IT Company recruitment 2022 – तरुणांसाठी खुशखबर आयटी कंपनी देणार 2 लाख नोकऱ्या डिजिटायझेशनमुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध-भारतातील मुख्य 5 माहिती आणि तंत्रज्ञान (IT) कंपन्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात 1.82 लाख फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याचे ध्येय ठेवले आहे. डिजिटायझेशनमुळे या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.
हे recruitment एप्रिल 2022 ते मार्च 2023 दरम्यान उपलब्ध होणार आहेत. या पाच कंपन्यांमध्ये इन्फोसिससह टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), एचसीएअल टेक, विप्रो आणि टेक महिंद्रा यांचाही समावेश आहे.
या सर्व कंपन्या सध्या खूप नफ्यात आहेत. गेल्या वर्षी या कंपन्यांनी 80 हजारपेक्षा अधिक तरुणांना रोजगार दिला होता. त्या तुलनेत आता 120% अधिक नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. यामुळे बेरोजगारांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे.
कॅम्पस मुलाखतीला कंपन्यांचे प्राधान्यटेक महिंद्राचे एमडी सीपी गुरनानी यांनी म्हटले की, आम्ही नागपूर, पुणे, मुंबई, कोलकाता आणि भुवनेश्वर सारख्या भागातून अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत. कंपनीने कॅम्पस मुलाखतीद्वारे पुढील वर्षी 15 हजारपेक्षा अधिक जणांची नियुक्ती करण्याची योजना तयार केली आहे. टीसीएसने यावर्षी 1.1 लाख जणांना पदोन्नती दिली तर 49 हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणे बाकी आहे. गेल्या वर्षी 21 हजार जणांची भरती केली होती, तर यावेळी कंपनी 55 हजार लोकांना रोजगार देणार आहे.
म्हणजे दुप्पट रोजगार उपलब्ध झाला. विप्रो 17,500 फ्रेशर्सची निवड करणार आहे. गेल्या वर्षी केवळ 9 हजार जणांना कामावर घेण्यात आले होते. एचसीएल टेक 22 हजार जणांना नोकरी देणार आहे.
फ्रेशर्सना नोकरी देण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे या आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी नोकरी सोडतात. जानेवारी ते डिसेंबर 2021 दरम्यान या कंपन्यांनी 2.3 लाख कर्मचाऱ्यांची भरती केली होती. देशातील सर्वात मोठी कंपनी टीसीएस यावेळी 78 हजार तरुणांना नोकऱ्या देणार असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी टीसीएसने 40 हजार जणांना नोकरी उपलब्ध करून दिली होती.
नोकरभरती कारणे… नोकरभरतीची दोन मुख्य कारणे आहेत, एक म्हणजे आयटी कंपन्यांची मागणी वाढत आहे. त्यांच्या व्यवहारात वाढ होत आहे. इन्फोसिसने तिसऱ्यांदा सांगितले आहे की त्यांची वाढ 19-20% असू शकते. तसेच इतर कंपन्यांची मागणी वाढत असल्याने नोकरभरती वाढत आहे.
IT Company recruitment 2022 ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.