Income Opportunity For Farmers | शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी |

Income Opportunity For Farmers | शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी |

शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जर कोणी शेतकरी बांधवांची जमीन ही पडीक असेल, तर ही बातमी अशा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. आपल्याकडे कोणकोणत्या शेतकरी बांधवांकडे खूप मोठी जमीन असते त्यातील ते काही भागच पेरतात व त्यांना तेवढाच पुरेसा असतो बाकीचे जमीन ही पडीक राहते तर यावरही त्यांना आता शासनाकडून प्रति हेक्टर 75 हजार रुपये मिळणार आहेत.

ही योजना कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अशी राबविल्या जात आहे. योजनेद्वारे प्रति हेक्टर 75 हजार रुपये असे अनुदान शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये भाडेतत्त्वावर जमीन ही महावितरण द्वारे घेतल्या जाणार आहे. या योजनेअंतर्गत विद्युतीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन ही भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहे प्रती हेक्टर 75 हजार रुपये असा दर यामध्ये आहे. आपल्या राज्यामध्ये ज्या ग्रामीण भागांमध्ये किंवा गावांमध्ये कृषी वीज वाहिन्यांचे अलगीकरण झाले आहे अशा वीज वाहिन्यांचे या योजनेच्या अंतर्गत आता ऊर्जीकरण करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महावितरण आता पंधरा हजार एकर जमिनीमध्ये 4000 मेगा वॅट अशी वीज निर्माण करणार आहे त्यासाठीच ही जमीन महावितरणाला भाडेतत्त्वावर हवी आहे. जर शेतकऱ्यांकडे पडिक जमीन असेल आणि जर ती त्यांना भाडेतत्त्वावर द्यायचे असेल. तर खालील संकेतस्थळावर जाऊन ते तेथे संपर्क करू शकतात.

संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे Click करा.

Government scheme माझी कन्या bhagyashri

आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.

See also  Scope of Farm Robots in India | भारतातील फार्म रोबोट्सची व्याप्ती |

Leave a Comment