Laxmikant Berde लक्ष्मीकांत बेर्डे

Laxmikant Berde आज आपण पाहणार आहोत आपल्या मराठी विश्वातील अतिशय हसरे आणि हसविणारे नाजूकसे कलाकार,की जेंव्हा त्यांच्या नावाने देखील कोणी अतिशय दुःखी असला तर तो पोट धरून हसायला लागेल आणि ती व्यक्ती म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे होय.

या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. कसदार अभिनय करणाऱ्या अभिनेत्याकडे त्यांच्या अभिनयक्षमतेला वाव मिळू शकतील असे चित्रपट अपवादानेच मिळाले.

वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनयक्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला. लक्ष्मीकांतला खरा ‘ब्रेक थ्रू’ मिळाला तो ‘टुरटुर’ या नाटकाने. हे पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरले. त्यानंतर शांतेचे कार्ट चालू आहे, बिघडले स्वर्गाचे द्वार, कार्टी चालू आहे ही नाटकेही यशस्वी ठरली.

मग लक्ष्मीकांतने मागे वळून पाहिलेच नाही. नाटके करता करता त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. तेथेही ते प्रचंड यशस्वी ठरले. ‘लक्ष्या’ या नावाने अबालवृद्धांमध्ये त्याची लोकप्रिय पसरली. त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्या नाही असे सहसा घडलेच नाही.

कारण कोठारे व बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती. त्याचबरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट ते आताच्या ‘झपाटलेला’पर्यंत ते कायम होते. सचिनबरोबरही ‘बनवाबनवी’सह अनेक चित्रपट केले.

त्यांना अभिनयाची नैसर्गिक देणगी मिळाली होती. विनोदाचे त्यांचे टायमिंग अचुक होते. प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन टाकण्याची त्यांची शैली अनोखी होती. त्यांच्या लोकप्रियतेला ‘कॅश’ करण्यासाठी ‘चल रे लक्ष्या’ मुंबईला सारखा चित्रपटही निघाला. शिवाय अनेक चित्रपट त्यांना समोर ठेवून काढण्यात आले.

त्यात अनेक पडेल चित्रपटही होते. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने याच काळात धुमाकूळ घातला. वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते. मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयूष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फूलविले.

See also  Nilu Phule निळू फुले

मराठीत प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार असतांनाच त्यांना हिंदी‍त चांगल्या निर्मिती संस्थांच्या ऑफर्स आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा मैने प्यार किया हा त्यातीलच एक. यात लक्ष्मीकांतने सलमान खानच्या मित्राची भूमिका अगदी छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांनी हिंदीत क्वचितच मिळाली.

मराठीत अशा भूमिका त्यांना मिळाल्या, पण त्याही अगदी थोड्याच. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘एक होता विदुषक’ या गंभीर नाटकातील भूमिकेने कलक्ष्मीकांतच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. पण तशा भूमिका त्यांना फार काही मिळाल्या नाहीत.

अगदी अलीकडच्या काळात त्यांनी पुन्हा रंगभूमीवर लेले विरूद्ध लेले आणि सर आले धावून या नाटकाद्वारे बऱयाच वर्षांनी पाऊल ठेवले. पण ही नाटके फार चालली नाहीत. अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी एक काळ गाजवला.

असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. पण किडनीच्या आजाराची माहिती इतरांना न देता हलक्या पावलांनी १६ डिसेंबर २००४ रोजी या जगातून निघून गेला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे गाजलेले मराठी चित्रपट आपण बघणार आहोत.

चित्रपट

१)धडाकेबाज
२)दे दणादण
३)झपाटलेला
४)हमाल दे धमाल
५)अशी ही बनवाबनवी
६)चल रे लक्षा मुंबईला
७)हसली ती फसली
८)थरथराट
९)साजन
१०)बेटा
११)मैने प्यार किया
१२)हम आपके है कौन

Laxmikant Berde यांनी रंगवलेली रंगभूमी कारकीर्द

१)एक होता विदूषक
२)लेले विरूध्द लेले
३)कार्टी प्रेमात पडली
४)बिघडले स्वर्गाचे दार
५)शांतेच कार्ट चालू आहे
याप्रमाणे कारकीर्द गाजवलेली आहे.

चला आता आपण त्यांचा इतिहास बघूया :-
लक्षमिकांत बेर्डे यांचा कार्यकाळ ऑक्टोबर २६,इ.स .१९५४ते डिसेंबर १६ इ.स.२००४ पर्यंत ,मुंबई,या ठिकाणी पूर्ण झाला. हे मराठी  चित्रपटांमधील व नाटकांमधील एक प्रसिद्ध अभिनेता होता. आपल्या कारकिर्दीत त्याने मुख्यतः विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपाला आले.

लक्ष्मीकांत बेर्डे Laxmikant Berde
जन्म :- २६ऑक्टोबर १९५४
मृत्यू :- १६डिसेंबर २००४
वय :–५४
कार्यक्षेत्र :–मराठी चित्रपट,
मराठी रंगभूमी,
बॉलिवूड.

See also  Dada Kondke दादा कोंडके

मराठी दूरचित्रवाणी
हिंदी दूरचित्रवाणी :-भाषा मराठी,
हिंदी पत्नी :-
ऋही बेर्डे,प्रिया बेर्डे.
अपत्ये :-अभिनय बेर्डे, स्वानंदी बेर्डे

लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत त्याने इ.स. १९८५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले
१)धुमधडाका (इ.स. १९८५),
२)अशी ही बनवाबनबी (इ.स. १९८८) व थरथराट (इ.स. १९८९) हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले.सुरज बदजात्या दिगदर्शित दिग्दर्शित मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सलमानखांसोबत त्याने इ.स. १९८९ साली हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले.
त्याने विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले :-
१)साजन (इ.स. १९९१),
२)बेटा (इ.स. १९९२) व
३) हम आपके है कौन (इ.स. १९९४) इत्यादी हिंदी चित्रपटही खूप गाजले.

Laxmikant Berde जीवन प्रवास

लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय आधीपासूनच चित्तवेधक होता. सार्वजनिक गणेशोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असे. त्यांनी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन अभिनय स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होते. शिक्षण संपल्यावर लक्ष्मीकांतने मुंबई मराठी साहित्य संघाकडून सोबत व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले. साहित्य संघामध्ये नोकरी करता करता अभिनय शिकून त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले. १९८३-८४ मध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या “टूर टूर” ह्या नाटकामधे प्रमुख भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ते उत्तम विनोदी कलाकार होते. अशोक सराफ, लक्ष्मीकान्त बेर्डे, सचिन, महेश कोठारे या अभिनेत्यांनी मराठी चित्रपटामध्ये काळ गाजवला आहे.

Laxmikant Berde मृत्यू

किडनीच्या (मूत्रपिंड) या आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले.

त्यांनी कोणत्या वर्षी कोणता चित्रपट सादर केला ते बघूयात.

वर्ष चित्रपटसहभाग

१)१९८५ लेक चालली सासरला,

२)१९८५ धुमधडाका,

३)१९८६ गडबड घोटाळा

४)१९८६ तुझ्यावाचून करमेना

५)१९८६ धाकटी सून

६)१९८७ प्रेम करूया खुल्लम खुल्ला

१९८७ भटकी भवानी

१९८७ कळतंय पण वळत नाही

१९८७ प्रेमासाठी वाट्टेल ते

१९८७ खर कधी बोलू नये

१९८७ दे दणादण

१९८७ पोरींची धमाल बापाची कमाल

१९८७ चल रे लक्ष्या मुंबईला

१९८७ गौरवाचा नवरा

१९८८ अशी ही बनवाबनवी

See also  Aacharya Balshastri Jambhekar Sanman Yojana - आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना

१९८८ मामला पोरींचा

१९८८ किस बाई किस

१९८८ घोळात घोळ

१९८८ मज्याच मज्या

१९८८ अशीही बनवा बनवी

१९८८ रंगत संगत

१९८९ आंटीने वाजवली घंटी

१९८९ थरथराट ,हमाल दे धमाल

१९८९ बाळाचे बाप ब्रह्मचारी

१९८९ भुताचा भाऊ

१९९० लपवाछपवी

१९९० शुभ बोल नाऱ्या

१९९० धडाकेबाज

१९९० कुठं कुठं शोधू मी तुला

१९९० धमाल बाबल्या गणप्याची

१९९१ शेम टू शेम

१९९१ आयत्या घरात घरोबा

१९९१ मुंबई ते मॉरिशस

१९९१ येडा की खुळा

१९९२ एक होता विदूषक

१९९२ जिवलगा

१९९३ झपाटलेला

२००४ खतरनाक

१९९४ चिकट नवरा

१९९४ बजरंगाची कमाल

१९९५ जमल हो जमलं

२००३ नवरा माझा मुंबईचा

२००३ सत्वपरिक्षा

२००० खतरनाक

२००१ देखणी बायको नाम्याची

२००२ मराठा बटालियन

२००२ दागिना

अश्याप्रकारे मराठी चित्रपटात यांनी महत्वाचे अभिनय कार्य केले.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजवर अनेक गुणी कलाकरांनी त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. या साऱ्या उत्तम कलाकारांच्या गर्दीत आजही एक नाव कायम अग्रस्थानी आहे ते म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. आज लक्ष्मीकांत यांचा स्मृतिदिन.

सगळ्यांना खळखळून हसविणाऱ्या या विनोदाच्या बादशहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानामुळे आजही ते साऱ्यांच्या स्मरणात आहेत. ‘अशी ही बनवा बनवी’पासून ते अगदी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटापर्यंत आपल्याला Laxmikant Berde यांची वेगळी रुपं पाहण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता कधी सर्वांचा आवडता ‘लक्ष्या’ झाला हे लक्षातही आलं नाही. आणि आता असा कलाकार होणे शक्य नाही.

Leave a Comment