आदर्श शाळांसाठी ठाकरे सरकारकडून तब्बल 494 कोटी मंजूर Maharashtra School Education

Maharashtra School Education शाळा हे विद्यार्थ्यांसाठी मंदिरच आहे आणि याच शाळांची दुरावस्था होऊ नये आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेत येण्याची आणि शिक्षण घेण्याची ओढ लागावी यासाठी राज्य सरकारकडून (Maharashtra state government) एक विशेष योजना सुरु करण्यात येणार आहे.

आदर्श शाळांसाठी ठाकरे सरकारकडून तब्बल 494 कोटी मंजूर Maharashtra School Education

विद्यार्थ्यांना प्रगत आणि उत्तम शिक्षण मिळावं यासाठी ठाकरे सरकारकडून आदर्श शाळा बांधण्यात येणार आहेत. यामार्फत आता मार्च महिन्यामध्ये निवडण्यात आलेल्या 488 शाळांसाठी राज्य सरकारकडून तब्बल 494 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील शाळांचा चेहरामोहरा बदलणार विद्यार्थ्यांना सुविधा मिळणार आहेत.

आदर्श शाळा विकसित करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात येणार आहे. तसंच आदर्श शाळांचं बांधकाम समग्र शिक्षा अभियानाच्या यंत्रणेमार्फत करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. आदर्श शाळांचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक  निधी ई गव्हर्नंसच्या निधीमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या निकषांवर होणार शाळांची निवड :

आकर्षक शाळा इमारत.

विद्यार्थी संख्येनुसार वर्ग खोल्या.

मुलां-मुलींकरीता आणि CWSN साठी स्वतंत्र व पुरेशी स्वच्छता गृहे.

पेयजल सुविधा व हँड वॉश स्टेशन.

मध्यान्ह भोजनाकरिता स्वयंपाकगृह व भांडार कक्ष

शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य

ग्रंथालय/वाचनालय

संगणक कक्ष, virtual class room ची सुविधा.

विद्युतीकरण सुविधा, शाळेला संरक्षक भिंत.

आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून शाळेतील fire extinguisher उपलब्धता.

परिसरातील शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्धता.

वरील निकषांवर पात्र ठरणाऱ्या शाळांची निवड आदर्श शाळांसाठी करण्यात येणार आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी दिली आहे.

See also  Abha Card Registration Online 2022 | आभा कार्ड रजिस्ट्रेशन ओनलाईन २०२२ .

Leave a Comment