Laxmi mukti yojana 2022 | लक्ष्मी मुक्ती योजना या योजनेत महिलांना मिळणार 50 % आरक्षण

Laxmi mukti yojana 2022 लक्ष्मी मुक्ती योजना या योजनेत महिलांना मिळणार 50 % आरक्षण. लक्ष्मी मुक्ती योजना पतीच्या सातबाराला पतीच्या हयातीमध्ये पत्नीचा आधार म्हणून नाव लावण्याची तरतूद 11 मार्च 2022 रोजी राज्याचा 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या 2022-23 च्या बजेटमध्ये महिला सशक्तीकरणासाठी महत्त्वाची अशी घोषणा करण्यात आली. ती म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांना 50% पर्यंत आरक्षण म्हणजे ज्या योजना राबवल्या जातील याच्या मध्ये 50% लाभार्थी हे महिला शेतकरी राहतील. तर चला मग या योजने विषयी आपण माहिती पाहूया.

सातबारावर पतीच्या नावाबरोबरच पत्नीचे नावही  नोंद करण्यासाठी शासनाने लक्ष्मी मुक्ती  योजना कार्यान्वित केली असून या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सर्वानी अग्रही रहावेमहिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजना उपयुक्त ठरत असल्याचे आपल्याला दिसून येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  पुरुषांनी  आपल्या पत्नीचे नाव 7/12 उताऱ्यावर लावण्यासाठी तलाठी कार्यालयात पत्नीच्या सहमती अर्ज करावा.

भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदाच्या 5008 जागा

अर्ज  केल्यानंतर तात्काळ पत्नीचे नाव सात-बारावर लावण्यात येईल. प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला आपल्या पतीच्या जमिनीवर त्याच्या हयातीत आपले नाव किंवा हक्क असावा असे वाटत असते.  किंबहुना 7/12 सदरी मालक असावे किंवा 7/12 वर नाव दिसावे असे वाटत असते.

पतीच्या निधनानंतर त्या महीलेचे वासरा हक्काने व वारस तपासाच्या फेरफाराने नाव चढते ही महाराष्ट्र महसुल अधिनियम 1966 ची तरतुद आहे.  परंतू महिलेच्या पतीच्या हयातीत तीचे नाव तीच्या पतीच्या जमिनीच्या 7/12  सातबारा सदरी वडीलोपार्जित मालमत्तेत नाव लावण्याची तरतुद महाराष्ट्र महसुल व वन विगागाच्या 15 सप्टेंबर 1992 च्या  परिपत्रकानुसार करण्यात आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या पत्नीला त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीतील वाटा मिळवून देण्याचे संपूर्ण श्रेय शरद जोशी यांना आहे. पतीच्या निधना नंतरही त्या शेतकरी महिलेला सन्मानाने जगता यावे याकरिता शरद जोशी यांनी ‘लक्ष्मी मुक्ती’  योजना (Laxmi mukti yojana) कार्यक्रम ही मोठी चळवळ उभारली होती.

शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीच्या नावे जमिनीची मालकी करून देण्याची ही चळवळ तेव्हा  सुरू झाली. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे 1986 मध्ये शेतकरी संघटनेची जाहीर सभा झाली. त्यातच पत्नीच्या नावावर शेतकऱ्यांनी जमिनी करून द्याव्यात, असा ठराव पारित करण्यात आला. या चळवळीची दखल तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी घेतली होती.

See also  LPG Gas Connection Riffle Booking Miss Call नविन गॅस कनेक्शन

mansi raut age,Biography, Birthdate, Inatagram, Wikipedia, Boyfriend 2022

लक्ष्मी मुक्ती या नावाने शासकीय अधिनियमच त्यांनी काढला.  पत्नीच्या नावे जमीन करून देणाऱ्या शेतकऱ्यांनी या परिपत्रकाच्या आधारे तहसीलमध्ये अर्ज करावा.  शेतजमिनीवर महिलांची नावे असावीत, हा द्रष्टा निर्णय घेणारेही महाराष्ट्र देशात पहिले राज्य
बनले.

15 सप्टेंबर, 1992 ला महसूल आणि वन विभागाने याबाबत परिपत्रक काढले होते.  ज्याच्या मध्ये एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या शेतकऱ्याला आपल्या पत्नीला स्वच्छेने आपल्या पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून नाव लावण्याची तरतूद करण्यात यावी.

त्यांची स्वतःची अधिकारी मुलगी असेल तसेच काही इच्छा असेल आणि त्याला कशाप्रकारची तरतूद असेल तर मागणी केली तर त्यात त्या शेतकऱ्याच्या साताऱ्याला त्या शेतकऱ्याच्या सहहिस्सेदार म्हणून नाव लावण्याची तरतूद करण्यात यावी अशा प्रकारचे परिपत्रक 15 सप्टेंबर 1992 रोजी काढण्यात आलेला होतं आणि या परिपत्रकाच्या अधीन राहून सुद्धा महाराष्ट्रामध्ये लक्ष्मीमुक्ती योजनेच्या अंतर्गत शेतकरी जर आपल्या पत्नीचा आधार म्हणून नाव निश्चित असेल तर तो त्या ठिकाणी साताऱ्याला लावू शकतो त्या महिलांना 50 टक्के आरक्षण आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे राबविली जाणारी लक्ष्मीमुक्ती योजना आहे. आपण सुद्धा 15 सप्टेंबर 1992 रोजी च्या परिपत्रकानुसार आपल्या पत्नीचे नाव सातबाऱ्यावर लावू शकता. योजनेचे नावही मोठे समर्पक होते, ‘लक्ष्मी मुक्ती योजना’ एखाद्या पुरुषाला स्वखुशीने आपल्या जमिनीत पत्नीच्या नावाची नोंद सहहिस्सेदार म्हणून करायची असेल तर त्याने विनंती केल्यास तशी नोंद फेरफार उताऱ्यात केली जाते.

ही Laxmi mukti yojana 2022 माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे पण वाचा:  शेतकरीअद्भुत मराठी

Leave a Comment