जातात. व तसेच कंपनीतील वेगवेगळ्या तीन ते चार ठिकाणी पाईप साठवल्याचं आपल्याला दिसून येतो सर संपूर्ण महाराष्ट्रात या पाईपची विक्री होते व तसेच शेतकरी आणि छोटे दुकानदार हे त्यांचे प्रमुख ग्राहक आहेत पार्वती बाईच्या या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर एक ते दीड कोटी रुपये आहे व याबरोबरच पार्वती बाईंनी इतर अनेक महिलांना बिजनेस सुरू करण्यासाठी मदत केली आहे व आता त्यांचे स्वप्न हे खूप मोठा आहे ते म्हणजे पार्वती बाई सांगतात आतापर्यंत मी जवळजवळ 30 ते 35 महिलांना आत्मनिर्भर म्हणजेच पायावर उभा केलं लोणचं असो पापड असो वा पीठ गिरणी असो कोणताही छोटा उद्योग असो आपण तिला सहकार्य करायचं टाक तू व्यवसाय तू चालणार असं म्हणायचं व तसेच आता आम्ही सार्थक महिला औद्योगिक सहकारी संस्था काढलेली आहे व आता आम्ही 51 महिला आत्मनिर्भर म्हणजेच पायावर उभा राहणार आहे ते सुद्धा एका वर्षाच्या आत. “आम्ही सार्थक महिला उद्योग संस्था 51 महिलांनी मिळून पाच एकर जागा घेतली व त्यासाठी पाच कोटी एमआयडीसीला(MIDC) भरावे लागले व जागा अलॉटमेंट करून घेतली व ती जागा या टोकापासून त्या टोकापर्यंत आपली आहे व तसेच या जागेवर आम्ही महिला 51 उद्योग करणार आहोत”. पार्वती बाईंनी एमआयडीसीची ही जागा मंजूर करून घेण्यासाठी 2011 पासून मंत्रालयात चक्रा माराव्या लागल्या तर अकरा वर्षानंतर आता 2022 मध्ये त्यांनाही जागा मिळाली त्या म्हणतात सक्सेस व्हायचं असेल तर आणि तोंडात साखर ठेवायची राग जरी आला तरी तो दाखवायचं नाही कारण की रागा काही काळ राहतो आपल्यामध्ये नम्रता पाहिजे, गडबड नाही. करायची थोडा कर्ज झाले की , आपण गव्हर्मेंट ला शिव्या देतो, आत्महत्या पर्यंत जातो. पण हा आत्महत्या करणे, हा शेवटचा पर्याय नाही आहे संघर्ष करा ना तुम्ही संघर्ष केल्यानंतर ऑटोमॅटिक सक्सेस मिळतात पार्वती बाईंचा उद्योग पाहण्यासाठी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी महिला नाही तर विद्यार्थी येतात व आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासहित अनेक पुरस्कार मिळाले आहेत व आता 52 वर्षाच्या पार्वतीबाई पुन्हा एक मोठा उद्योग सुरू करण्याचे स्वप्न बाळगून आहे.