पंढरपूर Pandharpur हे महाराष्ट्रातील एक विख्यात असलेले तीर्थ क्षेत्र Temple आहे. पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर वसलेले असून ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. भीमाशंकर उगम पावलेली भीमा, इंद्रायणी, भीमानीरा पंढरपूर जवळ येते. आळंदीहून संत ज्ञानेश्वर व देहू येथून संत तुकाराम महाराजाच्या पालखीसोबत जवळपास लाखो वारकरी विविध दिंड्यातून पंढरपूरकडे पायी प्रस्थान करतात. ह्या सोबतच महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहुन इतर संतांच्या पालख्या प्रस्थान करतात.या लेखात आपण pandharpur temple darshan व पंढरपूर मंदिर याविषयी माहिती पाहणार आहोत
Pandharpur Temple Live Darshan पंढरपूर माहिती
जवळपास 7-8 लाख वारकरी आषाढी एकादशीच्या काळात भेट देवून विठ्ठलाचे दर्शन घेतात. पावसाळा संपल्यानंतर लगेच कार्तिक महिन्यात एकादशीला पंढरपुरात दुसरी मोठी वारी भरते. जवळपास 3-4 लाख वारकरी कार्तिकी एकादशीच्या काळात पंढरपूरला भेट देतात. उन्हाळयाचे सुरुवातीला माघ महिन्यात एकादशीला माघी यात्रा होते. जवळपास 2 लाख वारकरी ह्या काळात पंढरपूरला भेट देतात.
Live Darshan येथे click करा
हिंदू वर्ष्याच्या सुरुवातीला चैत्र महिन्यात एकादशीला चैत्री यात्रा होते. जवळपास 1 लाख वारकरी ह्या काळात पंढरपूरला भेट देतात. भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात कारण येथील रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते. यावरून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कन्द पुराणातील महात्मे व चंद्रभागा नावाचे सर्व महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ होते, असे सांगते. तर संत जनाबाई, “भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा” असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते.
आषाढी महिन्यात पाच लाखांपेक्षा जास्त भक्तगण पंढरपुरात यात्रेमध्ये सहभाग घेण्यासाठी देशभरातून पताका घेऊन या ठिकाणी पायी चालत येतात. तसेच पंढरपूर येथील महानगरपालिका 1858 मध्ये स्थापन झाली असून गावाला शुद्ध पाणी पुरवठा, अग्निशामक सेवा, घरगुती, औद्योगिक, व्यापारी आणि सार्वजनिक उपयोगांसाठी वीज इत्यादी सोयी आहेत. गटारे उघडी असून संडास सफाई, मालवाहतूक ट्रॅक्टर मार्फत होते. यात्रेच्या दिवसात सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य राखणे हे एकच आव्हान असते. या गावात नऊ रुग्णालय आहेत. तसेच 211 रुग्ण वाहिका, 2 सुश्रुषा गृहे व रुग्णशया दवाखान्यात कुटुंब नियोजन केंद्र आहे.
पंढरपूरचा इतिहास History of Pandharpur
पंढरपूरचा इतिहास History of Pandharpur Temple हा खूप जुना आहे, असे म्हटले जाते. भक्त पुंडलिका- च्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुख हरी मूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले आहे. पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे. त्याला चौघडा असे म्हणतात. हरिमंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख काशीनाथ उपाध्याय उपवाक्य बाबा पाध्ये यांनी केला आहे.
म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या वाक्यात पुंडलिक वरदा हरि विठ्ठल तीर्थक्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. हरी ही तीर्थ देवता मानली जाते तसेच विठ्ठल हे क्षेत्र देवता मानले जाते. दीक्षा मंत्रात सही राम कृष्ण हरी तीन देवतांचा उल्लेख येतो. 1111 मध्ये शिलालेखाच्या आधारे असे स्पष्ट करता येते की, त्या काळामध्ये पंढरपूर विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले. स्थापनेच्या वेळी मंदिर हे छोट्या आकाराचे होते. मात्र हळूहळू ते वाढत गेले. 1159 मध्ये त्याच होईल या दोघांपैकी वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान दिला.
तसेच 1195 मध्ये श्री रामचंद्र देवराव यादव व त्याच्याआधी हेमाद्री पंडित यांनी पुढाकार घेऊन या देवळाचे वाढ केली आणि देवस्थानची त्याच्या पद्धतीने कीर्ती साजेल अशी व्यवस्था लावून दिली. देवळाचा विस्तार 1925 च्या सुमारास पुष्कळच झालेला आपल्याला दिसून येतो. विठ्ठलाला भक्तांनी सोहळ्याच्या पालखीतून कर्नाटकात नेले. तसेच वारकरी मंडळींसाठी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तो देव परत पंढरपुरात आणले अशी ही कथा सांगितली जाते.
मराठी इतकेच कानडी भक्त तसेच इतर जाती धर्माचे लोकही विठ्ठलाला भेटायला वर्षभर येत असतात. कर्नाटकाचे पकवान पुरणपोळीच विठ्ठलाच्या नैवेद्याला त्यांना आवडते म्हणून दाखवली जाते. पंढरपूरात वारी ही सर्वात लोकप्रिय आहे.
पंढरपूरच्या समृद्ध वारशाची जपणूक
पंढरपूरचा वारसा जपणे तेथील मठ, फड, मंदिरे यांचा इतिहास शोधण्यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाने डॉक्टर सदानंद मोरे व मंजुळ यांच्याकडे हा एक प्रकल्प सोपविला होता. दोन हजार पंधरा सालच्या जुलै महिन्यात हा प्रकल्प पूर्ण झाला आणि त्याचे तपशील ग्रंथरूपाने लोकांसमोर आले. सर्वसामान्यांना पंढरपूर घरबसल्या दाखवणारे पंढरपूर आणि श्री विठ्ठल ही दूरदर्शनवर नव्याने सुरू होणारी मालिका आहे.
त्यामध्ये पुराणकालीन कथाभाग संतांची कामगिरी सामाजिक प्रबोधन असे तिहेरी स्वरूप पाहायला मिळते. त्या दृष्टीने काही मंडळी काम सुद्धा करीत आहेत. भीमा, चंद्रभागा तिचा इतिहास आजचे स्वरूप तीर्थस्वरूप होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याचा सखोल विचार महाराष्ट्र सरकारच्या इरिगेशन खात्यात मार्फत भीमा सर्वेक्षण हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होत आहे. त्यामुळे तिच्या काठावरचे सर्व क्षेत्रे लोकांसमोर येणार आहेत. यासंबंधी सरकारची विचार चालू आहेत.
तसेच पंढरपूरचा क्षत्रिय वारसा तेथील वास्तू नगररचना लोकजीवन विविध कला आणि परंपरा यांचा अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या सिंहगड कॉलेज च्या पदवीत्तर वास्तू विभाग आणि भोपाल मध्य प्रदेशच्या एस.पी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे जानेवारी, 2015 ते जुलै एप्रिल 2015 विद्यार्थ्यांनी प्रो. वैशाली लाटकर पुणे, विशाखा कवठेकर आणि रमेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अवघड काम केले. वास्तुशास्त्रीय अभ्यास असला तरी क्षेत्र पंढरपूर सर्वागीण अभ्यास जो आजवर कधीच केला नाही, तो यावर्षी त्यांच्या हातून घडला.
मठांचा,फडाचा इतिहास
पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर भक्तगण आषाढ महिन्यात किंवा आषाढी एकादशीनिमित्त वारंवार जात असतात. त्यामुळे तेथे लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. म्हणून त्यांना राहण्यासाठी तेथे मठांची व फडांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ असा बहुमान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर मधील मोठे फळ आणि दिंड्यांचा ग्रंथबद्ध इतिहास प्राचीन हस्तलिखितांचे अभ्यास मंजुळकर यांनी एका प्रकल्पाद्वारे केला असून त्यांना सत्तेचा संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
पंढरपूरमध्ये आषाढी वारीचा मुख्य सोहळा कार्तिक एकादशी चैत्री आणि माघ एकादशी निमित्त वारीच्या काळात येणाऱ्या भक्तांच्या निवासासाठी व वास्तू अनेक वर्षांपासून उभे आहेत. त्यांना मठ असे म्हटले जाते. तसेच या भोवती गरजने पलीकडे जाऊन तत्त्वज्ञानाचा आणि धार्मिक अंगाने विशिष्ट धर्माचरण करणार्या वारकऱ्यांच्या समूहाला फड असे म्हटले जाते. पंढरपूर मध्ये असे अनेक मठ आणि फळ अस्तित्वात आहेत. त्यांना संस्था आणि संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाल्याने त्यांचे मठाधिपती आणि फडकरी ही आहेत.
सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या मठ, फड आणि दिंड्या यांचे महत्त्व आहे. त्यामुळे मत फळांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायला हवा. पंढरपूरमध्ये 40 मठ आहेत, तसेच 60 फड आहेत. या व्यतिरिक्त अजूनही काही मोठा फड आहेत.
विठ्ठल रुखामिनी फोटो करीता येथे click करा
पंढरपूर येथील प्रमुख संस्था विषयी माहिती
पंढरपुरात पक्के रस्ते 34.2 किमी व कच्चे रस्ते 1.53 किमी असून देवळाभोवतीच्या जुन्या वस्तीत अरुंद फरसबंदी बोर्ड आहे. व्यवस्थित रुंद रस्ते मोठमोठ्या इमारती व सेना महाराज संत, संत गाडगे महाराज, बंकट्स्वामी, मुक्ताबाई, नाथ महाराज, रोहिदास, तनपुरे, घाटगे महाराज यांचे मठ व धर्मशाळा आहेत.
गोरक्षण, अनाथ बालकाश्रम, नवरंगे अनाथ बालिकाश्रम, लिगहोम, संस्कृत पाठशाळा, मिशन रुग्णालय इत्यादी संस्था येथे महत्वाचे समाज कार्य पार पाडत असतात. तेथे दिवाणी व फौजदारी न्यायालय व पोलिस ठाणे आहे. मंगळवारी आठवड्याचा बाजार भरतो. तांदूळ, गहू, इतर अन्नधान्ये कापूस, तंबाखू जर्दा, तपकिरी, अगरबत्ती होते. यात्रेच्या वेळी गुरे व घोंगड्या यांचा मोठा बाजार असतो.
येथे आठ बॅका व दोन कृषी पतसंस्था आहेत. यात्रेच्या निमित्ताने कुंकू, बुक्का, लाह्या, चुरमुरे, डाळे, बांगड्या, तुळशीमाळा, अष्टगंध यांचा चांगलाच खप होतो. वारकरीस लागणारे टाळ, मृदंग, चिपळ्या व इतर वस्तूही येथेच मिळत असतात.
विठ्ठल मूर्ती विषयी माहिती
विठोबाच्या मूर्तीचे अनेकवेळा स्थानांतर झाल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. आधी मुघलांच्या आक्रमणा- पासून वाचवण्यासाठी ती बडव्यांनी लपवून ठेवलेली होती. तर कधी कोणी ती पळवून नेऊन मग पैसे घेऊन परत केली होती. सोळाव्या शतकात विजयानगरच्या कृष्णदेवरायाने भक्तांसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती. पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली सोळखांबी मंडपात त्यांची समाधी असून आज जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादुका हीच त्यांची खरी समाधी आहे. तसेच निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठल मूर्तीच्या वर्णनाशी सध्या मूर्तीचे वर्णन जुळत नाही.
विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुने नाही परंतु महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत भिन्नता आहे. मराठेशाहीत विठ्ठल मंदिरासाठी अनेक दान दिल्याचे उल्लेख आढळतात. तसेच खरे की संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा इत्यादी मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व गाजविला महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने आहेत. त्यामुळे येथे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी-कानडी सामंजस्याचा दुवा साधला जातो. विशेष म्हणजे मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेता येणारी विठ्ठलाची ही एकमेव मूर्ती आहे.
पंढरपूर यात्रा विषयी माहिती
पंढरपूरची यात्रा ही टाळमृदुंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. तेथे तुतार्या सजविलेल्या स्वारीचा घोडा पालख्या, व घोडे, बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीच्या वृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते. चैत्र वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी गाईचा बाजार मोठा भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाच्या मूर्ती, तांब्या-पितळेची भांडी वस्तूंची दुकाने सर्वत्र मांडलेली असतात व मोठा व्यापार होत असतो. संत भानुदास महाराजांनी विजय नगरहून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपूर आणली, तो दिवस कार्तिकी एकादशीचा होता.
या दिवसाची आठवण म्हणून सर्वप्रथम रथ प्रदक्षिणा काढण्यात येते. याच दिवसाचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथ काढण्यात येतो. इ.स. 1810 मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा पूजा होऊ लागली. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्या जवळ प्रदक्षिणेला सुरुवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला हा रथ भाविक ओढतात. आत विठ्ठल राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात.
या भक्त संप्रदायाच्या आद्य पिठात आणि भीमा तटीय महायोग पिठात महाराष्ट्राच्या सर्व भागांतून आणि कर्नाटकातील इतर राज्यांतूनही दरवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशी लाखो वारकरी येतात. मात्र चैत्रातील व माघातील यात्रा त्या मानाने लहान असतात.
पंढरपूर मंदिरा विषयी माहिती
देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस तीन, दक्षिणेस एक, पश्चिमेस एक व उत्तरेस तीन असे एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरून पोहोचण्यास बारा पायऱ्या आहेत. त्यांतील पहिली पायरी ही नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात संत चोखामेळा याची समाधी आहे. नामदेव दरवाजाने आत जाताच छोटा मुक्तिमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. नंतरच्या चौकात तीन दीपमाळा व प्रल्हादबुवा बडवे आणि कान्हया हरिदास यांच्या समाध्या आहेत. तसेच येथे गरुडाचे व समर्थ रामदासांनी स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरूंद दगडी मंडपाच्या भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बांजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत.
मघल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावताराची व कृष्णलीलेची चित्रे आहेत. बाजूच्या खोलीवजा दालनांत काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दूसरा खांब सोन्याचांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्वी गरुडस्तंभ होता असे सांगतात. या खांबाला मिठी घालून मग पुढे जातात.
यानंतर चौखांबी मंडप आहे. तेथे उत्तरेस देवाचे शेजघर आहे. नंतरची चौरस जागा ‘कमान’ नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मीटर पेक्षा किंचित जास्त आहे.1873 मध्ये काही शैव बैराग्यांनी धोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखावला होता. तेव्हापासून पायांस न कवटालथा त्यांवर फक्त डोके ठेवू देतात.
सोळखांबी मंडपाच्या दक्षिण दरवाजा बाहेर एका ओसरीत चार मूर्ती, एक तरटीचे झाड व त्याच्या पायाशी कान्होपात्रेची मूर्ती, नंतर व्यंकटेश मंदिर, त्यासमोर नागोबा, बाजीराव पेशव्याने बांधलेली ओवरी तसेच लक्ष्मिमंदिर आहे. ओवरीत नारद व कोपऱ्यात रामेश्वर यांच्या मूर्ती असून पश्चिमेच्या भिंतीत सूर्य, गणेश, खंडोबा व नागोबा यांच्या मूर्ती आहेत.
विठ्ठल मंदिरामागे वायव्येस रुक्मिणी मंदिर आहे. जवळच सत्यभामा व राही यांच्या खोल्या आहेत. सभामंडपाच्या पायऱ्या चढून आल्यावर समोर सुवर्ण पिंपळ आहे. येथून पुन्हा सोळखांबी मंडपात आले म्हणजे एका भिंतीत ‘चौऱ्याऐंशीचा शिलालेख’ असून त्यावर देवी आहे.
जन्ममरणांच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसविली आहे. देवळात रंगशिला, गारेच्या पादुका इ. विशिष्ट महत्त्वाच्या जागा आहेत. विठोबाचे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाच्या काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात.
यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही, तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात. देवालयाच्या उत्पन्नाबाबात व तेथील बडवे, सेवेकरी, उत्पात, डांगे, बेणारे इत्यादींच्या हक्काबाबत पूर्वापार तंटेबखेडे होत आले आहेत आणि त्यांबाबत निरनिराळ्या वेळी निर्णयही झाले आहेत. अलीकडे शासनाने नाडकर्णी आयोग नेमून देवालय व्यवस्थेबाबत निर्णय केला होता. परंतु त्याविषयी अजूनही वाद चालूच आहे.
नदीकाठी 11 घाट बांधलेले आहेत. मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस 1.2 किमी वर विष्णुपद-वेणुनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सु. 1.6 किमीवर गोपाळपूर येथे गोपाल कृष्णाचे देऊळ आहे. यांशिवाय पंचमुखी मारूती, भुलेश्वर, पद्मावती, व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर,
ताकपिठ्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, नामदेवमंदिर, शाकंभरी, मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारूती, चोफाला, पारावरील दत्त, बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत.
अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून येथील कैकाडी महाराजांचा मठ पाहण्यासारखा आहे. 1946 मध्ये साने गुरुजींनी हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर यांची व गोविंदबुवा अंमळनेरकर, गोविंदबुवा चोपडेकर, भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात.
पंढपुरात सर्व जाती धर्माच्या भाविकांना गाभ्यारात प्रवेश मिळतो व विठ्ठलाचरणी माथा टेकण्याची संधी मिळते. अशी माथा टेकून दर्शन घेण्याची संधी इतर मंदिरात क्वचितच उपलब्ध आहे. पद स्पर्श दर्शनासाठी साधारण दिवशी 2 ते 3 तास, साप्तहिक सुट्टीला व एकादशी दिवशी 4 ते 5 तास व यात्रा काळात 34 ते 36 तास लागतात.
मुख दर्शन घेण्यसाठी लागणारा कालावधी
ज्या भक्तांना वेळे अभावी पद स्पर्श दर्शन शक्य नाही, त्यांना 25 मीटर लांबून विठ्ठलाचे व 15 मीटर लांबून रुक्मिणीचे दर्शन शक्य आहे. मुख दर्शनासाठी 15 ते 20 मिनिटाचा कालावाधी लागतो. पंढरपूरला जाण्यासाठी बस तसेच रेल्वे मार्ग उपलब्ध आहेत. तुम्ही या तीर्थक्षेत्राला भेट द्या व विठ्ठलाचा आशीर्वाद घ्या.
“तुम्हाला आमचा लेख पंढरपूर विषयी कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”