Maharashtra Government Employee 3% DA hike राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये तीन टक्के वाढ करण्यात आलेली आहे आज दिनांक 30 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने निर्णय घेऊन जीआर पारित केलेला आहे. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरामध्ये दिनांक 1 जुलै 2021 पासून सुधारणा करण्यात आलेली आहे.
शासन निर्णय:
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासनाचे आदेश देत आहे की, दिनांक 1 जुलै 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 28 टक्क्यांवरून 31 टक्के करण्यात यावा.
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जुलै 2021 पासून च्या थकबाकी सह माहे मार्च 2022 च्या वेताना सोबत रोखीने देण्यात यावी, तर अशाप्रकारे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 3 टक्के वाढ करण्यात आलेली आहे