Nilu Phule निळू फुले

चला तर आपण आज एक हसत खेळत कलाकार, आपले आवडते, पूर्ण महाराष्ट्राचे सरपंच आणि तेही बिनविरोध निवडून आलेले ते म्हणजेच Nilu Phule

Nilu Phule निळू फुले

नाव :- नीळकंठ कृष्णाजी फुले.म्हणजेच निळू फुले
राष्ट्रीयत्व :- भारतीय
कार्यक्षेत्र :-   अभिनय भाषा
मराठी प्रमुख नाटके :- सखाराम बाईंडर
प्रमुख चित्रपट :- सामना,पिंजरा पुरस्कार :–संगीत नाटक अकादमी वडील : –कृष्णाजी फुले
आई :- सोनाबाई कृष्णाजी फुले
पत्नी :- रजनी फुले
अपत्ये :- गार्गी (कन्या).

निळू फुले Nilu Phule यांचे बालपण आपण बघूया

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कुटुंबाशी जवळचा संबंध असल्याने सामाजिक चळवळीची बीज निळूभाऊंच्या मनात बालपणीची रुजली गेली. त्यांचे काका रेल्वेमध्ये नोकरीला असल्याने त्यांचे नोकरीचे ठिकाण मध्यप्रदेशमध्ये असल्याने मध्यप्रदेशामध्येच निळू फुले यांचे बालपण काकांकडे गेले.

मध्यप्रदेश, नागपूर आणि विदर्भाच्या सीमेलगतच्या गावामध्ये त्यांच्या काकांच्या बदल्या होत असल्याने या परिसरातच निळूभाऊंचे लहानपण गेले. दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या निळूभाऊंना अभिनयाची आवड असल्याने कला पथकाचे १९५८ च्या सुमारास नेतृत्व केले.  प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नंतर राष्ट्रसेवा दल कार्यकर्ता म्हणून त्यांनी सेवा केली.

निळूभाऊंचं बालपण ज्या भागामध्ये गेले, त्या भागातील परिचित असलेल्या नागरिकांना त्यांच्याबद्दल अभिमान होता. महात्मा फुले यांनी त्यांच्य कुटुंबातील सातबा वाघोले या स्वातंत्र्य लढ्यातील चळवळीतील कार्यकर्ते यांच्यावर विविध जबाबदा-या सोपविल्या होत्या. त्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. या सातबा वाघोले आणि त्यांची मुलगी म्हणजे निळूभाऊंची सख्खी काकू होती.

महात्मा फुलेंच्या कुटुंबियांची जवळचे संबंध असल्यामुळे त्यांच्या बालजीवनावर त्यांच्या कार्याचा निश्चितच प्रभाव होता. लहानपणापासूनच खेळकर आणि खोडकर वृत्ती असलेल्या निळूभाऊंना अभिनय आणि समाज प्रबोधनामध्ये आवड होती.

सासवड तालुक्यातील खळद

खानवली गावामध्ये जन्म झालेल्या Nilu भाऊंचे कुटुंब पुण्यामध्ये रहायला आले. पुण्यामधील खळकमाळआडीत त्यांचे घर होते. १९३० साली जन्मलेल्या निळूभाऊंच्या घरामध्ये ६ भाऊ व ४ बहिनी असे मोठे कुटुंब होते. त्यामुळे घरावरचा आर्थिक भार थोडा कमी व्हावा. यामुळे शाळकरी वयातच निळूभाऊ त्यांच्या मध्यप्रदेशमधील त्यांच्या काकांकडे राहावयास गेले. त्यांचे काका रसिक होते.

त्यामुळे निळूभाऊंच्या कलागुणांना बालपणातच प्रोत्साहन मिळत गेले.  त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणा-या पैशावर चरितार्थ चालवत होते. निळूभाऊंचे वडील कृष्णाजी फुले अतिशय धार्मिक आणि आस्तिक होते. त्यांचा दिवस पुजापाठाने होत असे. त्याउलट त्यांचे काका नास्तिक होते.

कर्मकांड आणि देवधर्मावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. त्यामुळे नास्तिकतेचे संस्कार निळूभाऊंवर बालपणी झाले. निळूभाऊंबरोबर त्यांची काही भावंडे काकांकडेच राहत होती. भाऊंच्या वडिलांचा आणि चुलत्यांचा सांभाळ त्यांच्या आत्याने केला होता. त्यांची आत्या ज्योतिबा फुले यांच्या विचाराने भारावलेली व सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीत सक्रिय होत्या.

त्यांनी निळूभाऊंच्या वडिलांना व मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. शिक्षणाचा आग्रह धरला. त्यामुळे त्यांचे काका शिक्षण पूर्ण करून रेल्वेमध्ये नोकरीला लागले. मध्येप्रदेशात असले तरी घरामध्ये मराठीतच बोलणे असायचे, हिंदी भाषिक भाग असल्याने व्यवहार मात्र हिंदीतून केला जात होता.

निळूभाऊंच्या काकांकडे नाट्य संगिताच्या रेकॉर्डस्‌ असल्याने त्या मोठ्या ग्रामोफोनवर त्या लावल्या जात असत. बालगंधर्वांच्या भरभराटीचा काळ आणि नाट्य संगीताच्या  ध्वनीमुद्रीकांचं संगीत निळूभाऊंच्या  लहानपणीच कानावरून गेलं होतं.  त्यांच्या काकांनी आवडीमुळे ग्रामोफोन हौसेने खरेदी केला होता. करमणूकीची फारशी साधन त्याकाळी नसल्यामुळे ही गाणी लावल्यानंतर आजूबाजूचे परिसरातील लोकही ऐकण्यासाठी  घराजवळ जमत असत.

Nilubhau ना गाणी ऐकायला मिळत असल्याने  नकळत संस्कार त्यांच्यावर होत होते.  त्यामुळे त्यांना गाण्यांमध्ये देखील रस होता. निळूभाऊंनी स्वत: आवाजाची नक्कल केली तसेच गायकीची आवड निर्माण झाल्याने त्यांना शास्त्रीय संगीत शिकण्याची तीव्र इच्छा होती. जालम  नावाच्या गावी ते राहत होते. तेव्हा  त्यांनी पहिला सिनेमा पाहिला.

त्याच  रुपेरी पडद्यावर राज्य करणार आहोत. हे त्यांच्या मनातही नव्हते. पडद्यावरच्या हालचाली पार्श्वसंगीत याचे त्यांना  आप्रुक वाटत होते. जालम गावावरून खामगावला रेल्वेने येऊन तिथे  मैदानावर दाखवला जाणारा सिनेमा  त्यांना पाहण्यासाठी आवडत असे.

See also  Marathi Web Series मराठी वेब सिरीज

पुण्यातील संस्कृति व वातावरणापेक्षा  मध्यप्रदेशातले वातावरण वेगळे होते.  राहणीमानासह दैनंदिन खाण्याच्या वस्तूमध्ये देखील तफावत होती.  निळूभाऊंच्या येथील वास्तव्यात क्रिकेटपेक्षा फुटबॉल व हॉकी खेळण्यामध्ये  त्यांना आवड होती. शाळेचे मित्र किंवा भावंडाबरोबर फुटबॉल खेळण्याची  त्यांना आवड होती.

निळूभाऊंच्या  बालपणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये ते संस्कारवर्गात जात  असत. तसेच तेथे सर्व मुलांबरोबर  खेळण्यासाठी संधी मिळत होती. मात्र एकदिवशी त्यांना त्यांच्याबरोबर येत  असलेल्या मुस्लिम व ख्रिश्चन मित्रांना संस्कार वर्गात येण्यासाठी संघाने  मज्जाव केला.

त्यामुळे निळूभाऊ नाराज होऊन खेळण्यासाठी देखील इतर  धर्मातील व्यक्तींना प्रतिबंध केला जात असल्याने त्यांनी देखील संघातील  संस्कार वर्गाकडे पाठ फिरवली.  त्यांच्या मनावर संघाच्या इतर  धर्मियांबाबत असलेल्या आकसाबाबत परिणाम झाला. त्यामुळे ते सर्वसमावेशक अशा चळवळीकडे  आकर्षित झाले.

पुण्यात (पुणे) आल्यानंतर ते क्रिकेट खेळू लागले. शाळेत मराठी  आणि हिंदी शिक्षण असले तरी मराठी मिश्रीत हिंदी शिकवली जात होती.  राज्यांच्या सीमा भागामध्ये द्विभाषीक असल्याने हिंदी मिश्रीत भाषेत  चवथीपर्यंत निळूभाऊंनी येथे शिक्षण  घेतले.

१९३८ सालच्या सुमारास पुन्हा ते पुण्यात वास्तव्याला आल्याने पुढील शिक्षण पुण्यात घेतले. मध्यप्रदेशच्या  वातावरणाचा तसेच तेथील संस्कृतिचा तसेच राहणीमानाचा मोठा प्रभाव जरी निळूभाऊंनवर पडला होता तरीदेखील त्यांच्या सर्वसामावेशक विचारसरणीच्या जडणघडणीत तिथल्या वास्तव्याचा  अनुकूल परिणाम त्यांच्यावर झाला  होता.  लहानपणापासून असलेली  वाचनाची आवड त्यांच्या जीवनाला  वेगळी वळण देणारी ठरली.

त्याकाळी पेशवाईची राजवटीमुळे शिक्षण संस्थांवर ब्राम्हणी प्रवृत्तीचा पगडा होता. निळूभाऊ यांनी मात्र शिवाजी मराठा हायस्कुलमध्ये शिक्षण घेतले. त्यावेळी बाबूराव जगताप हे  मुख्याध्यापक होते. त्या शाळेत बहुजन समाजाची मुले मोठ्या प्रमाणात  शिक्षणासाठी होती.

यामध्ये मुस्लिम व ख्रिश्चन मुलांचादेखील समावेश होता.  शाळेमध्ये बाबुराव जगताप हे स्वत:  इंग्रजी शिकवत होते. निळूभाऊंना मात्र शिक्षणामध्ये फारसा रस नव्हता. मात्र इतर शालेय उपक्रमात त्यांना आवड  होती.  निळूभाऊंना नकला करण्याची आवड होती. शाळेमध्ये शिक्षकांच्या  नकला ते करत असल्यामुळे त्यांच्यावर शिक्षक नाराज न होता.

त्यांना  प्रोत्साहन देत होते. त्यामुळे  निळूभाऊंना शालेय शिक्षणासाठी  वातावरणपुरक होतं. निळूभाऊंना  इंग्रजीपेक्षा मराठीचा अभ्यास आवडत नव्हता. केवळ ग. ह. पाटील यांच्या  कवितांमध्ये त्यांना विलक्षण आवड  होती. शाळा नकोशी वाटणा-या  मुलांमध्ये त्यांचा समावेश होता.

अभ्यासामध्ये फारसे लक्ष नसल्याने  उत्तीर्ण होण्यापूरती शिक्षणात प्रगती  होती. शिक्षणाबरोबरच शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये चळवळीचं केंद्रदेखील होतं. बहुजन समाजातील मुलांचे  शिक्षण व्हावे. या दृष्टीकोनातूनच  शिक्षक मंडळी ध्येय वादाने शिकवत होती. त्यावेळी मोडी लिपीदेखी  शिकवली जात होती. ‘व्हर्नाक्यूलर फायनल’ ही परिक्षा त्यावेळी होती. तिला फार महत्व होते. त्या  परिक्षेत उत्तीर्ण झाप्यानंतर लगेच  शिक्षकाची नोकरी मिळत होती.

गरीब विद्यार्थ्यांना फ्रिशीप मिळत असल्याने ख्रिश्चन तसेच बहुजन मुलांचे शिक्षण या संस्थेत सोईचे जात होते. सत्यशोधक समाजाच्या चळवळीला त्यावेळी जोर होता. त्यामुळे ख्रिश्चन मुलांशी बहुजन मुलांबरोबर जवळकी झाली होती.  त्यांच्यामध्ये मैत्रीची भावना होती.

Nilu Phule चे पारतंत्र्याविरूद्ध माहिती  देणारी व स्वातंत्र्याची महती सांगणारं शिवाजी मराठा हायस्कूल हे केंद्र होतं. आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे.  आणि त्यासाठी प्रत्येकानं काम केले  पाहिजे ही गोष्ट वर्गातच मुलांच्या  मनावर बिंबवली जात होती.  मराठी, इंग्रजी व इतिहास  शिकविणा-या शिक्षकांनी नवी दृष्टी देऊन आवड निर्माण केली होती.

या  शिक्षकांचा निळूभाऊंवर प्रभाव पडला होता. सामाजिक चळवळीत काम  करताना व विचाराला दिशा देण्यासाठी त्यांना शिक्षकांची शिकवण उपयोगी पडले.शिक्षण सुरू असताना खेळण्याबरोबरच त्यांना वाचनाचा नाद होता. हिंदी, इंग्रजी सिनेमेही त्यांनी त्याकाळी अनेकदा पाहिले.

त्यांच्या ऐका मित्राचे वडील  कॅम्पमधील विक्टरी थिएटरमध्ये  व्यवस्थापक होते. तिथे दर्जेदार सिनेमा लागला की ते स्वत: या मुलांना चित्रपट पहायला घेऊन जात होते. त्यांच्या  परिने त्या चित्रपटाचा कथानक मुलांना समजून सांगत होते. निळूभाऊंना त्यावेळी इंग्रजी फारसे समजत नसले तरी  इंग्रजी अभिनेत्यांची देहबोली, प्रसंग  कलविण्याची पद्धत निरखायला त्यांनी त्यावेळी प्रारंभ केला.

See also  Dada Kondke दादा कोंडके

त्यांचे बोलणे,  चालणे तसेच डोळ्यांच्या हालचाली या सगळ्या गोष्टी ते बारकाईने पाहत होते. चित्रपटातील हालचाल, गती,  चित्रपटातील प्रसंगातील क्षण मनामध्ये साठवून मित्रमंडळींमध्ये ते सांगत  असत.  ‘जजमेंट ऑफ न्युरेबर’ या नावाच्या  चित्रपटामध्ये ज्यू लोकांच्या हत्येचा  विषय होता. नाझिंनी केलेले ज्यू हत्याकांड जगभर गाजले होते. त्यावर हा  चित्रपट होता. त्यातील खटला हे  या चित्रपटाचं बलस्थान होते.

नाझि गुन्हेगार आणि त्यांच्या अन्याय  वर्तनाबद्दल त्यातल्या वकिल झालेल्या अभिनेत्याने जे भाषण केले होते. ते  निळूभाऊंना त्यांच्या हालचालींसह  पाठांतर झालेले होते. इंग्रजी फारशी  येत नसतानाही त्यांनी सर्व लक्षात  ठेवलेला तो प्रसंग त्यांच्या अभिनेता  म्हणून दृढ होण्याच्या वाटचालीमधील एक प्रमुख टप्पा होता.

निळूभाऊंच्या शाळेत सेवा दलाची चळवळही सुरू होती. शाळेच्या मागे असलेल्या अवस्थी वाड्यातून या चळवळीचा प्रारंभ झाला. स्वातंत्र्यलढ्याच्या त्या काळात सेवादल शाखेचे महत्वही मोठ्या प्रमाणात होते. एस.पी. कॉलेजच्या  सभेत गोळीबार झाला. त्यामध्ये  गोपाळ अवस्थी या निळूभाऊंच्या  मित्राला गोळी लागली होती.

त्यांना  आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रसेवा दल या दोन्ही संघटनांमधील फरक निळूभाऊंना लहानपणीच  कळला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात  फक्त हिंदूंच हित पाहिलं जात होतं. तर राष्ट्रसेवा दलात सर्वांचं हे दोन  संस्कारामधील विभिन्नता त्यांच्या  बालमनावर बिंबवली होती.

त्यामुळे  त्यांनी राष्ट्रसेवा दलाची कास धरली.  स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये पारतंत्र्यातून मुक्तता या विषयावर बौद्धिक  शिबीरे घेण्यात येत होती. त्यामध्ये  एखादी गोष्ट थेट सांगण आणि  कलेच्या माध्यमातून सांगणे हे दोन  भिन्न प्रकार होते.

थेट बोलेले लोकांना आवडतेच असे नाही त्यामध्ये इंग्रज सरकार असल्याने कारवाईची देखी भिती होती. म्हणून सेवा दलातल्या नेत्यांनी कला पथकाची युक्ती काढली. लोक  मानस जागृत करण्यासाठी  त्यांच्यापर्यंत पोहचून विश्वास संपादनासाठी कलापथकातून ते साध्य करावे हे निश्चत झाल्यानंतर कला पथकाशी  निळूभाऊंची जवळकी वाढली.

कलापथकातल्या कामामुळे पथक  प्रमुख म्हणून निळूभाऊंवरच  जबाबदारी टाकण्यात आली. त्यानंतर ती त्यांनी जबाबदारीने नेटाने पार  पाडली. त्यांना त्यात रस होता.  नाटकाच्या निमित्ताने वाचन सुरू झालं. कवियत्री शांता शेळके मराठी विषय  त्यांना शिकविण्यासाठी होत्या.

त्यांनी  त्यावेळी शिकवताना वेगवेगळ्या कथा सांगून निळूभाऊंशी जाण आणि  अभिरुची विकसित केली. पाश्चात्य  विख्यात लेखकांच्या कथांबरोबरच  फ्रेन्च, रशियन, जर्मन अशा विविध  भाषेतील अनुवादीत कथा त्या सांगत असत. ऐरवी शिक्षणाबद्दल फार आस्था नसलेले निळूभाऊ अशा गोष्टींमध्ये  रमून जात.

स्वत:ची वागण्याची रित, नाटकाची निवड, पात्र रचना ते स्वत: करत होते. वय लहान असले तरी  त्यांची जाण मोठी होती. निळूभाऊंना ते उपजत ज्ञान होते. त्यांच्या बालमनावर सामाजिक चळवळीचा प्रभाव पडला होता. शहरी आणि ग्रामीण भागात  त्यांचे बालपण गेल्यामुळे तेथील जीवनाचे निरिक्षण अतिशय अजूक होते.

या निरिक्षणाचा त्यांनी अभिनयात खूबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणा-या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतील कलाकार जिवंत केला.  निळूभाऊंनी काही काळ नोकरी केली. त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात  जनसंपर्क साधून आपली कलेची  आवड अधोरेखीत केली.

काही काळ  स्वातंत्र्य लढ्यातील चळवळीत व्यथित केला. गोवा येथीलही सेवा दलाच्या माध्यमातून चळवळीतही सक्रिय  सहभाग घेतला. कला क्षेत्रात पदार्पण करताना त्यांनी ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्याद्वारे पदार्पण केलं.  तर ‘एक गाव बारा भानंगडी’ या  चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत  पदार्पण केले.

निळूभाऊंनी सलग ४० वर्ष चित्रपट सृष्टीत व रंगभूमीवर काम केले. १२ हिंदी चित्रपटातून तर १४०  मराठी चित्रपटातून काम केले. हे करत असताना समाज व्यवस्था बदलण्याच्या चळवळीत ते अखेरपर्यंत कार्यरत राहीले. त्यांच्या अनेक अजरामर  भूमिकांमधून ते आपल्यात कायमच  राहतील.

निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणार्‍या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतले. पण, आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ हा वेग लिहिला.

See also  Laxmikant Berde लक्ष्मीकांत बेर्डे

त्यानंतर पु. ल.. देशपांडे यांच्या नाटकात ‘रोंगे’ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खर्‍या अर्थाने पुढे आले. नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला .

नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणार्‍या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते . या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणार्‍या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला .

नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळूभाऊंनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही बरेच काम केले. सेवादलाच्या कलापथकाचे सदस्य असलेल्या निळू फुले यांनी १९५८ सुमारास पुण्यातील कलापथकाचे नेतृत्व केले .

निळू फुले यांचे जुलै १३,२००९  रोजी पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

निळूफुलें Nilu Phule यांची गाजलेली लोकनाट्ये

१) कथा अकलेच्या कांद्याची,
२) कुणाचा कुणाला मेळ नाही,
३) पुढारी पाहिजे,
४) बिन बियाचे झाड,
५) मी लाडाची मैना तुमची,
६) राजकारण गेलं चुलीत,
७) लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.

गाजलेले मराठी चित्रपट

१)अजब तुझे सरकार

२)आई (नवीन)

३)आई उदे गं अंबाबाई

४)आघात

५)आयत्या बिळावर नागोबा

६)एक गाव बारा भानगडी

७)एक रात्र मंतरलेली

८)एक होता विदुषक

९)कडकलक्ष्मी

१०)कळत नकळत

११)गणानं घुंगरू हरवलं

१२)गल्ली ते दिल्ली

१३)चटक चांदणी

१४)चांडाळ चौकडी

१५)चोरीचा मामला

१६)जगावेगळी प्रेमकहाणी

१७)जन्मठेप

१८)जिद्द

१८)जैत रे जैत

१९)दिसतं तसं नसतं

२०)दीड शहाणे

२१)धरतीची लेकरं

२२)नणंद भावजय

२३)नाव मोठं लक्षण खोटं

२४)पटली रे पटली

२५)पदराच्या सावलीत

२६)पायगुण

२७)पिंजरा

२८)पुत्रवती

२९)पैज

३०)पैजेचा विडा

३१)प्रतिकार

३२)फटाकडी

३३)बन्याबापू

३४)बायको असावी अशी

३५)बिन कामाचा नवरा

३६)भन्नाट भानू

३७)भालू

३८भिंगरी

३९)भुजंग

४०)मानसा परीस मेंढरं बरी

४१)मालमसाला

४२)मुक्काम पोस्ट ढेबेवाडी

४३)राघुमैना

४४)राणीने डाव जिंकला

४५)रानपाखरं

४६)रावसाहेब

४७)रिक्षावाली

४८)लाखात अशी देखणी

४९)लाथ मारीन तिथं पाणी

५०)वरात

५१)शापित

५२)सतीची पुण्याई

५३)सर्वसाक्षी

५४)सवत

५५)सहकारसम्राट

५६)सामना

५७)सासुरवाशीण

५८)सोबती

५९)सोयरीक

६०)सिंहासन

६१)सेनानी साने गुरूजी

६२)सोंगाड्या

६३)हर्या नार्‍या जिंदाबाद

६४)हळदी कुंकू

६५)हीच खरी दौलत

६६)थापाड्या .

बाई वाड्यावर या हे गमन तर असे गाजले होते की ,त्यावेळी जिथे तिथे हे गाणे थांबतच नव्हते. डोक्यावर तिरपी पांढरी गांधी टोपी, भेदक नजर, धोतराचा सोगा हातात धरलेला आणि तोंडाचा चंबू करून बेरकीपणानं हुंकारत निळूभाऊ बोलत.

ती त्यांची ‘स्टाईल’ होती. अनेक मिमिक्रीवालेसुद्धा निळूभाऊंची एवढीच नक्कल करत आणि करतात. प्रसंगी पदरची वाक्ये बोलतात आणि निळूभाऊंच्या नावावर खपवतात. ‘बाई वाड्यावर या’ हे वाक्य कदाचित त्यातलेच! पण हे वाक्य म्हणजे निळूभाऊंची खरी ओळख नव्हे.

खरंतर हे वाक्य निळूभाऊंनी कुठल्या चित्रपटात उच्चारलं होतं याविषयी कोणालाही माहिती नाही. (अगदी त्यांच्या मुलीला, गार्गीलाही ते असं कुठल्या चित्रपटात बोललेत का याविषयी शंका आहे.) त्यामुळे आजच्या लोकांना ‘बाई वाड्यावर या’ ही निळूभाऊंची एवढीच आणि अशी ओळख राहणे हे माझ्या खट्टू होण्याचे कारण आहे

त्यांचे गाजलेले हिंदी चित्रपट

१)कूली,
२)जरा सी जिंदगी,
३) दिशा,
४)दुनिया,
५) नरम गरम,
६) प्रेम प्रतिज्ञा,
७)मशाल,
८) सारांश,
९) सौ दिन सास के

Nilu Phule ची गाजलेली नाटकं

१)जंगली कबूतर,
२)बेबी,
३)रण दोघांचे,
४) सखाराम बाईंडर,
५) सूर्यास्त.

अश्याप्रकारे त्यांची नाटके सुद्धा चांगलीच गाजली. अश्याप्रकारे आपण निळूफुलें Nilu Phule यांची माहिती बघितली आहे

Leave a Comment