Mega Bharti Maharashtra 2022 | मेगा भरती महाराष्ट्र 2022

Mega Bharti Maharashtra 2022 महाराष्ट्र सरकारने 25 विभागातील 15 हजार 511 रिक्त जागा एप्रिल अखेरपर्यंत भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून 7460 जागा रिक्त पदांची मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करण्यात आले आहे उर्वरित राहिलेल्या 8051 पदांची मागणी पत्र काही दिवसांमध्ये आयोगाला सादर केले जाणार आहे.

वरील प्रमाणे आता गट अ, ब, क प्रवर्गातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. राज्यामध्ये राज्य सरकारच्या महत्त्वाच्या एकूण 34 विभागांमध्ये अडीच लाखांपर्यंत पदे रिक्त आहेत काही पदांची भरती एमपीसी च्या माध्यमातून तर काही पदांची भरती थेट खाजगी संस्थांच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे.

आता सरकारने विविध विभागातील पदांना भर याला मान्यता दिल्याने रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती विस्कटली त्यामुळे महसूल मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे असे असताना रिक्त पदाची भरती होऊ शकली नाही तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळामध्ये 70 हजार पदांची मेगा भरती होईल अशी घोषणा केली होती परंतु काहीच त्यावर कार्यवाही झाली नाही.

महाविकास आघाडी ने सुद्धा सुरुवातीला घोषणा केली होती परंतु करणाच्या संकटामुळे आतापर्यंत एवढ्या पदांची भरती झालेली नाही त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने ही पदे भरली जातील अशा प्रकारे वरिष्ठांकडून कळले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या अधिवेशनामध्ये एमपीएससीमार्फत काही पदांची भरती होईल अशी ग्वाही दिली होती त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने 15 हजार 500 पदांची भरती आयोगामार्फत होईल असे स्पष्ट केले होते आता त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे परंतु अजूनही आठ हजार पदांची मागणी पत्र आयोगाकडे सादर करण्यात आलेले नाही मात्र काही दिवसांमध्ये संबंधित विभागातील रिक्त पदांची मागणी पत्र आयोगाला पाठविले जाणार आहे व नववर्षात या पदांची भरती नक्की होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

See also  Barti Schoolarship After 10th Class दहावीत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये स्कॉलरशिप

एमपीएससी कडे प्राप्त झालेले मागणी पत्र

नियोजन विभाग 55 पदे विधी व न्याय विभाग 205 पदे जलसंपदा विभाग 323 पदे मृदा व जलसंधारण 11 पदे नगर विकास 90 ग्रामपंचायत व पंचायत राज बत्तीस पदे महसूल व वन विभाग 104 पदे कौशल्य विकास व उद्योजकता 171 पदे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग 32 पदे शालेय शिक्षण व क्रिडा 105 पदे उच्च व तंत्र शिक्षण विभाग 35 पदे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग 1572 पदे वित्त विभाग 356 पदे गृह विभाग 1159 पदे पर्यावरण तीन पदे बृहन्मुंबई महापालिका 21 पदे आदिवासी विभाग सात पदे मराठी भाषा विभाग 21 पदे सामान्य प्रशासन 957 पदे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग 16 पदे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण 62 पदे उद्योग उर्जा कमगार 279 पदे कृषी पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय 924 पदे आणि सार्वजनिक आरोग्य 937 पदे.

मेगा भरती चे नियोजन

  • राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार आणखी 8061 पदांचे मागणी आयोगास मागणी पत्र.
  • सामान्य प्रशासन विभागाकडून एमपीसी कडे 7460 पदांचे मागणी पत्र
  • स्पर्धा परीक्षेच्या व सरळ सेवा माध्यमातून भरती केली जाणार आहे.
  • राज्य शासनाच्या 25 विभागातील एकूण 15 हजार 511 रिक्त पदांची भरती होईल.
  • अ ब आणि क या गटातील पदांची भरती तीन महिन्यांमध्ये पूर्ण होईल.

Leave a Comment